Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Highlights

  • इंडियन प्रीमियर लीग 2023 चं प्रसारण जियो सिनेमावरून केलं जाईल.
  • आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला होईल.
  • फोनवर 4K क्वॉलिटीमध्ये आयपीएल मॅच पाहता येईल.

यंदा IPL 2023 च्या सर्व सामान्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमाच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आनंदले आहेत कारण यंदा आयपीएलसाठी कोणतंही सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार नाही आणि सर्व सामने मोफत बघता येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का जरी प्रेक्षकांनी वेगळं सब्सक्रिप्शन घेतलं नाही आणि फ्री आयपीएल मॅच पहिल्या तरी यातून देखील Ambani कोट्यवधी कमवणार आहेत. पुढे आम्ही तुम्हाला हे कसं शक्य आहे याची माहिती दिली आहे.

एक मॅच बघण्यासाठी खर्च करावे लागतील 28 रुपये

इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार 3 तासांचा सामना मोबाइलवर बघण्यासाठी प्रेक्षकांना कमीत कमी 2 जीबी डेटा खर्च करावा लागेल. भारतात जरी जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन्स असले तरी एक जीबी डेटाची किंमत जवळपास 14 रुपये आहे. याचा अर्थ असा की जियो सिनेमा अ‍ॅपवर एक लाइव्ह मॅच बघण्यासाठी युजर्सना 28 रुपये खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय

एकूण 70 लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने 52 दिवसांत खेळवले जातील. याचा अर्थ असा की मोबाइल किंवा कनेक्टेड टीव्हीवर सर्व 74 सामने बघण्यासाठी 2,072 रुपयांचा डेटा युजर्सना लागेल. तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या ताज्या ग्राहक आकडेवारीनुसार, रिलायन्स जियोकडे सक्रिय ग्राहकांची संख्या जवळपास 425 मिलियन आहे. यावरून तुम्ही देखील हिशोब करू शकता की या सर्व ग्राहकांनी एक सामना जरी पहिला तरी डेटावर 11,900 मिलियन रुपये खर्च केले जातील. वायकॉम18 मीडिया नेटवर्क आपल्या मोफत आयपीएलच्या माध्यमातून 500 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार Jio च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला सर्व युजर मोबाइल फोनवर आयपीएलचा संपूर्ण सामना बघतील असं अपेक्षित नाही. सरासरी लोक एक तासापेक्षा कमी काळ सामना बघतात, ज्यासाठी वरवर 0.5 जीबी डेटा आवश्यक असतो. एवढा डेटा सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सच्या बहुतांश डेटा प्लॅनमध्ये असतो.”

jio 5g works on 4g sim

वायकॉम18 च्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “टेलीकॉम कंपन्या विशेष प्रचार करून आयपीएलच्या काळात स्वस्त डेटा प्लॅन सादर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” परंतु अद्याप जियो किंवा एयरटेलनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here