Nokia 1.4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-nokia-6-3-and-nokia-7-3-may-launch-soon-know-all-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-nokia-6-3-and-nokia-7-3-may-launch-soon-know-all-specification/#respond Mon, 25 Jan 2021 12:49:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9768 नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी नोकिया हे दोन्ही फोन्स Nokia 6.4 किंवा Nokia 7.4 नावाने लॉन्च करू शकते.

The post Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे फोन बनवणारी कंपनी HMD Global यावर्षी नवीन आणि दमदार स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून Nokia 1.4, Nokia 6.3 आणि Nokia 7.3 बद्दल बातम्या समोर येत आहेत. आता एका नवीन रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि हे नवीन Nokia फोन्स 2021 ची पहिली तिमाही किंवा दुसऱ्या तिमाहीत लॉन्च केले जाऊ शकतात. नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा होती, पण असे नाही झाले. असे जरी असले तरी फोनच्या लॉन्च प्लान बद्दल आतापर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी नोकिया हे दोन्ही फोन्स Nokia 6.4 किंवा Nokia 7.4 नावाने लॉन्च करू शकते. दरअसल, Nokiapoweruser च्या रिपोर्ट मध्ये हि माहिती देण्यात आली आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि नोकिया 1.4 आता पर्यंत मल्टीपल लिस्टिंग मध्ये दिसला आहे. अलीकडेच नोकिया 1.4 च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता.

हे देखील वाचा : 6GB रॅम सह येईल Nokia चा स्वस्त 5G फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी?

लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोन मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले, एक क्वाड कोर प्रोसेसर, 1GB रॅम, 16 GB स्टोरेज आणि ड्यूल-रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोन 100 यूरो (अंदाजे 8,800 रुपये) पेक्षा कमी किंमतीत लॉन्च होणार असल्याची आशा आहे.

नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 बाबत पण अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे फोन्स 2021 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी किंवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरवातीला लॉन्च केले जाऊ शकतात.

हे देखील वाचा : लो बजेट सेग्मेंटसाठी नोकियाचा पुढील डाव तयार, घेऊन येत आहे स्वस्त 4G फोन Nokia 1.4

फीचर्स पाहता काही लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि नोकिया 6.3 स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर आणि 24 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा असल्याचे समजले होते. नोकिया 7.3 मध्ये एक होल-पंच कटआउट सह 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 690 प्रोसेसर असेल. तसेच, या फोन मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी आणि 24 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असू शकतो. नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 मध्ये क्रमशः 4500mAh आणि 5000mAh बॅटरी असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

आम्ही अलीकडेच नोकिया मोबाईलच्या योजनेबाबत सांगितले होते कि 2021 मध्ये 5जी सपोर्टसह कंपनी कमीत कमी चार स्मार्टफोन घेऊन येण्याची योजना बनवत आहे. सध्या 5G कॅटेगरी मध्ये नोकियाने एकच फोन सादर केला आहे, ज्याचे नाव Nokia 8.3 5G आहे.

The post Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-nokia-6-3-and-nokia-7-3-may-launch-soon-know-all-specification/feed/ 0
लो बजेट सेग्मेंटसाठी नोकियाचा पुढील डाव तयार, घेऊन येत आहे स्वस्त 4G फोन Nokia 1.4 https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-specs-leaked-launch-soon-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-specs-leaked-launch-soon-know-price/#respond Thu, 21 Jan 2021 11:32:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9724 एमएसपीच्या एका ताज्या रिपोर्ट मध्ये नोकिया 1.4 स्मार्टफोनचे फुल स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत, त्याचबरोबर दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केट मधेच याच किंमतीत लाॅन्च होईल आणि भारतात Nokia 1.4 ची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

The post लो बजेट सेग्मेंटसाठी नोकियाचा पुढील डाव तयार, घेऊन येत आहे स्वस्त 4G फोन Nokia 1.4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या वर्षी मार्च मध्ये आपल्या लो बजेट सेग्मेंट मध्ये Nokia 1.3 स्मार्टफोन लाॅन्च केला होता जो अँड्रॉइड ‘गो’ वर्जन सह मार्केट मध्ये आला होता. आता बातमी येत आहे कि कंपनी या स्वस्त स्मार्टफोनचा नेक्स्ट वर्जन घेऊन येण्याची तयारी करत आहे जो Nokia 1.4 नावाने लाॅन्च केला जाईल. एमएसपीच्या एका ताज्या रिपोर्ट मध्ये नोकिया 1.4 स्मार्टफोनचे फुल स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत, त्याचबरोबर दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केट मधेच याच किंमतीत लाॅन्च होईल आणि भारतात Nokia 1.4 ची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Nokia 1.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता एमएसपीच्या रिपोर्टनुसार हा फोन 6.51 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेसह लाॅन्च केला जाईल जो एलसीडी पॅनल वर बनला असेल. हा एक लो बजेट फोन असेल त्यामुळे नोकिया 1.4 मध्ये वाॅटरड्राॅप नाॅच डिजाईन मिळू शकते. रिपोर्टनुसार Nokia 1.4 चे डायमेंशन 116.42X76.72X8.70एमएम असतील.

हे देखील वाचा : 2021 मध्ये Nokia च्या 5G फोन्सचा धुमाकूळ, इथे बघा लिस्ट

प्रोसेसिंगसाठी नोकिया 1.4 मध्ये 1.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला क्वाॅड-कोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर फोन मध्ये अँड्रॉइड 10 ओएस मिळेल. इथे फोन मधील चिपसेटची माहिती समोर आली नाही. रिपोर्टनुसार नोकिया 1.4 स्मार्टफोन 1 जीबी रॅम वर लाॅन्च होईल त्याचबरोबर 16 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. विशेष म्हणजे फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येईल.

Nokia 1.4 Specs

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 1.4 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे, त्याचबरोबर फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

हे देखील वाचा : 6GB रॅम असलेल्या Nokia 5.3 च्या किंमतीत झाली मोठी कपात, अशी आहे नवीन किंमत

Nokia 1.4 एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई सपोर्ट सह लाॅन्च होईल. फोन मध्ये वायफाय आणि ब्लूटूथ सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स दिले जातील. रिपोर्टनुसार सिक्योरिटीसाठी नोकिया 1.4 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हा फोन बाजारात Blue आणि Gray कलर मध्ये लाॅन्च केला जाऊ शकतो.

The post लो बजेट सेग्मेंटसाठी नोकियाचा पुढील डाव तयार, घेऊन येत आहे स्वस्त 4G फोन Nokia 1.4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-1-4-specs-leaked-launch-soon-know-price/feed/ 0