Okaya EV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Feb 2023 13:15:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एका चार्जमध्ये 125 किमीची रेंज; परवडणाऱ्या किंमतीत Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launched-with-125-km-range/ https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launched-with-125-km-range/#respond Sat, 11 Feb 2023 03:33:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17717 फक्त भारतात नाही तर जगभरातील लोक इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा स्वीकार करत आहेत. काही लोक पर्यावरणाला कमी हानी पोहोचावी म्हणून इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत तर काही पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींना बगल देत आहेत. आता भारत देखील मागे राहिला नाही दिल्लीमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Okaya EV नं आपली नवीन E-Scooter बाजारात आणली आहे. Okaya Faast F3 […]

The post एका चार्जमध्ये 125 किमीची रेंज; परवडणाऱ्या किंमतीत Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर 99,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लाँच
  • Electric Scooter चा टॉप स्पीड 70km/h आहे.
  • इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि मोटारवर 3 वर्षाची वॉरंटी मिळते

फक्त भारतात नाही तर जगभरातील लोक इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा स्वीकार करत आहेत. काही लोक पर्यावरणाला कमी हानी पोहोचावी म्हणून इलेक्ट्रिक वाहने घेत आहेत तर काही पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींना बगल देत आहेत. आता भारत देखील मागे राहिला नाही दिल्लीमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Okaya EV नं आपली नवीन E-Scooter बाजारात आणली आहे. Okaya Faast F3 Electric Scooter नं कंपनीनं भारतात सादर केली आहे.

नवीन ओकाया फास्ट एफ3 भारतात फक्त 99,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत आली आहे. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला एकदा चार्ज केल्यावर 125 किमीची रेंज मिळते. पुढे तुम्हाला Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती मिळेल. हे देखील वाचा: Cheapest 5G Phone in India: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone ची वाढली ताकद; 9GB RAM सह नवा मॉडेल लाँच

Okaya Faast F3 Specifications

डिजाइन पाहता ओकाया फास्ट एफ3 मध्ये खास इंटीग्रेटेड डीआरएलसह एक एप्रन-माउंटेड फ्रंट एलईडी हेडलॅम्प, एक मोठा हँडलबार, मिरर, एक फ्लॅट फुटबोर्ड, पातळ बॉडी पॅनल, फ्लॅट सीट आणि स्लीक एलईडी टेललॅम्प दिसतो. स्कूटर मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फुली-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे.

नवीन ओकाया फास्ट एफ3 मध्ये 1.2 किलोवॉट इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे, जी 3.3 बीएचपी पीक पावर आउटपुट देते. यात स्विचेबल टेक्नॉलॉजीसह 3.53 kWh Li-ion LFP ड्युअल-बॅटरी मिळते, यामुळे बॅटरी लाइफ वाढण्याचा मदत होते, असं कंपनीनं म्हटलं आहे. Faast F3 फुल चार्ज करण्यास सुमारे 4 ते 5 तास लागतात.

स्पीड पाहता ओकाया फास्ट एफ3 EV चा टॉप स्पीड 70km/h आहे. ओकाया फास्ट एफ3 मध्ये ब्रेकिंगसाठी ड्रम ब्रेकसह कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जी युजर्सना पुढे आणि मागील दोन्ही टायरमध्ये मिळते. त्याचबरोबर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आणि मोटारवर 3 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. हे देखील वाचा: लाँच झाला Realme चा Coca-Cola Phone; 108MP कॅमेऱ्यासह मिळतोय 8GB रॅम

Okaya Faast F3 Price

भारतात ओकाया फास्ट एफ3 तुम्हाला 99,999 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत मिळेल. जर तुम्ही ही स्कूटर बुकिंग करू इच्छित असाल तर ऑनलाइन आणि ब्रँडच्या 550 पेक्षा जास्त डीलरशिप स्टोरवर बुकिंग स्वीकारली जाईल.

The post एका चार्जमध्ये 125 किमीची रेंज; परवडणाऱ्या किंमतीत Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launched-with-125-km-range/feed/ 0