वर्षभर Airtel SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवायचं आहे का? हा आहे कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन, डेटा आणि कॉलिंग मोफत

जर तुम्ही Airtel युजर्स असाल आणि दर महिन्याला रिचार्ज करण्याचं झंझट नको असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला आज या लेखात एयरटेलच्या अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत जो तुमचं सिम एक वर्षभर अ‍ॅक्टिव्ह ठेवेल आणि याचा खर्च रोजच्या हिशोबाने फक्त 4.9 रुपये येईल. इतकेच नव्हे तर दीर्घ वैधतेशिवाय या प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अनेक अ‍ॅडिशनल बेनिफिट्स दिले जात आहेत. चला जाणून घेऊया एयरटेलच्या या प्लॅनबाबत जो तुमचा नंबर एक वर्षांपर्यंत कोणत्याही झंझटविना अ‍ॅक्टिव्ह ठेवेल.

4.9 रुपये रोजचा खर्च

एयरटेलच्या ज्या रिचार्ज प्लॅन बाबत आम्ही बोलत आहोत तो कंपनीचा सर्वात स्वस्त 365 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज आहे. याची किंमत पाहता 1799 रुपये आहे. परंतु, रोजचा खर्च पाहता फक्त 4.9 रुपये होतात. त्यामुळे हा प्लॅन अशा लोकांसाठी बेस्ट आहे, ज्यांच्याकडे ऑफिस आणि घरी देखील वायफाय आहे आणि फक्त कॉलिंगसाठी सिम आवश्यक आहे. तसेच सेकंडरी सिम म्हणून एयरटेलचा वापर करणारे ग्राहक देखील या प्लॅनचा वापर करू शकतात. हे देखील वाचा: आणखी काय हवं! 11,999 रुपयांमध्ये 6000mAh Battery आणि 8GB RAM; Tecno Pova 4 ची माहिती लीक

फ्री कॉलिंगसह मिळतोय डेटाही

वर सांगितल्याप्रमाणे या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील दिला जात आहे. तसेच, इंटरनेट वापरण्यासाठी युजर्सना एकूण 24 GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट मिळत नाही. प्लॅनमध्ये मिळणारा 24 GB इंटरनेट डेटा 365 दिवसांत कधीही कितीही वापरता येईल.

या प्लॅननं रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एकूण 3600 SMS देखील मोफत मिळतात. तसेच ग्राहकांना अ‍ॅडिशनल बेनिफिट्स म्हणून अपोलो 24/7 सर्कलचं सब्सस्क्रिप्शन देण्यात आला आहे. तसेच विंक म्यूजिकच्या मदतीनं तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युजिकचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनमध्ये फ्री हॅलोट्यूनची सुविधा देखील एयरटेल ग्राहकांना देत आहे. हे देखील वाचा: 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर 7 हजारांची सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G

एयरटेल 5G चा विस्तार सुरु

टेलीकॉम सर्व्हिस प्रोवाडर भारती एयरटेल भारतातील सर्वात पहिली कंपनी आहे जिने 5G सर्व्हिस सुरु केली आहे. एकीकडे जियोची 5G सेवा इन्व्हाईट बेस असताना एयरटेल सर्व ग्राहकांना 5Gदेत आहे. आता कंपनीनं आपल्या नेक्स्ट जेनरेशन नेटवर्कचा विस्तार सुरु केला आहे. अलीकडेच बिहारमधील पटनामध्ये आपली 5जी सेवा सुरु केली आहे. तसेच कंपनीनं पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे की एयरटेलच्या ग्राहकांना सध्याच्या 4जी स्पीडपेक्षा 20-30 पट जास्त वेगानं नेटवर्कचा वापर करता येईल. तसेच कंपनीचा दावा आहे की ग्राहकांना गेमिंग, मल्टीपल चॅट, इंस्टंट फोटो अपलोड आणि एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग सारख्या सर्व्हिस फास्ट स्पीडनं वापरता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here