आज लॉन्च होत आहे वनप्लस 6टी, असा बघा लॉन्च इवेंट लाइव

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत राहिल्यानंतर आज तो दिवस आला आहे ज्यादिवशी फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध वनप्लस आपला नवीन डिवाइस लॉन्च करणार आहे. कंपनी न्यू यॉर्क मध्ये आज एक इवेंट करत आहे ज्यातून वनप्लस 6टी लॉन्च केला जाणार आहे. या फोन बद्दल मागील अनेक दिवसांपासून बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन जाहिरात करत आहेत. त्यामुळे फोन बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. भारतात हा फोन 30 नोव्हेंबरला अर्थात उद्या लॉन्च केला जाणार आहे तर एक दिवस आधी अमेरिकेत याच्या ग्लोबल लॉन्चची तयारी करण्यात आली आहे. तुम्ही हा लॉन्च इवेंट लाइव बघू शकता याची कंपनी ने व्यवस्था केली आहे.

वनप्लस 6टी च्या लॉन्च इवेंटचे आयोजन अमेरिकेत सकाळी 11 वाजल्यापासून केले जाणार आहे जो भारतीय वेळेनुसार जवळपास रात्री 8:30 वाजता सुरु होईल. तुम्ही या लिंक वर क्लिक करून लॉन्च लाइव बघू शकता किंवा मग खाली दिलेल्या वीडियो वर क्लिक करून पण बघू शकता.

वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

ओएस पाहता वनप्लस 6 कपंनी ने नवीन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केला आहे. त्यामुले नवीन मॉडेल पण नवीन ओएस वरच उपलब्ध होईल. किंमती बद्दल बोटीचे झाले तर, मिळालेल्या माहितीनुसार बेस मॉडेल 37,999 रुपयांमध्ये लॉन्च होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here