2021 मध्ये Nokia च्या 5G फोन्सचा धुमाकूळ, इथे बघा लिस्ट

Samsung, Xiaomi, Motorola आणि Oppo सारख्या स्मार्टफोन कंपन्यांना आव्हान देण्यासाठी यावर्षी HMD Global ने पण तयारी केली आहे. भारतासह जगभरात 5G स्मार्टफोन्सची मागणी पाहून Nokia ने प्लानिंग केली आहे कि कंपनी 4 नवीन 5जी स्मार्टफोन्स यावर्षी लॉन्च करणार आहे, जे लुक आणि स्पेसिफिकेशन्स सह मजबूतीच्या बाबतीत पण दमदार असतिल. अलीकडेच कंपनीने आपल्या योजनेच्या बाबतीत सांगितले आहे. सध्या 5G कॅटगरी मध्ये नोकियाने एकच फोन सादर केला आहे, ज्याचे नाव Nokia 8.3 5G आहे.

होतील हे स्मार्टफोन्स लॉन्च

नोकिया येत्या काळात आपले नवे 5जी मोबाईल सादर करून आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने चार नवे 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवली आहे. नोकियाचे जे 5G मोबाईल यावर्षी लॉन्च होणार आहेत, त्यात Nokia 5.5 5G, Nokia 7.4 5G, Nokia 8.4 5G आणि Nokia 9.x PureView (संभावित नावे) प्रमुख आहेत. आशा आहे की हे फोन्स एंट्री लेवल 5जी पासून प्रीमियम 5जी मोबाईल सेगमेंट मध्ये सादर केले जाऊ शकतात.

पब्लिकेशननुसार नोकिया 7.4 5जी वर्षाच्या पहिल्या सहामाहीत रिलीज होणार्‍या दोन स्मार्टफोन्स पैकी एक असू शकतो. तसेच असे पण सांगण्यात आले आहे की हा नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC सह येऊ शकतो जो अलीकडेच सादर केला गेला होता. विशेष म्हणजे इथे अलीकडेच लीक झालेल्या नोकिया 6.3 / 6.4 बद्दल सांगण्यात आले आहे, जो आम्हाला वाटतो की लवकरच लॉन्च होऊ शकतो कारण याची डिजाइन आधीच लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.

स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर

स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर काही दिवसांपूर्वी स्वस्त 5जी स्मार्टफोनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सादर केला गेला होता. स्नॅपड्रॅगन 460 आणि स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरशी याची तुलना करायची झाल्यास स्नॅपड्रॅगन 480 5G 8 नॅनोमीटर प्रोसेस वर तयार करण्यात आला आहे. तसेच हा या सीरीजचा हा पहिला प्रोसेसर आहे ज्यात क्विक चार्ज 4 प्लस, 120fps FHD+ पॅनलचा सपोर्ट, 64 मेगापिक्सलचा सपोर्ट आणि ट्रिपल कॅमेरा का सपोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here