Nokia X5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Jul 2018 07:57:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया ने दिली शाओमी ला टक्कर, लॉन्च केला सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन नोकिया एक्स5 https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-official-launched-in-china-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-official-launched-in-china-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 07:57:45 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1295 चीनी बाजारात नोकिया एक्स5 ची बेसिक किंमत 999 युआन ठेवण्यात आली आहे.

The post नोकिया ने दिली शाओमी ला टक्कर, लॉन्च केला सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन नोकिया एक्स5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने आज खुप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ब्रांड चा दुसरा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स5 टेक बाजारात आणला आहे. एकदा लॉन्च डेट बदलल्या नंतर बाद नोकिया ने आज हा फोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. नोकिया एक्स सीरीज चा हा दुसरा स्मार्टफोन आहे ज्यात नोकिया एक्स6 प्रमाणे नॉच डिस्प्ले आहे. चीनी बाजारात नोकिया एक्स5 ची बेसिक किंमत 999 युआन ठेवण्यात आली आहे.

नोकिया एक्स5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नोकिया एक्स5 एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी च्या रेडी अपडेट सह येतो. म्हणजे एंडरॉयड पी रोलआउट होताच या फोन मध्ये लेटेस्ट एंडरॉयड येईल.

नोकिया एक्स दोन रॅम मेमरी वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो 4जीबी रॅम व 3जीबी रॅम ला सपोर्ट करतो. सोबतच फोन मधील प्रोसेसिंग साठी मीडियाटेक चा पावरफुल चिपसेट हेलियो पी60 देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे तर नोकिया एक्स5 चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तसेच फोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

नोकिया एक्स5 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल. हा एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. त्याचप्रमाणे सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्निक असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

नोकिया एक्स5 मध्ये 4जी एलटीई व अन्य ​बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता नोकिया एक्स5 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 1,399 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसी नुसार या दोन्ही वेरिएंट ची किंमत क्रमश: 10,100 रुपये आणि 14,200 रुपयांच्या आसपास आहे.

नोकिया एक्स5 ब्लॅक, बॅलाटिक सी आणि ग्लेशियर वाईट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चीन च्या बाहेर भारतात व अन्य ग्लोबल मार्केट्स मध्ये कधी लॉन्च होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आशा आहे की नोकिया चे मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल लवकरच भारतात पण नोकिया एक्स सीरीज च्या स्मार्टफोन ची घोषणा करेल.

The post नोकिया ने दिली शाओमी ला टक्कर, लॉन्च केला सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन नोकिया एक्स5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-official-launched-in-china-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 08:33:45 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1212 हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे पण येत्या 19 जुलै ला हा फोन ग्लोबली लॉन्च केला जाईल.

The post 19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया आपल्या एक्स सीरीज मध्ये अजून एक डिवाईस आणत आहे आणि हा फोन 11 जुलै ला अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात येईल. आता सूचना मिळत आहे की नोकिया चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 पण ग्लोबल मार्केट मध्ये येणार आहे. हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे पण येत्या 19 जुलै ला हा फोन ग्लोबली लॉन्च केला जाईल.

विदेशी वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की एचएमडी ग्लोबल येत्या 19 जुलै ला नोकिया एक्स6 ग्लोबल मंचावर लॉन्च करणार आहे. ग्लोबल लॉन्च नंतर हा फोन भारता सह अन्य बाजारांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सेल साठी उपलब्ध होईल. काही दिवसांपूर्वी नोकिया च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यावर नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर ही अपेक्षा होती की नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो.

नोकिया एक्स6 कंपनी चा पहिला असा एंडरॉयड स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया एक्स6 मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया एक्स6 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया एक्स6 तीन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 1,299 युआन (जवळपास 13,800 रुपये), 1,499 युआन (जवळपास 16,000 रुपये) तसेच 1,699 युआन (जवळपास 18,000 रुपये)आहे. तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. चीन मध्ये नोकिया एक्स6 ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post 19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 08:49:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1187 विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भरपुर दिवसांपासुन नोकिया ब्रांड च्या नवीन स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत होते की, एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या अजून एका नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच तो टेक विश्वा समोर सादर करेल. आता नोकिया ने स्वतः हा फोन समोर आणत लॉन्च ची घोषणा केली आहे. नोकिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे की कंपनी येत्या 11 जुलै ला एक नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करणार आहे.

नोकिया ने हे स्पष्ट केले नाही की 11 जुलै ला ब्रांड चा पुढील फोन कोणत्या नावाने बाजारात येईल पण एवढे मात्र सांगितले आहे की हा फोन ‘नोकिया एक्स’ सीरीज चा दुसरा फोन असेल. बोलले जात आहे की हा फोन नोकिया 5एक्स किंवा मग नोकिया 5.1 प्लस नावाने लॉन्च होईल.

विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे. असे पण असू शकते की या फोन मध्ये 6-इंचाची स्क्रीन, 6जीबी रॅम सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 किंवा मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट मिळू शकतो. पण नोकिया ने या आगामी फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे वाट बघावी लागेल.

काही दिवसांपूर्वी नोकिया च्या ग्लोबल वेबसाइट तसेच कंपनी च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यात नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर असे बोलले जात आहे की कंपनी नोकिया चा हा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च करू शकते.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/feed/ 0