नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च

भरपुर दिवसांपासुन नोकिया ब्रांड च्या नवीन स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत होते की, एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या अजून एका नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच तो टेक विश्वा समोर सादर करेल. आता नोकिया ने स्वतः हा फोन समोर आणत लॉन्च ची घोषणा केली आहे. नोकिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे की कंपनी येत्या 11 जुलै ला एक नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करणार आहे.

नोकिया ने हे स्पष्ट केले नाही की 11 जुलै ला ब्रांड चा पुढील फोन कोणत्या नावाने बाजारात येईल पण एवढे मात्र सांगितले आहे की हा फोन ‘नोकिया एक्स’ सीरीज चा दुसरा फोन असेल. बोलले जात आहे की हा फोन नोकिया 5एक्स किंवा मग नोकिया 5.1 प्लस नावाने लॉन्च होईल.

विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे. असे पण असू शकते की या फोन मध्ये 6-इंचाची स्क्रीन, 6जीबी रॅम सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 किंवा मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट मिळू शकतो. पण नोकिया ने या आगामी फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे वाट बघावी लागेल.

काही दिवसांपूर्वी नोकिया च्या ग्लोबल वेबसाइट तसेच कंपनी च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यात नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर असे बोलले जात आहे की कंपनी नोकिया चा हा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here