Xiaomi ने गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये बजेट कॅटेगरी मध्ये रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या फोनच्या किंमतीत कंपनीने कपात केली आहे. जर तुम्ही पण एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप असलेला फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन विकत घेता येईल. हँडसेट नवीन किंमतीसह शाओमीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर लिस्ट आहे. परंतु कंपनीने फोनच्या किंमतीत केलेली कपात कायमस्वरूपी आहे कि नाही याची माहिती दिली नाही.
नवीन किंमत
Redmi 9 Prime च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये विकला जाईल. तुमच्या लक्षात असेल कि गेल्यावर्षी हा वेरिएंट कंपनीने 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच 4GB+128GB वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
हे देखील वाचा : 24,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे Samsung सर्वात पावरफुल फोन Galaxy S21 Ultra 5G, जाणून घ्या कुठे मिळेल हा फोन
स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी 9 प्राइमचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.53 इंचाचा एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच, प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टा-कोर (2x ARM Cortex A-75 + 6x ARM Cortex A-55) प्रोसेसरसह 12नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि eMMC 5.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Redmi 9 Prime क्चॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी शाओमी रेडमी 9 प्राइम एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन
Xiaomi Redmi 9 Prime एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा डिवायस Quick Charge 3.0 व 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,020एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
शाओमी रेडमी 9 प्राइम व्हिडीओ















