OnePlus 6T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Mar 2019 14:09:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/#respond Wed, 20 Mar 2019 14:09:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3904 पुढे आम्ही वनप्लस 6टी च्या अशाच काही खास ट्रिक्सची माहिती दिली आहे.

The post वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रीमियम फोन जेव्हा कमी रेंज मध्ये घेण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात आधी लोक वनप्लस चे नाव घेतात. चांगले स्पेसिफिकेशन, शानदार परफॉर्मन्स आणि सोप्प्या ऑपरेटिंग सिस्टम मूळे याला फ्लॅगशिप कीलर म्हटले जाते. याचकारणामुळे थोड्याच काळात कंपनीने प्रीमियम सेग्मेंट मध्ये सॅमसंग आणि ऍप्पल सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकत नंबर एक ब्रँड बनली आहे. वनप्लस फोन ऑक्सीजन ओएस वर चालतात जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. परंतु ऑक्सीजन ओएस सह तुम्हाला काही खास फीचर्स मिळतात जे साधारण एंडरॉयड फोन मध्ये दिसत नाहीत. अलीकडेच कंपनी ने वनप्लस 6टी मध्ये ऑक्सीजन ओएस 9 आणला आहे आणि यात अनके नवीन फीचर्स तुम्हाला दिसतील. पुढे आम्ही वनप्लस 6टी च्या अशाच काही खास ट्रिक्सची माहिती दिली आहे.

1. मोशन वॉलपेपर

वनप्लस फोनच्या वॉलपेपरची चर्चा खूप होते. नवीन ओएस सह तुम्हाला मोशन वॉलपेपर दिसतील जे एंडरॉयड पाई सॉफ्टवेयर फ्लेवर्ड आहेत. मोशन वॉलपेपरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला
1. होम बटण थोडा वेळ प्रेस करायचा आहे.
2. असे करताच खाली काही ऑप्शन तुम्हाला दिसतील त्यात वॉलपेपरची निवड करा.
3. वॉलपेपर जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल तेव्हा शेवटच्या काही वॉलपेपर मध्ये छोटा माउंटेन दिसेल. तुम्हाला यातील एखादा निवडायचा आहे. आता जेव्हा पण तुम्ही स्क्रीन अनलॉक कराल एक ऍनिमेशन दिसेल ज्यामुळे फोनचा वापर अजून मजेशीर होईल.

2. स्क्रीन अनलॉक ऍनिमेशन

तुम्हाला तर माहीतच आहे कि वनप्लस 6टी मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. जेव्हा तुम्ही स्क्रीन अनलॉक करता तेव्हा एक इफेक्ट येतो. तुम्हाला हवं असल्यास तो इफेक्ट पण बदलू शकता. फोन मध्ये प्रीइंस्टॉल तीन ऍनिमेशन आहेत. तुम्ही यातील कोणत्याही एकाची निवड करू शकता. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचे ऍनिमेशन बदलण्यासाठी
1. सर्वात आधी फोनच्या सेटिंग मध्ये जा.
2. तिथे सिक्योटिरी आणि लॉक स्क्रीनची निवड करा.
3. यात तुम्हाला फिंगरप्रिंटचा ऑप्शन दिसेल तो निवडा.
4. त्यांनतर सर्वात आधी तुम्हाला फोन लॉक कोड टाइप करावा लागेल. त्यांनतर पुढे गेल्यानंतर खाली फिंगरप्रिंट ऍनिमेशन इफेक्टचा ऑप्शन दिसेल. तुम्ही आपल्या इच्छेनुसार कोणताही निवडू शकता.

3. शेल्फ

वनप्लस ने तुमचा यूजर एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी यात शेल्फचा ऑप्शन दिला आहे. जेव्हा होम स्क्रीन तुम्ही डावीकडे स्क्रोल कराल तेव्हा हि विंडो येईल. यात तुम्ही बघू शकता कि कोणत्या ऍप्सचा वापर तुम्ही जास्त करता, कोणत्या कॉन्टेक्ट्सना तुम्ही जास्त कॉल करता आणि रिसेंट ऍप्सची पण माहिती मिळेल. इथून तुम्ही ऍप्स ओपेन पण करू शकता आणि कॉन्टेक्ट्सना कॉल पण करू शकता. तुम्ही आपल्या फोन मधून शेल्फ डिसेबल पण करू शकता. यासाठी सर्वात आधी
1. होम स्क्रीन वर थोडा वेळ प्रेस करा.
2. काही सेकंदांनी खाली काही ऑप्शन दिसतील.
3. तुम्हाला यात होम सेटिंगचा पर्याय मिळेल तो क्लिक करा.
4. यात शेल्फ दिसेल तो ऑफ करा.

4. आईकॉन नाव आणि स्टाइल

वनप्लस 6टी मध्ये ऑक्सीजन ओएस सह अजून एक चांगला फीचर आहे ज्यात तुम्ही एखाद्या ऍप आईकॉनचे नाव आणि लेबल पण बदलू शकता. जसे कि तुम्ही व्हाट्सऍपला चॅट म्हणू शकता किंवा फेसबुकला टिकटॉक. जे हवे ते तुम्ही नाव ठेवू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला
1. कोणत्याही ऍप आईकॉन वर थोडा वेळ टच करून ठेवा.
2. असे करताच काही ऑप्शन पॉप-अप मध्ये दिसतील.
3. तुम्हाला एडिटचा पर्याय निवडायचा आहे.
4. असे केल्याने नाव एडिट करण्याचा आणि लेबल बदलण्याचा ऑप्शन येईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता.

5. डार्क थीम

एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम क्यू चा पहिला बीटा वर्जन गूगल ने आता रोल आउट केला आहे. त्यातील काही फीचर्स पण दाखवण्यात आले आहेत आणि यात डार्क थीमची खूप चर्चा आहे. परंतु वनप्लस मध्ये हि डार्क थीम आधीपासूनच उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला
1. सर्वात आधी सेटिंग मध्ये जा आणि तिथून थीम निवडा.
2. याखाली डार्क थीमचा पर्याय मिळेल. हा ऑन करा.

6. थीम एक्सेंट कलर
वनप्लस 6टी मध्ये यूजरच्या सुविधेसाठी छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे. कंपनी ने यात थीम एक्सेंट कलर सेट करण्याची सुविधा दिली आहे. ज्यात तुम्ही थीम मधील आईकॉन आणि सेंटिंगचे रंग बदलू शकता. यासाठी
1. सेटिंग मध्ये जा.
2. तिथे डिस्प्ले निवडा.
3. तिथे खाली एक्सेंट कलरचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा आणि रंग निवडा.

7. ऍप्स कॉपी
लोका आपली ऑफिस आणि पर्सनल लाइफ वेगळी ठेवायची असते. त्यामुळे ते सोशल मीडिया वर दोन प्रोफाइल बनवतात. यासाठी वनप्लस ने पॅरलल ऍप्सचे फीचर ऑक्सीजन 9 सह दिले आहे आणि हे वनप्लस 6टी मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एका फोन मध्ये दोन व्हाट्सऍप आणि फेसबुक सहित अन्य सोशल मीडिया ऍप्स वापरू शकता.

The post वनप्लस 6टी चे 7 फीचर्स जे आहेत इतरांपेक्षा वरचढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-oxygen-os-9-tips-and-tricks/feed/ 0
वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/#respond Mon, 14 Jan 2019 12:24:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3378 यावेळी वनप्लस 7 मध्ये स्लाइडर असू शकतो. अशी डिजाइन आपण ओपो फाइंड एक्स मध्ये बघितली आहे.

The post वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्याबद्दल गेल्यावर्षीपासून माहिती समोर येत आहे. बोलले जात आहे कि कंपनी यावर्षी मे किंवा जूनच्या आधी डिवाइस लॉन्च करेल जो वनप्लस 7 असेल. आता स्लॅशललीक ने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात वनप्लस 6टी सोबत वनप्लस 7 पण दिसत आहे. फोटो मध्ये दिसत आहे कि स्मार्टफोन मध्ये बारीक बेजल्स आहेत.

तसेच वनप्लस 6टी च्या तुलनेत वनप्लस 7चे स्पीकर थोडे रुंद वाटत आहेत. या फोटो मध्ये डिवाइसचा खालील भाग दाखवण्यात आलेला नाही. फोटो मध्ये वनप्लस 7 मध्ये कोणतीही नॉच नाही, त्यावरून वाटते कि यावेळी वनप्लस 7 मध्ये स्लाइडर असू शकतो. अशी डिजाइन आपण ओपो फाइंड एक्स मध्ये बघितली आहे.

नोव्हेंबर मध्ये वनप्लस ने आपल्या 6 सीरीजचा नवीन फोन 6टी बाजारात सादर केला होता. दामदार स्पेसिफिकेशन असलेला हा फोन अजूनही खूप चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने याच्या नवीन वर्जन वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशनची घोषणा केली होती आणि आता हा फोन भारतात उपलब्ध झाला आहे.

नावावरूनच समजते की हा फोन कंपनी ने ऑटोमोबाइल कंपनी मॅक्लारेन सोबत मिळून आणला आहे. मॅक्लारेन खास करून आपल्या रेसिंग कारसाठी ओळखली जाते आणि कंपनी पण हा फोन स्पीड सोबत जोडून सादर करत आहे. वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन मध्ये 10जीबी रॅम देण्यात आला आहे. भारतात 10जीबी रॅम सह लॉन्च होणार हा पहिला फोन आहे. सोबतच फोन मध्ये वार्प चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीनुसार हा जुन्या डॅश चार्जिंग पेक्षा जास्त फास्ट आहे.

भारतीय बाजारात वनप्लस 6टी ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे पण 6टी मॅक्लारेन एडिशन साठी तुम्हाला 50,999 रुपये द्यावे लागतील. हा वनप्लसचा आतापर्यंतचा सर्वात महाग डिवाइस आहे. वनप्लस 6टी मैक्लारेन एडिशन मध्ये मुख्य फरक रंगाचा आणि रॅमचा आहे. फोन गडद मेटॅलिक रंगात सादर करण्यात आला आहे.

The post वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/feed/ 0
10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 13:46:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3029 वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन ची किंमत किती असेल आणि हा कधी पासून सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 12 डिसेंबरची वाट बघावी लागेल.

The post 10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर शब्द ऐकताच वनप्लसचे नाव लक्षात येते. या टेक कंपनी ने नेमकेच स्मार्टफोन्स आणून भारतासह इंटरनेशनल टेक मंचावर आपली ओळख बनवली आहे. वनप्लस 6टी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे जो भरपूर शानदार डिजाईन व दमदार प्रोसेसर आहे. भारतात वनप्लस 6टी 6जीबी रॅम/128जीबी मेमरी, 8जीबी रॅम/128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/256जीबी मेमरीच्या तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर आता आपला हाच स्मार्टफोन अजून पावरफुल करत कंपनी वनप्लस 6टी ला 10जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करणार आहे.

वनप्लस येत्या 12 डिसेंबरला मुंबई मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंट मध्ये कपंनी वनप्लस 6टी चा नवीन वेरिएंट सादर करेल. वनप्लस 6टी चा हा नवीन वेरिएंट 10जीबी च्या पावरफुल रॅम सह येईल. तसेच या नवीन वेरिएंट मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. वनप्लस आपला हा नवीन स्मार्टफोन वेरिएंट स्पोर्ट्स कार कंपनी मॅकलॅरेन सोबत मिळून बनवत आहे आणि हा नवीन मॉडेल वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन नावाने लॉन्च होईल.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन बद्दल कंपनी ने जास्त माहिती दिली नाही पण आशा आहे कि हा फोन डिजाईन व लुक सोबतच अन्य स्पेसिफिकशेन्सच्या बाबतीती पण वनप्लस 6टी सारखा असेल. वनप्लस 6टी ची बॉडी मेटल फ्रेम वर बनली आहे पण मागील पॅनल वर काच देण्यात आली आहे. वनप्लस 6टी कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो छोटयाश्या ‘ओ’ शेप वाल्या एयरड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. हा फोन फुल एचडी+ (1080 x 2280 पिक्सल) रेजल्यूशन सह येतो. सोबतच हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन पण फोनच्या रेग्यूलर वर्जन प्रमाणे एंडरॉयड 9 पाई आधारित कंपनीच्याच आॅक्सिजन ओएस वर सादर केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी वनप्लस 6टी मध्ये आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी हा ऐड्रेनो 630 जीपीयू ला सपोर्ट करतो. वनप्लस 6टी च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेकेंडीरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वनप्लस 6टी डुअल सिम फोन आहे ज्याच्या दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई वापरता येते. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच कंपनी ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे. तसेच पावर बॅकअप साठी वनप्लस 6टी मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह फास्ट चर्जिंग सपोर्ट वाली 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन ची किंमत किती असेल आणि हा कधी पासून सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 12 डिसेंबरची वाट बघावी लागेल. वनप्लस 6टी च्या सध्याच्या वेरिएंट्स ची किंमत पाहता फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनच्या 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post 10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/feed/ 0
शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 13:48:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2831 वनप्लस ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार कोणताही स्मार्टफोन महाग किंमतीती लॉन्च करून कपंनी आपले ‘फ्लॅगशिप कीलर’ हे टाइटल संपुष्टात आणू इच्छित नाही.

The post शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
संपूर्ण जगासोबतच भारत पण 4जी इंटरनेट चा मोठा बाजार बनला आहे. 4जी कनेक्टिविटी ने भारतात आपले जाळे पसरवले आहे आणि सध्या प्रत्येक स्मार्टफोन ब्रँड आणि टेलीकॉम कंपन्या 4जी सपोर्ट तसेच 4जी नेटवर्क देत आहेत. 4जी च्या यशानंतर आता सर्वांची नजर सुपरफास्ट 5जी नेटवर्क कडे आहे. क्वालकॉम व स्नॅपड्रॅगॉन सारख्या दिग्गज चिपसेट व प्रोसेस​र बनवणर्या कंपन्यांनी घोषणा केली आहे कि त्या 5जी सपोर्ट असलेले चिपसेट बनवण्यात यशस्वी झाल्या आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी पण पुढल्या वर्षी 5जी फोन आणण्याची घोषणा केली आहे . त्यात एक मोठी बातमी अशी आली आहे कि टेक कंपनी वनप्लस 5जी सपोर्ट असलेले फोन आणण्यासाठी एक नवीन ब्रँड बाजारात आणेल.

वनप्लस ने सीनेट ला सांगितले आहे कि कंपनी पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 5जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन नक्कीच घेऊन येत आहे पण हा फोन कंपनी एखाद्या नवीन ब्रँडिंग सह बाजारात येईल. आतापर्यंत कंपनी वनप्लस 5, 5टी तसेच वनप्लस 6, 6टी टाइटल सह फोन लॉन्च करत आहे तर आपल्या 5जी स्मार्टफोन सोबतच कंपनी आपला नवीन ब्रँड पण बाजारात घेऊन येईल. ज्याप्रमाणे शाओमी ने ‘पोकोफोन’ आणि ओपो ने ‘रियलमी’ लॉन्च केला आहे त्याचप्रमाणे वनप्ल्स पण आपला नवीन ब्रँड घेऊन येऊ शकते.

वनप्लस च्या या नवीन ब्रँड अंतर्गत कंपनीचे 5जी सपोर्ट असलेले स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पुढच्यावर्षी बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून वनप्लस आपला हा नवीन ब्रँड तसेच कंपनीचा पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल याची दाट शक्यता आहे. वनप्लसचा हा 5जी फोन कोणत्या ब्रँड अंतर्गत लॉन्च होईल तसेच कंपनी आपल्या पहिल्या 5जी फोनला काय नाव देईल याबद्दल अजूनतरी काही सांगता येणार नाही.

काही मीडिया रिर्पोट्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि वनप्लसचा नेक्स्ट स्मार्टफोन वनप्लस 7 च 5जी सपोर्ट सह ईऊल हाच कंपनीचा पहिला 5जी फोन असेल. पण वनप्लस 7 5जी सपोर्ट सह येण्यासाची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे वनप्लस टाइटल सह लॉन्च होणारे कंपनीचे सर्व स्मार्टफोन्स ‘फ्लॅगशिप कीलर’ स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. आणि हे नाव त्यांना कमी किंमतीती दमदार स्पेसिफिकेशन्स असल्यामुळे देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जर वनप्लस 7 5जी सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला तर या फोनची किंमत वाढेल. त्यामुळे वनप्लस ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार कोणताही स्मार्टफोन महाग किंमतीती लॉन्च करून कपंनी आपले ‘फ्लॅगशिप कीलर’ हे टाइटल संपुष्टात आणू इच्छित नाही. त्यामुळे 5जी फोन आणण्यासाठी ​वनप्लस आपला एक नवीन ब्रँड लॉन्च करेल याची शक्यता अजून वाढते.

The post शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/feed/ 0
आज पासून सुरु झाली वनप्लस 6टी ची विक्री, बघा याची पहिली झलक आणि जाणून घ्या या फोन संबंधित काही प्रश्नांची उत्तरे https://www.91mobiles.com/marathi/every-thing-know-about-oneplus-6t-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/every-thing-know-about-oneplus-6t-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 13:33:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2761 जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असला तर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. खाली आम्ही वनप्लस 6टी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

The post आज पासून सुरु झाली वनप्लस 6टी ची विक्री, बघा याची पहिली झलक आणि जाणून घ्या या फोन संबंधित काही प्रश्नांची उत्तरे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनप्लस ने दिवाळीच्या निमित्ताने भारतात आपला नवीन हँडसेट वनप्लस 6टी सादर केला आहे. हा फोन आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया व्यतिरिक्त आॅफलाइन स्टोर रिलायंस डिजिटल आणि क्रोमा वर सेल साठी उपलब्ध आहे. स्टाइल पासून फीचर पर्यंत अनेक बाबतीत हा फोन खास आहे. जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असला तर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. खाली आम्ही वनप्लस 6टी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

वनप्लस 6टी ची डिजाइन कशी आहे?

वनप्लस 6टी ची बॉडी मेटल फ्रेम वर बनलेली आहे पण मागील पॅनल मध्ये ग्लास देण्यात आली आहे जी खूप चमकदार आहे. याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि कोपरे खूप कर्व्ड आहेत आणि स्लिक आहेत. त्यामुळे पकडल्यावर हा खूप आरामदायक वाटतो.

फोनचा डिस्प्ले कसा आहे?

वनप्लस 6टी मध्ये 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल व्यू डिस्प्ले आहे. कंपनी ने हा 1080 x 2280 पिक्सल रेजल्यूशन वाली फुल एचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे. त्याचबरोबर एमोलेड स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे जो वायब्रेंट डिस्प्ले साठी ओळखला जातो. फोनचा डिस्प्ले खूप चांगला आहे.

स्क्रीन प्रोटेक्शन आहे का?

वनप्लस 6टी ची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे. हा कोर्निंगचा लेटेस्ट वर्जन आहे जो खूप अडवांस आहे. कोर्निंग प्रोटेक्शन स्क्रीनला फक्त छोट्या स्क्रॅच पासून वाचवत नाही तर याला मजबूती पण देतो.

यात नॉच आहे का?

नॉचची सुरवात कंपनी ने वनप्लस 6 पासून केली होती. तर वनप्लस 6टी मध्ये अगदी छोटी नॉच आहे. हि एयरड्रॉप नॉच म्हणून ओळखली जाते. या गोलाकार नॉच वर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनर कसा आहे?

वनप्लस 6टी च्या मागच्या पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला नाही. कंपनी ने या फोन मध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. अर्थात स्क्रीनच्या खाली स्कॅनर आहे. बोट लावताच स्क्रीन अनलॉक होते. कंपनीचा दावा आहे कि हा फक्त 0.3 सेकेंड मध्ये स्क्रीन अनलॉक करतो. आम्हला हा खूप फास्ट वाटला. फोन मध्ये लिफ्ट टू वेक आॅप्शन पण आहे ज्यामुळे फोन उचलताच फिंगरप्रिंट स्कॅनर चालू होतो आणि तुम्ही पावर बटन ना दाबता स्क्रीन अनलॉक करू शकता.

फोनचा प्रोसेसर कसा आहे

वनप्लस 6टी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर सादर करण्यात आला आहे आणि यात (4×2.8 गीगाहट्र्ज क्रयो 385 गोल्ड + 4×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 385 सिल्वर) आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर चांगल्या ग्राफिक्स साठी कंपनी ने यात एड्रीनो 630 जीपीयू दिला आहे. क्वालकॉम चा हा सध्यातरी सर्वात ताकदवान चिपसेट आहे जो बेस्ट परफॉर्मेंस साठी ओळखला जातो.

वनप्लस 6टी मध्येकिती रॅम आहे?

हा फोन 6जीबी आणि 8जीबी की रॅम सह येतो.

याची इनबिल्ट मेमरी किती आहे?

वनप्लस 6टी तीन मेमरी ऑप्शन्स मध्ये येतो. 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी.

मेमरी एक्सपांडेबल आहे का?
नाही! वनप्लस च्या डिवाइस मध्ये मेमरी एक्सपांड करता येत नाही. या फोन मध्ये पण मेमरी कार्ड सपोर्ट नाही.

फोन कोणत्या आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो?

वनप्लस 6टी आॅक्सिजन ओएस 9.0 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे. हा अगदी स्टॉक ओएस सारखा वाटतो. विशेष म्हणेज कंपनी ने पुढील दोन वर्षांचे अपडेट देण्याचा विश्वास दिला.

फोनचा रियर कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे आणि यात कोणते फीचर्स आहेत?

वनप्लस 6टी मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागच्या पॅनल मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेंकेंडरी कॅमेरा सेंसर मिळेल. दोन्ही सेंसर एफ/1.7 अपर्चर सह येतात. तसेच कंपनी ने इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सोबत आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन पण दिले आहे ज्यामुळे कॅमेरा अस्थिर असला तरी चांगले फोटो घेऊ शकतो.

फोटोग्राफी साठी बोके इफेक्ट, पॅनारॉमा मोड आणि एचडीआर सारखे आॅप्शन देण्यात आले आहेत. तसेच तुम्ही प्रो मोड पण वापरू शकता.

4के आणि स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंग आहे का?

वीडियो साठी 4के रेकॉर्डिंग 60 फ्रेम प्रति सेकेंड ने करता येते जी खूप चांगली बाब आहे. तसेच यात स्लो मोशन वीडियो रेकॉर्डचा ऑप्शन पण आहे.

वनप्लस 6टी चा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे?

वनप्लस 6टी मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच यात जायरो ईआईएस आणि आॅटो एचडीआर आहे. सेल्फी कॅमेरा सोबत पण बोके इफेक्ट देण्यात आला आहे.

वनप्लस 6टी मध्ये कनेक्टिविटी चे कोणते आॅप्शन आहेत?

वनप्लस 6टी मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये तुम्ही 4जी वोएलटीई सिम वापरू शकता. तसेच वाईफाई, ब्लूटूथ आणि एनएफसी देण्यात आले आहेत. फोन मध्ये चार्जिंग, डेटा ट्रांस्फर आणि ईयरफोन साठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. यात 3.5 एमएम जॅक नाही.

3.5 एमएम आॅडियो जॅक नाही मग इयरफोनचा वापर कसा करावा?

कंपनी ने यूएसबी टाइप-सी वाले ईयरफोन दिले आहेत. तुम्ही ते कनेक्ट करू शकता किंवा बाजारात कनेक्टर उपलब्ध आहेत. पण टाइप सी वाल्या बुलेट ईयरफोन साठी तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील.

वनप्लस 6टी मध्ये किती एमएएच बॅटरी आहे?

या फोन मध्ये 3,700 एमएएच बॅटरी आहे. जी जुन्या फोनच्या तुलनेत जवळपास 400 एमएएच जास्त आहे.

यात फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे का?

वनप्लस 6टी सोबत डॅश चार्जर देण्यात आला आहे जो फास्ट चार्जला सर्पोट करतो. जो जवळपास एका तासात पूर्णपणे चार्ज होतो.

वनप्लस 6टी ची किंमत किती आहे?

वनप्लस 6टी चा 6जीबी रॅम व 128जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

याच्यासोबत आॅफर आहे का?

कंपनी ने जियो सोबत मिळून 5,000 रुपयांची आॅफर दिली आहे ज्यात तुम्ही 3टीबी डेटा बेनिफिट मिळवू शकता.

The post आज पासून सुरु झाली वनप्लस 6टी ची विक्री, बघा याची पहिली झलक आणि जाणून घ्या या फोन संबंधित काही प्रश्नांची उत्तरे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/every-thing-know-about-oneplus-6t-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम सह करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-launched-india-8gb-ram-features-specifications-price-availability-offers-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-launched-india-8gb-ram-features-specifications-price-availability-offers-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 07:21:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2706 भारतात या फोनची बेस किंमत 37,999 रुपये आहे जो 1 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post वनप्लस 6टी भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम सह करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखली जाणारी टेक कंपनी वनप्लस ने काल भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप कीलर लॉन्च केला आहे. वनप्लस ने वनप्लस 6टी भारतीय बाजारात आणला आहे. वनप्लस 6टी कंपनी ने याच वर्षी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन वनप्लस 6 चा अपडेटेड वर्जन आहे जो शानदार लुक व डिजाईन सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्स साह्य येतो. भारतात या फोनची बेस किंमत 37,999 रुपये आहे जो 1 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

वनप्लस 6टी ची बॉडी मेटल फ्रेम वर बनली आहे पण मागील पॅनल वर काच देण्यात आली आहे. वनप्लस 6टी कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो छोटयाश्या ‘ओ’ शेप वाल्या एयरड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. हा फोन फुल एचडी+ (1080 x 2280 पिक्सल) रेजल्यूशन सह येतो आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 85.7 टक्के आहे. कंपनीने एमोलेड स्क्रीनचा वापर केला आहे जी चांगला व्यू देते. सोबतच हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता वनप्लस 6टी एंडरॉयड 9 पाई आधारित कंपनी के ही आॅक्सिजन ओएस वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी वनप्लस 6टी मध्ये ऐड्रेनो 630 जीपीयू आहे. वनप्लस 6टी देशात 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम/128जीबी मेमरी, 8जीबी रॅम/128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/256जीबी मेमरी सामील आहेत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा आहे. कंपनीने यात 16-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर दिला आहे. दोन्ही सेंसर एफ/1.7 अपर्चर सह येतात. कॅमेरा सोबत इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. फोनचा कॅमेरा 4के विडिओ रिकॉर्ड करू शकतो. वनप्लस 6टी मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हा एफ/2.0 अपर्चर सह सादर केला आहे.

वनप्लस 6टी डुअल सिम फोन आहे ज्याच्या दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई वापरता येते. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच कंपनी ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे. तसेच पावर बॅकअप साठी वनप्लस 6टी मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह फास्ट चर्जिंग सपोर्ट वाली 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता वनप्लस 6टी चा 6जीबी रॅम व 128जीबी वेरिएंट 37,999 रुपये मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनच्या 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे. वनप्लस 6टी येत्या 1 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच 3 नोव्हेंबर पासून हा फोन अमेझॉन सोबतच वनप्लस वेबसाइट व स्टोर, क्रोमा तसेच रिलायंस डिजीटल वर ओपन सेल साठी उपलब्ध होईल.

The post वनप्लस 6टी भारतात झाला लॉन्च, 8जीबी रॅम सह करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-launched-india-8gb-ram-features-specifications-price-availability-offers-in-marathi/feed/ 0
आज लॉन्च होत आहे वनप्लस 6टी, असा बघा लॉन्च इवेंट लाइव https://www.91mobiles.com/marathi/how-tp-watch-oneplus-6t-launch-event-live-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-tp-watch-oneplus-6t-launch-event-live-in-india-in-marathi/#respond Mon, 29 Oct 2018 08:00:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2665 वनप्लस 6टी च्या लॉन्च इवेंटचे आयोजन अमेरिकेत सकाळी 11 वाजल्यापासून केले जाणार आहे जो भारतीय वेळेनुसार जवळपास रात्री 8:30 वाजता सुरु होईल.

The post आज लॉन्च होत आहे वनप्लस 6टी, असा बघा लॉन्च इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत राहिल्यानंतर आज तो दिवस आला आहे ज्यादिवशी फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध वनप्लस आपला नवीन डिवाइस लॉन्च करणार आहे. कंपनी न्यू यॉर्क मध्ये आज एक इवेंट करत आहे ज्यातून वनप्लस 6टी लॉन्च केला जाणार आहे. या फोन बद्दल मागील अनेक दिवसांपासून बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन जाहिरात करत आहेत. त्यामुळे फोन बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. भारतात हा फोन 30 नोव्हेंबरला अर्थात उद्या लॉन्च केला जाणार आहे तर एक दिवस आधी अमेरिकेत याच्या ग्लोबल लॉन्चची तयारी करण्यात आली आहे. तुम्ही हा लॉन्च इवेंट लाइव बघू शकता याची कंपनी ने व्यवस्था केली आहे.

वनप्लस 6टी च्या लॉन्च इवेंटचे आयोजन अमेरिकेत सकाळी 11 वाजल्यापासून केले जाणार आहे जो भारतीय वेळेनुसार जवळपास रात्री 8:30 वाजता सुरु होईल. तुम्ही या लिंक वर क्लिक करून लॉन्च लाइव बघू शकता किंवा मग खाली दिलेल्या वीडियो वर क्लिक करून पण बघू शकता.

वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

ओएस पाहता वनप्लस 6 कपंनी ने नवीन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केला आहे. त्यामुले नवीन मॉडेल पण नवीन ओएस वरच उपलब्ध होईल. किंमती बद्दल बोटीचे झाले तर, मिळालेल्या माहितीनुसार बेस मॉडेल 37,999 रुपयांमध्ये लॉन्च होऊ शकतो.

The post आज लॉन्च होत आहे वनप्लस 6टी, असा बघा लॉन्च इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-tp-watch-oneplus-6t-launch-event-live-in-india-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 13:29:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2399 वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

The post वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणारी कंपनी वनप्लस गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कपंनी आपला नवीन फ्लॅगशिप फोन वनप्लस 6टी घेऊन येत आहे. वनप्लस 6टी बद्दल अनेक लीक समोर आले आहेत पण आता या लीक्स व अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. आपल्या फॅन्स व स्मार्टफोन यूजर्स ची प्रतीक्षा संपवत वनप्लस ने वनप्लस 6टी च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. वनप्लस इंडिया ने सांगितले आहे की वनप्लस 6टी येत्या 30 ऑक्टोबरला भारतात लॉन्च केला जाईल.

वनप्लस इंडिया ने आपल्या ट्वीटर हँडल वरून वनप्लस 6टी च्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. वनप्लस 6टी ऑक्टोबरच्या 30 तारखेला देशात लॉन्च होईल. वनप्लस 6टी च्या लॉन्च डेटची घोषणा करण्या सोबतच कंपनी ने वनप्लस च्या आॅफिशियल वेबसाइट वर वनप्लस 6टी च्या लॉन्च संबंधित माहिती पण दिली आहे. वनप्लस 30 ऑक्टोबरला दिल्ली मधील इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये वनप्लस 6टी च्या लॉन्च चे आयोजन करेल जे रात्री 8:30 ला सुरू होईल.

वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वनप्लस किती वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च होईल तसेच याची किंमत काय असेल यासाठी 30 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/feed/ 0
5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 08:35:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2362 अमेजॉन इंडिया ने सध्या वनप्लस 6 च्या 6जीबी रॅम वेरिएंट वरील आॅफरची माहिती दिली आहे. पण आशा आहे की फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण डिसकाउंट सह उपलब्ध होईल.

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस ने जेवढे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत तेवढे सर्व टेक बाजारात यशस्वी झाले आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स आणि मीड बजेट मुळे वनप्लस च्या स्मार्टफोन्सना फ्लॅगशिप कीलर पण म्हटले जाते. कंपनी च्या लेटेस्ट स्मार्टफोन वनप्लस 6 ने पण त्याच यशाची पुनरावृत्ती केली आहे. स्मार्टफोन यूजर्स ने वनप्लस 6 हातोहात विकत घेतला. वनप्लस फॅन्सना भेट देत कंपनी ने या दमदार फोनची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे आणि स्मार्टफोन यूजर्सना वनप्लस 6 विकत घेण्याची सुवर्णसंधी दिली आहे.

वनप्लस 6 34,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण आता हा फ्लॅगशिप कीलर 5,000 रुपयांनी कमी म्हणजे 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे वनप्लस 6 अमेजॉन एक्सक्लूसिव फोन आहे आणि फक्त याच वेबसाइट वरून विकत घेता येतो. जर तुम्ही पण वनप्लस 6 विकत घेऊ इच्छित असाल तर हीच चांगली संधी आहे. कारण ही खास संधी फक्त दिवस असणार आहे.

वनप्लस 6 येत्या 10 ऑक्टोबर पासून 5,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. यूजर वनप्लस 6 10 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत पाच हजार कमी म्हणजे 34,999 रुपयांच्या ऐवजी 29,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. अमेजॉन इंडिया येत्या 10 ऑक्टोबरला अमेजॉन ग्रेट इंडियन सेल चे आयोजन करणार आहे आणि याच सेल मध्ये वनप्लस 6 वर कोणत्याही अटी विना 5,000 रूपयांची सूट मिळेल.

वनप्लस 6 चा एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी वर लॉन्च झाला आहे. 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे तर 8जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 39,999 रुपये आहे. अमेजॉन इंडिया ने सध्या वनप्लस 6 च्या 6जीबी रॅम वेरिएंट वरील आॅफरची माहिती दिली आहे. पण आशा आहे की फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण डिसकाउंट सह उपलब्ध होईल.

वनप्लस 6 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/feed/ 0
बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 06:22:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2180 बच्चन म्हणतात की स्मार्टफोन अनलॉक करण्याची अनोखी टेक्नोलॉजी वनप्लस 6टी मध्ये मिळेल, थोडक्यात काय तर फोन मधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर कडे त्यांनी इशारा केला आहे.

The post बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस 6 च्या यशानंतर आता स्मार्टफोन कंपनी वनप्लस पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत आहे. खुप दिवसांपासून चर्चा सुरू आहे की कंपनी वनप्लस 6 चा अजून एक नवीन वर्जन वनप्लस 6टी घेऊन येणार आहे. या फोन संबंधीत अनेक लीक पण समोर आले आहेत. पण आता स्वतः कंपनी ने वनप्लस 6टी च्या इंडिया लॉन्च ची आॅफिशियल घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वनप्लस 6टी ची घोषणा इतर कोणी नाही तर बॉलीवुड चे शंहशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन वनप्लस इंडिया चे ब्रँड एम्बेसडर आहेत. वनप्लस 6 पण अमिताभ बच्चन द्वारा लॉन्च करण्यात आला होता. तसेच आता एका टीवी व्यावसायिक जाहिरातीच्या माध्यमातून बच्चन यांनी वनप्लस 6टी च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या अॅड मध्ये अमिताभ यांनी वनप्लस 6टी हातात पकडला आहे. बच्चन म्हणतात की स्मार्टफोन अनलॉक करण्याची अनोखी टेक्नोलॉजी वनप्लस 6टी मध्ये मिळेल, थोडक्यात काय तर फोन मधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर कडे त्यांनी इशारा केला आहे.

वनप्लस 6टी साठी शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे ज्यावर ‘नोटिफाई मी’ बटन आहे. जरी कंपनी ने अजून फोनच्या लॉन्च डेट चा खुलासा केला नसला तरी बोलेले जात आहे की येत्या 17 ऑक्टोबरला कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन वनप्लस 6टी जगासमोर आणेल. लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की वनप्लस 6टी ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

The post बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/feed/ 0