नोकिया ने दिली शाओमी ला टक्कर, लॉन्च केला सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाला फोन नोकिया एक्स5

नोकिया ने आज खुप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ब्रांड चा दुसरा नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स5 टेक बाजारात आणला आहे. एकदा लॉन्च डेट बदलल्या नंतर बाद नोकिया ने आज हा फोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. नोकिया एक्स सीरीज चा हा दुसरा स्मार्टफोन आहे ज्यात नोकिया एक्स6 प्रमाणे नॉच डिस्प्ले आहे. चीनी बाजारात नोकिया एक्स5 ची बेसिक किंमत 999 युआन ठेवण्यात आली आहे.

नोकिया एक्स5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नोकिया एक्स5 एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी च्या रेडी अपडेट सह येतो. म्हणजे एंडरॉयड पी रोलआउट होताच या फोन मध्ये लेटेस्ट एंडरॉयड येईल.

नोकिया एक्स दोन रॅम मेमरी वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो 4जीबी रॅम व 3जीबी रॅम ला सपोर्ट करतो. सोबतच फोन मधील प्रोसेसिंग साठी मीडियाटेक चा पावरफुल चिपसेट हेलियो पी60 देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे तर नोकिया एक्स5 चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तसेच फोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट मध्ये 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

नोकिया एक्स5 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल. हा एलईडी फ्लॅश सह वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. त्याचप्रमाणे सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्निक असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

नोकिया एक्स5 मध्ये 4जी एलटीई व अन्य ​बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता नोकिया एक्स5 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 1,399 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसी नुसार या दोन्ही वेरिएंट ची किंमत क्रमश: 10,100 रुपये आणि 14,200 रुपयांच्या आसपास आहे.

नोकिया एक्स5 ब्लॅक, बॅलाटिक सी आणि ग्लेशियर वाईट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चीन च्या बाहेर भारतात व अन्य ग्लोबल मार्केट्स मध्ये कधी लॉन्च होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आशा आहे की नोकिया चे मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल लवकरच भारतात पण नोकिया एक्स सीरीज च्या स्मार्टफोन ची घोषणा करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here