सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध

आजकल इंटरनेट स्कॅमबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते. आता याच्या जाळ्यात मोबाईल पेमेंट कंपनी Paytm चे यूजर्स अडकत आहेत यासाठी कंपनीने सावधानतेचा इशारा दिला आहे. या सूचनेत यूजर्सना KYC मध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या मेसेज पासून सावध राहण्यास सांगितले आहे.

यासाठी कंपनीने वॉर्निंग मध्ये लिहिले आहे कि जर तुम्हाला Paytm KYC करण्यासाठी एखादा एसएमएस किंवा कॉल आला असेल आणि एखादा ऍप डाउनलोड करण्यास सांगितले गेले असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये. तुमची माहिती मिळवण्यासाठी तुमची केलेली हि फसवणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीची हि पद्धत वापरली जात आहे.

येत आहे असा फ्रॉड मेसेज

Paytm KYC साठी वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड मेसेज केले जात आहेत. यातील काहींमध्ये लिहिलेले असते कि जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुम्ही पेटीएम अकाउंट वापरू शकणार नाही. इतकेच नव्हे तर फ्रॉड मेसेज मध्ये असे पण लिहिलेले असते कि KYC पूर्ण होईपर्यंत तुमच्या पेटीएम अकाउंट वरून काही पैसे होल्ड वर राहतील.

इथे करा KYC

पेटीएम KYC फक्त अधिकृत KYC पॉइंट्स वर जाऊन किंवा पेटीएम प्रतिनिधीला घरी बोलवून पूर्ण केली जाते. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे KYC साठी कोणत्याप्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि जर शुल्क घेतले गेल्यास तुम्ही पेटीएम कस्टमर केयर वर कॉल करून याची तक्रार करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

फसवणूक टाळण्याचे उपाय

पेटीएम चा कर्मचारी यूजर कडून ओटीपी, पिन, पासवर्ड, पासवर्ड रीसेट लिंक, डेबिट/क्रेडिट कार्ड सीवीवी, पिन किंवा बॅंक डीटेल्स मागू शकत नाही. त्यामुळे पर्सनल डीटेल्स कोणाला देऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here