Online MoviesOTT - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 02 Dec 2022 09:42:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रामायणातील ‘राम सेतू’ ची गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘या’ OTT वर रिलीज झाला, परंतु… https://www.91mobiles.com/marathi/akshay-kumar-ram-setu-movies-ott-release-date-prime-video/ https://www.91mobiles.com/marathi/akshay-kumar-ram-setu-movies-ott-release-date-prime-video/#respond Fri, 02 Dec 2022 09:42:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15618 अक्षय कुमारचा चित्रपट ‘रामसेतु’ चित्रपटगृहांमध्ये 25 ऑक्टोबरला रिलीज झाला होता जो आता मोठ्या पडद्यावरून खाली उतरवण्यात आला आहे. परंतु जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. कारण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सह जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा देखील आहेत. चला जाणून […]

The post रामायणातील ‘राम सेतू’ ची गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘या’ OTT वर रिलीज झाला, परंतु… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अक्षय कुमारचा चित्रपट ‘रामसेतु’ चित्रपटगृहांमध्ये 25 ऑक्टोबरला रिलीज झाला होता जो आता मोठ्या पडद्यावरून खाली उतरवण्यात आला आहे. परंतु जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. कारण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सह जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा देखील आहेत. चला जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे आणि तो पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल.

या ओटीटी साइटवर रिलीज झाला राम सेतू

Ram Setu चित्रपट कोणत्याही गाजावाजाविना थेट ओटीटी प्लेटफ्रॉम अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. अक्षयचा हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर सध्या रेंटसाठी उपलब्ध आहे. म्हणजे जरी तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन असलातरी हा चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला Rent वर घ्यावा लागेल. चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 199 रुपये द्यावे लागतील. रेंट दिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पुढील 30 दिवसांत कधीही पाहू शकता, परंतु एकदा पाहायला सुरु केल्यास तुम्हाला हा चित्रपट 48 तासात पूर्ण पाहावा लागेल. हे देखील वाचा: खास बजेट युजर्ससाठी आला सुंदर Infinix ZERO 5G 2023; 13GB RAM सह मिळतोय 50MP कॅमेरा

राम सेतुची स्टार कास्ट

चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडीज (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मानं केलं आहे. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ चित्रपट रिसर्चवर आधारित आहे, ज्यात अक्षय कुमारच्या पात्राने शोध घेतला आहे राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ स्टोरवरून चित्रपट भाड्यानं घेणं त्या ग्राहकांसाठी चांगलं आहे ज्यांना Amazon Prime सब्सक्रिप्शन घ्यायचं नाही. तसेच या प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचा अर्ली अ‍ॅक्सेस थिएटरच्या एका मूव्ही तिकीटपेक्षा खूप स्वस्त असतो. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ स्टोरवर तुम्हाला जगभरातील चित्रपटांचा आनंद घेता येतो. यात हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सारख्या भाषांचा समावेश आहेच. येत्या काळात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर अनेक नवीन चित्रपट व सीरीज येत आहेत. हे देखील वाचा: वर्षभर Airtel SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवायचं आहे का? हा आहे कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन, डेटा आणि कॉलिंग मोफत

राम सेतु बॉक्स ऑफिस कलेक्शन

25 ऑक्टोबर 2022 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या ‘राम सेतु’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काही विशेष नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर निराशाजनक कामगिरी केली. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाचं इतकं कौतुक झालेलं दिसलं नाही.

The post रामायणातील ‘राम सेतू’ ची गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘या’ OTT वर रिलीज झाला, परंतु… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/akshay-kumar-ram-setu-movies-ott-release-date-prime-video/feed/ 0