स्वदेशी Lava Blaze 5G चा 6GB रॅम असलेला मॉडेल आला बाजारात

Highlights

  • Lava Blaze 5G 6GB RAM सह लाँच झाला आहे.
  • लावा ब्लेज 5जी फोन भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे.
  • वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह हा फोन 9GB RAM वर परफॉर्म करू शकतो.

भारतीय मोबाइल ब्रँड लावानं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) सादर करत Lava Blaze 5G लाँच केला होता. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच हा फोन आणखी अ‍ॅडव्हान्स करत कंपनीनं 6GB RAM Lava Blaze 5G मॉडेल देखील भारतीय बाजारात आणला आहे. फोन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Lava Blaze 5G Price

लावा ब्लेज 5जी फोनचा नवीन मेमरी व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे. या फोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे परंतु प्रारंभिक सेलमध्ये हा लावा मोबाइल फक्त 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 6GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो. तर Lava Blaze 5G बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Glass Green आणि Glass Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

Lava Blaze 5G Specifications

  • 6.5″ HD+ 90Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Triple Rear Camera
  • 5,000mAh Battery

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. फोन 5G च्या 8 बँड्सना सपोर्ट करतो, ज्यात n77 आणि n78 बँड पण शामिल आहेत.

Lava Blaze 5G india launch price 9999 know full specifications sale offers

लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. लावाचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू अशा दोन कलर्समध्ये लाँच करण्यात आहे.

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला आणखी दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर

सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here