6GB रॅम सह येईल Nokia चा स्वस्त 5G फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी?

टेक्नोलॉजीची मागणी पाहता दरवर्षी टेक बाजारात स्मार्टफोन कंपन्या आपल्या प्रोडक्ट मध्ये काहीना काही नवीन घेऊन येतात. सध्या 5जीचा एक ट्रेंड दिसत आहे आणि हा ट्रेंड फॉलो करत प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांपासून टेलीकॉम कंपन्या पण 5G टेक्नोलॉजी वर काम करत आहेत. आता बातमी समोर आली आहे कि नोकिया लवकरच बजेट कॅटेगरी मध्ये 5G फोन सादर करण्याचा विचार करत आहे. कोडनेम नोकिया क्विकसिल्वर सह HMD ग्लोबलचा एक स्मार्टफोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचच्या वेबसाइट वर दिसला आहे.

लिस्टिंगवरून समजले आहे कि स्मार्टफोन 6GB रॅम आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम सह सादर केला जाईल. स्मार्टफोन 1.8GHz चिपसेट वर काम करेल ज्याला नाव देण्यात आले नाही. फोनला सिंगल-कोरसाठी 466 आणि मल्टी-कोरसाठी 1487 – पॉईंट्स मिळाले आहेत. या स्कोर वरून अंदाज लावला जात आहे कि नोकिया क्विकसिल्वर एक बजेट प्रोसेसर सह सादर केला जाईल. फोन मध्ये नवीन स्नॅपड्रॅगॉन 480 5जी चिपसेट दिला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

Nokia Quicksilver गिकबेंच स्पेसिफिकेशन

हे देखील वाचा : सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर

6 जीबी रॅम सह नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन येणे विशेष असेल. अलीकडेच लॉन्च झालेला ओपो A93 5G पण स्नॅपड्रॅगॉन 480 SoC सह सादर केला गेला होता, ज्यात 8GB RAM देण्यात आला होता. या स्मार्टफोनसाठी पण गीकबेंच वर आश्याचप्रकाराचा स्कोर दिसला होता.

याव्यतिरिक्त बातमी अशी आहे कि एचएमडी ग्लोबल नोकिया 6.3 / 6.4 नावाच्या किफायतशीर स्मार्टफोन वर पण काम करत आहे. लीकनुसार हा हँडसेट 6.45-इंचाच्या डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर, 24MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल.

हे देखील वाचा : Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन

इतकेच नव्हे तर नोकिया फोन TA-1322 मॉडेल नंबर असलेला फोन यूएस फेडरल कम्युनिकेशंस कमीशन (FCC) च्या वेबसाइट वर दिसला होता. ज्यात हा स्मार्टफोन 6.5-इंच FHD + HDR डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 690 5G चिपसेट, 48MP क्वाड रियर कॅमेरा, 24MP सेल्फी सेंसर आणि 4,000mAh च्या बॅटरी सह येणार असल्याची बातमी समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here