Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच

Infinix ZERO 5G 2023 स्मार्टफोन गेल्या महिन्यात समोर आला होता जिथे कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर हा इनफिनिक्स मोबाइल फुल डिटेल्ससह लिस्ट करण्यात आला होता. आज इनफिनिक्सनं आपल्या हा नवीन मोबाइल फोन झिरो 5जी 2023 अधिकृतपणे लाँच केला आहे. 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery ची पावर असलेला Infinix ZERO 5G 2023 बजेट सेगमेंटमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस 19,400 रुपयांच्या आसपास आहे.

Infinix ZERO 5G 2023 Price

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, ज्याच्या जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Infinix ZERO 5G 2023 ग्लोबल मार्केटमध्ये 239 डॉलरमध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 19,400 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन बाजारात Pearl White, Coral Orange आणि Submariner Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 Specifications

इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन 6.78 इंचाच्या लार्ज डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनवर काम करतो. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनची थिकनेस 8.9एमएम आहे तर वजन 201 ग्राम आहे.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 अँड्रॉइड 12 वर आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो. हा इनफिनिक्स फोन 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 5 जीबी रॅम एक्सपेंशन टेक्नॉलॉजीसह येतो. गरज पडल्यास हा इनफिनिक्स स्मार्टफोन 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. या फोनमध्ये 256जीबीची इंटरनल स्टोरेज आहे.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Infinix ZERO 5G 2023 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix ZERO 5G 2023 launched Price and specifications officially announced

Infinix ZERO 5G 2023 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स झिरो 5जी 2023 मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here