लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

OnePlus च्या अपकमिंग वनप्लस 9 सीरीजबद्दल अनेक दिवसांपासून ऑनलाइन बातम्या समोर येत आहेत. तसेच फॅन्स पण या सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या फोन्सची आतुरतेने वाट बघत आहेत. अलीकडेच आम्ही OnePlus 9 च्या लीक मध्ये स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्हाला दिली होती. आता या सीरीजच्या अजून दोन फोन OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. अजूनतरी फोन्स बद्दल कंपनीने कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. (oneplus 9 pro and oneplus 9e specifications leaked online 64mp camera 5000mah battery)

असे असू शकतात OnePlus 9 Pro चे स्पेसिफिकेशन

Techmaniacs वर समोर आलेल्या नवीन रिपोर्टमध्ये OnePlus 9 Pro आणि 9E मॉडेलची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 9 Pro हार्डवेयर आणि फीचर्सच्याबाबतीत पूर्णपणे एक फ्लॅगशिप फोन असेल. यात Snapdragon 888 चिपसेट व्यतिरिक्त 6.7-इंच QHD+ डिस्प्ले एडेप्टिव 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाईल. तसेच लीक मध्ये समोर आले आहे कि फोनमध्ये 48MP प्राइमरी सेंसर असेल जो Hasselblad ब्रँडिंगसह येईल. फोनमध्ये 64MP अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आणि 3.3x झूम कॅमेरा असेल.

हे देखील वाचा : आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर

असे सांगण्यात आले आहे कि फोन 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. तसेच, रॅम व स्टोरेज पाहता या डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाईल.

OnePlus 9E चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9E बद्दल बोलायचे तर हा या सीरीजचा अफोर्डेबल वेरिएंट असेल. आधी समोर आलेल्या अफवांनुसार या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट असेल. लेटेस्ट लीकमध्ये पण हीच गोष्ट समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 6.5-इंचाच्या 90Hz डिस्प्लेसह FHD+ रिजोल्यूशन असेल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : अजून स्वस्त झाला बजेट कॅटेगरी मधील Redmi 9 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफीसाठी OnePlus 9E मध्ये 64-मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट असेल. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी पण असू शकते. बातमी अशी आली आहे कि वनप्लस पुढल्या महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपली वनप्लस 9 सीरीज लॉन्च करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here