Notch Display Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 07:54:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1742 भारतीय बाजारात वीवो वाय83 प्रो बेस्ट बाय प्राइस 15,990 रुपये आहे.

The post 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की लवकरच वीवो मिड रेंज मध्ये नवीन फोन वाय83 प्रो लॉन्च करू शकता आणि त्यानुसार कंपनीने हा लॉन्च केला आहे. कंपनी ने यासाठी अधिकृत प्रेस रिलीज दिलेली नाही पण हा फोन स्टोर वर उपलब्ध झाला आहे. तसेच काही स्टोर वर फोन ची प्रीबुकिंग सुरू करण्यात आली आहे. भारतीय बाजारात वीवो वाय83 प्रो बेस्ट बाय प्राइस 15,990 रुपये आहे. चांगली बाब म्हणजे कंपनीच्या या फोन मध्ये खुप अडवासं फीचर्स आहेत.

फोन चे स्पेसिफिकेशंस पाहता यात 6.22-इंचाची 2.0 फुलव्यू स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्यात सेल्फी कॅमेरा आणि इतर सेंसर्स आहेत. हा फोन नवीन 19:9 आसपेक्ट रेश्यो सह उपलब्ध आहे आणि फोनचे स्क्रीन रेजल्यूशन एचडी+, 1520×720 पिक्सल आहे. पण अजूनतरी स्क्रीन कोटिंग बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी कंपनी ने यात 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे जो तुम्ही वीडियो कॉलिंग किंवा कॉन्फ्रेंसिंग साठी वापरु शकता.

वीवो वाय83 प्रो मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट आहे. हा फोन फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,260 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आता पर्यंत फोन lच्या प्रोसेसर ची माहिती मिळाली नाही पण आशा आहे की कंपनी याला मीडियाटेक चिपसेट सह सादर करू शकते.

ड्यूअल सिम आधारित या फोन मध्ये तुम्हाला कनेक्टिविटी साठी 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत वाइफाई आणि ब्लूटूथ मिळेल. तर कंपनी ने यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला आहे. फोन मध्ये तुम्हाला आई प्रोटेक्शन मोड मिळेल.

8जीबी रॅम आणि ‘वी’ नॉच वाल्या वीवो एक्स23 ची प्री-बुकिंग सुरू, लवकरच होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी कंपनी ने मिड रेंज मध्ये नॉच डिस्प्ले सह वीवो वाय81 पण आणला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 12,990 रुपये आहे आणि हा फोन आॅनलाईन शॉपिंग साइट सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

वीवो वाय81 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो आणि यात 3जीबी रॅम मेमरी सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post 15,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला वीवो वाय83 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दलची सर्व माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y83-pro-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 13:58:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1738 आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/feed/ 0
11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आॅनर 9एन, शाओमी रेडमी नोट 5 ला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/honor-9n-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9n-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 24 Jul 2018 11:28:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1388 हा फोन यावर्षी लॉन्च झालेल्या आॅनर 9 लाइट चा अपग्रेड वर्जन आहे जो दिसायला खुप स्टाइलिश आहे आणि याचे फीचर्स पण शानदार आहेत.

The post 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आॅनर 9एन, शाओमी रेडमी नोट 5 ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ब्रांड आॅनर ने आज भारतीय बाजारात नवीन फोन आॅनर 9एन सादर केला आहे. हा फोन यावर्षी लॉन्च झालेल्या आॅनर 9 लाइट चा अपग्रेड वर्जन आहे जो दिसायला खुप स्टाइलिश आहे आणि याचे फीचर्स पण शानदार आहेत. भारतीय बाजारात या फोन ची बेसिक किंमत 11,999 रुपये आहे आणि हा फोन 31 जुलै पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट आणि आॅनर इंडिया स्टोर वर उपलब्ध होईल.

डिजाइन

आॅनर 9लाइट प्रमाणे आॅनर 9एन ची बॉडी ग्लास पासून बनलेली आहे जी खूपच आकर्षक आहे. मेटल फ्रेम वर बनलेल्या या फोन च्या फ्रंट आणि बॅक साठी ग्लोसी ग्लास चा वापर करण्यात आला आहे. तसेच कोपरे थोडे कर्व्ड आहेत त्यामुळे हा हातात घेतल्यावर चांगला फील येतो. बिल्ट क्वालिटी शानदार आहे आणि कमी रेंज मधील हा फोन तुम्हाला प्रीमियम फोन सारखाच अनुभव देतो. हा फोन सफायर ब्लू, मिडनाइट ब्लॅक, जॅसपर ​ग्रीन आणि लवेंडर पर्पल सह चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्ले

आॅनर 9एन नवीन स्क्रीन ​ट्रेंड नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.84-इंचाची फुलएचडी+ ​स्क्रीन देण्यात आली आहे. याचे स्क्रीन रेजल्यूशन 2280 x 1080 पिक्सल आहे. मोठी स्क्रीन असूनही हा कॉम्पॅक्ट आहे आणि हा सहज एका हाताने वापरता येतो. खास बाब म्हणजे नॉच डिस्प्ले वाल्या या फोन मध्ये तुम्ही नॉच डिसेबल करू शकता.

हार्डवेयर
आॅनर 9एन ला कंपनी ने हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर सादर केले आहे आणि फोन मध्ये 2.36गीगाहट्ज्र चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 3 मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. एका मॉडेल मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी मेमरी आहे तर दुसर्‍या मॉडेल मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. तिसर्‍या मॉडेल मध्ये पण रॅम 4जीबी आहे पण मेमरी 128जीबी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरा 16-मेगापिक्सल चा आहे. दोन्ही कॅमेरा मध्ये तुम्हाला पी​डीएएफ आणि बोके इफेक्ट ज्याला ब्लर बॅक ग्राउंड इफेक्ट म्हणतात मिळतील.

आॅपरेटिंग सिस्टम
आॅनर 9एन इमोशन यूआई 8.0 सह सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो आधारित आहे. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला सिंगल हँड यूज, थ्री फिंगर स्क्रीनशॉट आणि नाइट मोड सारखे काही चांगले फीचर्स मिळतील.

कनेक्टिविटी
डाटा व कने​क्टिविटी बद्दल बोलायचे तर आॅनर 9एन मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्ही 4जी वोएलटीई वापरू शकता. त्याचबरोबर वाईफाई ब्लूटूथ आणि जीपीएस पण मिळेल. कंपनी ने याला माइक्रो यूएसबी 2.0 सह सादर केले आहे आणि फोन मध्ये यूएसबी ओटीजी सपोर्ट पण आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर सोबतच फेस अनलॉक पण देण्यात आला आहे.

बॅटरी
पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी च्या बाबतीत हा थोडा कमजोर वाटतो आहे.

किंमत
भारतीय बाजारात आॅनर 9एन 3जीबी+32जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर 4जीबी+64जीबी वाल्या मॉडेल ची किंमत 13,999 रुपये आहे आणि 4जीबी+128जीबी मेमरी वेरियंट साठी तुम्हाला 17,999 रुपये द्यावे लागतील.

The post 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आॅनर 9एन, शाओमी रेडमी नोट 5 ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9n-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0