OnePlus 9E - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Feb 2021 11:57:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-and-oneplus-9e-specifications-leaked-online-64mp-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-and-oneplus-9e-specifications-leaked-online-64mp-camera-5000mah-battery/#respond Tue, 23 Feb 2021 11:57:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10140 Techmaniacs वर समोर आलेल्या नवीन रिपोर्टमध्ये OnePlus 9 Pro आणि 9E मॉडेलची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 9 Pro हार्डवेयर आणि फीचर्सच्याबाबतीत पूर्णपणे एक फ्लॅगशिप फोन असेल.

The post लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus च्या अपकमिंग वनप्लस 9 सीरीजबद्दल अनेक दिवसांपासून ऑनलाइन बातम्या समोर येत आहेत. तसेच फॅन्स पण या सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या फोन्सची आतुरतेने वाट बघत आहेत. अलीकडेच आम्ही OnePlus 9 च्या लीक मध्ये स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्हाला दिली होती. आता या सीरीजच्या अजून दोन फोन OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. अजूनतरी फोन्स बद्दल कंपनीने कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. (oneplus 9 pro and oneplus 9e specifications leaked online 64mp camera 5000mah battery)

असे असू शकतात OnePlus 9 Pro चे स्पेसिफिकेशन

Techmaniacs वर समोर आलेल्या नवीन रिपोर्टमध्ये OnePlus 9 Pro आणि 9E मॉडेलची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 9 Pro हार्डवेयर आणि फीचर्सच्याबाबतीत पूर्णपणे एक फ्लॅगशिप फोन असेल. यात Snapdragon 888 चिपसेट व्यतिरिक्त 6.7-इंच QHD+ डिस्प्ले एडेप्टिव 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाईल. तसेच लीक मध्ये समोर आले आहे कि फोनमध्ये 48MP प्राइमरी सेंसर असेल जो Hasselblad ब्रँडिंगसह येईल. फोनमध्ये 64MP अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आणि 3.3x झूम कॅमेरा असेल.

हे देखील वाचा : आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर

असे सांगण्यात आले आहे कि फोन 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. तसेच, रॅम व स्टोरेज पाहता या डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाईल.

OnePlus 9E चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9E बद्दल बोलायचे तर हा या सीरीजचा अफोर्डेबल वेरिएंट असेल. आधी समोर आलेल्या अफवांनुसार या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट असेल. लेटेस्ट लीकमध्ये पण हीच गोष्ट समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 6.5-इंचाच्या 90Hz डिस्प्लेसह FHD+ रिजोल्यूशन असेल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : अजून स्वस्त झाला बजेट कॅटेगरी मधील Redmi 9 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफीसाठी OnePlus 9E मध्ये 64-मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट असेल. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी पण असू शकते. बातमी अशी आली आहे कि वनप्लस पुढल्या महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपली वनप्लस 9 सीरीज लॉन्च करणार आहे.

The post लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-and-oneplus-9e-specifications-leaked-online-64mp-camera-5000mah-battery/feed/ 0
OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/#respond Tue, 01 Dec 2020 13:51:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9131 OnePlus 9E चे नाव पहिल्यांदा टेक मार्केटच्या समोर आले आहे. टिपस्टर मॅक्स जे. ने वनप्लसचा एक पोस्टर शेयर केला आहे ज्यावर या तिन्ही स्मार्टफोन्सची नावे लिहिण्यात आली आहेत.

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus बद्दल जेव्हपासून बातमी समोर आली आहे कि कंपनीने आपल्या नेक्स्ट स्मार्टफोन सीरीज वर काम सुरु केले आहे, तेव्हापासून वनप्लस फॅन सीरीज संबंधित सर्व लीक्स आणि रिपोर्ट्स वर नजर ठेऊन आहेत. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती कि हि सीरीज वनप्लस 9 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल ज्याअंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील. आता बातमी समोर येत आहे कि या सीरीज मध्ये एक तिसरा फोन पण असेल जो OnePlus 9E नावाने लॉन्च केला जाईल.

OnePlus 9E चे नाव पहिल्यांदा टेक मार्केटच्या समोर आले आहे. टिपस्टर मॅक्स जे. ने वनप्लसचा एक पोस्टर शेयर केला आहे ज्यावर या तिन्ही स्मार्टफोन्सची नावे लिहिण्यात आली आहेत. लीक मध्ये फोन्सच्या नावा व्यतिरिक्त इतर कोणत्याही डिटेल किंवा स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख झाला नाही, ज्यामुळे वनप्लस 9ई बाबत जास्त काही बोलणे शक्य नाही. पण स्मार्टफोन बाजारात अंदाज लावला जात आहे कि वनप्लस 9ई या सीरीजचा सर्वात छोटा मॉडेल असेल, त्यामुळे हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या एखाद्या 5G चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

वनप्लस 9 सीरीज बद्दल बोलले जात आहे कि हि सीरीज पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मधेच टेक मंचावर येईल. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट पण झाले आहेत, जिथे यांच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित अनेक महत्वाचे डिटेल्स समोर आले होते. गीकबेंच वर फोन्स अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आले होते. तसेच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते. लिस्टिंग मध्ये दोन्ही फोन्सचा 8 जीबी रॅम वेरिएंट सर्टिफाइड झाला होता.

OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro गीकबेंच वर ‘Lahaina’ कोडनेम असेलेल्या मदरबोर्ड सह दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे कोडनेम क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेटचे आहे जो बाजारात स्नॅपड्रॅगॉन 875 नावाने येईल. जवळपास निश्चित आहे कि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 एक 5G चिपसेट असेल आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत फास्ट आणि स्मूद असेल. असे म्हणता येईल कि वनप्लस 9 एक 5जी सीरीज असेल जी पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.

OnePlus 9 Pro

एक लीक मध्ये वनप्लस 9 प्रोचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. या लीकनुसार हा सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असेल आणि यात 6.67-इंचाचा कर्व्ड डिस्प्ले असेल जो स्लिम बेजल सह येईल. यात कमीत कमी 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 SoC आणि 8GB रॅम सह येईल. OnePlus 9 Pro बद्दल अफवा आहे कि फोन मध्ये 65W फास्ट-चार्जिंग आणि अँड्रॉइड 11-बेस्ड ऑक्सिजन ओएस असेल. तसेच, स्टोरेज वेरिएंट म्हणून फोन मध्ये 128GB आणि 256GB ऑप्शन असेल. तसेच सध्या OnePlus 9, OnePlus 9E आणि OnePlus 9 Pro चे डिटेल समोर आले नाहीत.

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/feed/ 0