लाँच झाला Realme चा Coca-Cola Phone; 108MP कॅमेऱ्यासह मिळतोय 8GB रॅम

Highlights

  • Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 देण्यात आला आहे.

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँच झाला आहे. नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा स्मार्टफोन कोका-कोला थीमवर बनला आहे ज्याची डिजाईन देखील या कोल्ड ड्रिंकच्या बॉटल सारखी आहे. या मोबाइल फोनचे स्पेसिफिकेशन्स बाजारातील रियलमी 10 प्रो 5जी फोन सारखे आहेत. तसेच फोनमध्ये Coca-Cola थीम देण्यात आली आहे जी फोनच्या बाह्य डिजाईनसह वॉलपेपर व स्क्रीनसेवरमध्ये देखील दिसते.

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition Price

रियलमी 10 प्रो 5जी कोका कोला एडिशन भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो जो 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Coca-Cola बॉटल प्रमाणे हा मोबाइल देखील Red-Black कलर शेडमध्ये बनला आहे जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉॅपिंग साइट्सवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition Specifications

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • 108MP Rear Camera
  • 8GB+8GB = 16GB RAM
  • Qualcomm Snapdragon 695
  • 33W 5,000mAh Battery

हा नवीन रियलमी फोन कोका कोला एडिशन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या स्क्रीनमध्ये 680निट्स ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 16.7एम कलर आणि 391पीपीआय सारखे फीचर्स मिळतात.

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. हे देखील वाचा: Cheapest 5G Phone in India: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone ची वाढली ताकद; 9GB RAM सह नवा मॉडेल लाँच

फोटोग्राफीसाठी या रियलमी 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाइलच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here