वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन

फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणारी कंपनी वनप्लस गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कपंनी आपला नवीन फ्लॅगशिप फोन वनप्लस 6टी घेऊन येत आहे. वनप्लस 6टी बद्दल अनेक लीक समोर आले आहेत पण आता या लीक्स व अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. आपल्या फॅन्स व स्मार्टफोन यूजर्स ची प्रतीक्षा संपवत वनप्लस ने वनप्लस 6टी च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. वनप्लस इंडिया ने सांगितले आहे की वनप्लस 6टी येत्या 30 ऑक्टोबरला भारतात लॉन्च केला जाईल.

वनप्लस इंडिया ने आपल्या ट्वीटर हँडल वरून वनप्लस 6टी च्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. वनप्लस 6टी ऑक्टोबरच्या 30 तारखेला देशात लॉन्च होईल. वनप्लस 6टी च्या लॉन्च डेटची घोषणा करण्या सोबतच कंपनी ने वनप्लस च्या आॅफिशियल वेबसाइट वर वनप्लस 6टी च्या लॉन्च संबंधित माहिती पण दिली आहे. वनप्लस 30 ऑक्टोबरला दिल्ली मधील इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये वनप्लस 6टी च्या लॉन्च चे आयोजन करेल जे रात्री 8:30 ला सुरू होईल.

वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वनप्लस किती वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च होईल तसेच याची किंमत काय असेल यासाठी 30 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here