Online - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 21 Jun 2023 10:42:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/ https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/#respond Wed, 21 Jun 2023 10:42:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21687 विजेचं बिल चेक करणं खूप सोपं झालं आहे. जरी तुम्हाला वीज बिलाची हार्ड कॉपी, एसएमएस किंवा ईमेल मिळाला नसेल तरी वीज बिलाची माहिती ऑनलाइन मिळवू शकता. ह्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या वीज डिस्कॉम विभागाच्या वेबसाइट किंवा पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pe) इत्यादी टूल्सची मदत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्सच्या मदतीनं तुमचं विजेचं […]

The post विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विजेचं बिल चेक करणं खूप सोपं झालं आहे. जरी तुम्हाला वीज बिलाची हार्ड कॉपी, एसएमएस किंवा ईमेल मिळाला नसेल तरी वीज बिलाची माहिती ऑनलाइन मिळवू शकता. ह्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या वीज डिस्कॉम विभागाच्या वेबसाइट किंवा पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pe) इत्यादी टूल्सची मदत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्सच्या मदतीनं तुमचं विजेचं बिल चेक करण्याची पद्धत सांगणार आहोत.

विजेचं बिल ऑनलाइन चेक करण्याची पद्धत

  • ऑफिशियल वेबसाइटवरून
  • फोनपे अ‍ॅपवरून
  • गुगल पे आणि अ‍ॅमेझॉन पेवरून

प्रत्येक राज्यात ऑनलाइन वीज बिल चेक करण्याची आणि भरण्याची व्यवस्था आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वीज विभागाने सर्व माहिती ऑनलाइन केली आहे. युजर्स फक्त एका क्लिकमध्ये अकाऊंटची संपूर्ण माहिती मिळवू शकतात म्हणजे विज बिल घरी न आल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर बिल जाणून घेण्यासाठी वीज कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या गरज नाही. सर्व ऑनलाइन चेक करता येईल.

ऑफिशियल वेबसाइटवरून कसं चेक करायचं वीज बिल

जर ताज्या वीज बिलाची माहिती हवी असेल तर तुम्हाला राज्याच्या वीज विभागाच्या अधिकृत वेबसाइट जावं लागेल. तसेच काही यूपीआय अ‍ॅप्सवरून देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही. ही माहिती तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरच पाहू शकता. ह्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असावं.

ऑफिशियल वेबसाइटवरून ऑनलाइन वीज बिल चेक करण्यासाठी वीज कनेक्शन नंबर तुम्हाला माहिती असाल पाहिजे. जो प्रत्येक बिलावर छापलेला असतो. ह्याच्या मदतीनं वीज बिलाची माहिती मिळवू शकता.

तसेच जर तुम्हाला वीज बिलचा भरणा ऑनलाइन करायचा असेल तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयचा देखील वापर करू शकता.

महाराष्ट्रातील वीज बिल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.

PhonePe वरून चेक करा वीज बिल

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये PhonePe अ‍ॅप डाउनलोड करा. त्यानंतर अ‍ॅप ओपन करा.
  • इथे ‘रिचार्ज अँड पे बिल’ सेक्शन मध्ये तुम्हाला ‘इलेक्ट्रिसिटी’ चा ऑप्शन दिसेल.
  • इलेक्ट्रिसिटी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर निवडा. इथे तुम्हाला अकाऊंट नंबर किंवा ग्राहक क्रमांक द्यावा लागेल. ही माहिती दिल्यावर लेटेस्ट वीज बिल पाहता येईल.

Google Pay, BHIM से चेक करा वीज बिल

इतर अ‍ॅप्स जसे की Google Pay, BHIM, Amazon Pay, Freecharge वरून देखील तुम्ही विजेचं बिल चेक करू शकता आणि पेमेंट देखील करू शकता. इथे देखील तुम्हाला तुमचा प्रोव्हायडर निवडावा लागेल आणि नंतर ग्राहक क्रमांक किंवा अकाऊंट नंबर टाकून थेट बिल पाहता येईल.

The post विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/feed/ 0
Exclusive: Vivo, Realme, Oppo आणि Samsung फोन आता मिळणार नाहीत ऑनलाइन एक्सक्लूसिव https://www.91mobiles.com/marathi/no-more-online-exclusive-phone-from-vivo-oppo-realme-and-samsung/ https://www.91mobiles.com/marathi/no-more-online-exclusive-phone-from-vivo-oppo-realme-and-samsung/#respond Fri, 27 Dec 2019 14:09:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6144 सध्या ज्या Z आणि U सीरीज ऑनलाइन एक्सक्लूसिव आहेत त्या पण नवीन वर्षात ऑफलाइन मिळतील

The post Exclusive: Vivo, Realme, Oppo आणि Samsung फोन आता मिळणार नाहीत ऑनलाइन एक्सक्लूसिव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन वादहत असलेल्या मागणीमुळे ऑफलाइन रिटेलर्सच्या समस्या वाढत होत्या. यामुळे ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोशियेशनने आवाज उठवत होती आणि आज त्याला यश मिळाले आहे. असोशियेशनने आज एक प्रसिद्धी जाहीर केले आहे ज्यात माहिती देण्यात आली आहे Vivo आता कोणताही फोन ऑनलाइन किंवा ऑफलाइन एक्सक्लूसिव लॉन्च करणार नाही. आता सर्व मॉडेल, समान प्राइस, एकाच वेळी आणि एकाच ऑफर सह ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी उपलब्ध होतील.

आम्हाला जेव्हा हि बातमी मिळाली तेव्हा आम्ही निकुंज पटेल, सेक्रेटरी- गुजरात मोबाईल एसोशियेशन, अहमदाबाद यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी बरीच माहिती दिली. ते म्हणाले कि “हे ऑफलाइन मोबाईल रिटेलर्सचे मोठे यश आहे. यासाठी आम्ही अनेक दिववसांपासून प्रयत्न करत होतो ज्याला यश मिळाले आहे. Vivo ने म्हटले आहे कि 2020 पासून कंपनीचे सर्व फोन सेम टाइम, सेम प्राइस आणि सेम ऑफर सोबतच दोन्ही ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच सध्या ज्या Z आणि U सीरीज ऑनलाइन एक्सक्लूसिव आहेत त्या पण नवीन वर्षात ऑफलाइन मिळतील.”

याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितले कि “फक्त Vivo चा नाही तर डिसेंबर 2019 नंतर Oppo, Realme आणि Samsung चे पण सर्व फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन मध्ये एक साथ एकाच वेळी उपलब्ध होतील. Realme ने X2 साठी आतापासून हीच रणनीती सुरु केली आहे. रियलमीने म्हटले आहे कि आता त्यांचा प्रत्येक फोन ऑनलाइन सोबतच ऑफलाइन त्यांच्या प्रीफर्ड पार्टनर्स कडे समान किंमत आणि ऑफर मध्ये उपलब्ध होईल. तसेच एका आठवड्यातच दुसऱ्या रिटेल पार्टनर कडे पण उपलब्ध होईल आणि ऑफर मध्ये कोणताही बदल नसेल.”

ऑनलाइन एक्सक्लूसिवमुळे ऑफलाइन रिटेलर्सना अडचण येत होती. कारण तिथे कमी किंमतीत यूजर्सना चांगले स्पेसिफिकेशन असलेले फोन मिळत होते. तसेच क्रेडिट आणि डेबीट कार्ड वर चांगल्या ऑफर्स मिळत होत्या. त्यामुळे ऑनलाइन मोबाईल विकत घेणाऱ्या यूजर्सची संख्या वेगाने वाढत आहे तसेच ऑफलाइन रिटेलर्सना खूप नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु या बातमीमुळे ऑफलाइन रिटेलर्स दिलासा मिळेल.

सॅमसंग बद्दल बोलायचे तर कंपनी ऑफलाइन स्टोर वर खूप मजबूत आहे पण 2019 मध्ये त्यांनी आपल्या सीरीजची सुरवात केली होती जी खास ऑनलाइन साठी होती. परंतु वर्ष संपण्याच्या आधी सॅमसंगने घोषणा केली कि पुढील M सीरीजचा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन एकाच वेळी आणि एकाच प्राइस ऑफर सह येईल. तसेच ओपोची K सीरीज ऑनलाइन एक्सक्लूसिव असते आणि आता ती पण ऑफलाइन उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे भारतातील नंबर एक स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अशी कोणतीही घोषणा केली नाही. ऑनलाइन व्यतिरिक्त ऑफलाइन पण कंपनीची चांगली पकड आहे. कंपनी अजूनही शांत आहे पण रिटेलर्स याविरुद्ध आवाज उठवत आहेत.

The post Exclusive: Vivo, Realme, Oppo आणि Samsung फोन आता मिळणार नाहीत ऑनलाइन एक्सक्लूसिव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/no-more-online-exclusive-phone-from-vivo-oppo-realme-and-samsung/feed/ 0
सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/#respond Sat, 23 Nov 2019 06:35:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5855 अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आजकल इंटरनेट स्कॅमबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते. आता याच्या जाळ्यात मोबाईल पेमेंट कंपनी Paytm चे यूजर्स अडकत आहेत यासाठी कंपनीने सावधानतेचा इशारा दिला आहे. या सूचनेत यूजर्सना KYC मध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या मेसेज पासून सावध राहण्यास सांगितले आहे.

यासाठी कंपनीने वॉर्निंग मध्ये लिहिले आहे कि जर तुम्हाला Paytm KYC करण्यासाठी एखादा एसएमएस किंवा कॉल आला असेल आणि एखादा ऍप डाउनलोड करण्यास सांगितले गेले असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये. तुमची माहिती मिळवण्यासाठी तुमची केलेली हि फसवणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीची हि पद्धत वापरली जात आहे.

येत आहे असा फ्रॉड मेसेज

Paytm KYC साठी वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड मेसेज केले जात आहेत. यातील काहींमध्ये लिहिलेले असते कि जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुम्ही पेटीएम अकाउंट वापरू शकणार नाही. इतकेच नव्हे तर फ्रॉड मेसेज मध्ये असे पण लिहिलेले असते कि KYC पूर्ण होईपर्यंत तुमच्या पेटीएम अकाउंट वरून काही पैसे होल्ड वर राहतील.

इथे करा KYC

पेटीएम KYC फक्त अधिकृत KYC पॉइंट्स वर जाऊन किंवा पेटीएम प्रतिनिधीला घरी बोलवून पूर्ण केली जाते. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे KYC साठी कोणत्याप्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि जर शुल्क घेतले गेल्यास तुम्ही पेटीएम कस्टमर केयर वर कॉल करून याची तक्रार करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

फसवणूक टाळण्याचे उपाय

पेटीएम चा कर्मचारी यूजर कडून ओटीपी, पिन, पासवर्ड, पासवर्ड रीसेट लिंक, डेबिट/क्रेडिट कार्ड सीवीवी, पिन किंवा बॅंक डीटेल्स मागू शकत नाही. त्यामुळे पर्सनल डीटेल्स कोणाला देऊ नये.

The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/feed/ 0