विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

विजेचं बिल चेक करणं खूप सोपं झालं आहे. जरी तुम्हाला वीज बिलाची हार्ड कॉपी, एसएमएस किंवा ईमेल मिळाला नसेल तरी वीज बिलाची माहिती ऑनलाइन मिळवू शकता. ह्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या वीज डिस्कॉम विभागाच्या वेबसाइट किंवा पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pe) इत्यादी टूल्सची मदत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्सच्या मदतीनं तुमचं विजेचं बिल चेक करण्याची पद्धत सांगणार आहोत.

विजेचं बिल ऑनलाइन चेक करण्याची पद्धत

  • ऑफिशियल वेबसाइटवरून
  • फोनपे अ‍ॅपवरून
  • गुगल पे आणि अ‍ॅमेझॉन पेवरून

प्रत्येक राज्यात ऑनलाइन वीज बिल चेक करण्याची आणि भरण्याची व्यवस्था आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वीज विभागाने सर्व माहिती ऑनलाइन केली आहे. युजर्स फक्त एका क्लिकमध्ये अकाऊंटची संपूर्ण माहिती मिळवू शकतात म्हणजे विज बिल घरी न आल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर बिल जाणून घेण्यासाठी वीज कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या गरज नाही. सर्व ऑनलाइन चेक करता येईल.

ऑफिशियल वेबसाइटवरून कसं चेक करायचं वीज बिल

जर ताज्या वीज बिलाची माहिती हवी असेल तर तुम्हाला राज्याच्या वीज विभागाच्या अधिकृत वेबसाइट जावं लागेल. तसेच काही यूपीआय अ‍ॅप्सवरून देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही. ही माहिती तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरच पाहू शकता. ह्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असावं.

ऑफिशियल वेबसाइटवरून ऑनलाइन वीज बिल चेक करण्यासाठी वीज कनेक्शन नंबर तुम्हाला माहिती असाल पाहिजे. जो प्रत्येक बिलावर छापलेला असतो. ह्याच्या मदतीनं वीज बिलाची माहिती मिळवू शकता.

तसेच जर तुम्हाला वीज बिलचा भरणा ऑनलाइन करायचा असेल तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयचा देखील वापर करू शकता.

महाराष्ट्रातील वीज बिल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.

PhonePe वरून चेक करा वीज बिल

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये PhonePe अ‍ॅप डाउनलोड करा. त्यानंतर अ‍ॅप ओपन करा.
  • इथे ‘रिचार्ज अँड पे बिल’ सेक्शन मध्ये तुम्हाला ‘इलेक्ट्रिसिटी’ चा ऑप्शन दिसेल.
  • इलेक्ट्रिसिटी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर निवडा. इथे तुम्हाला अकाऊंट नंबर किंवा ग्राहक क्रमांक द्यावा लागेल. ही माहिती दिल्यावर लेटेस्ट वीज बिल पाहता येईल.

Google Pay, BHIM से चेक करा वीज बिल

इतर अ‍ॅप्स जसे की Google Pay, BHIM, Amazon Pay, Freecharge वरून देखील तुम्ही विजेचं बिल चेक करू शकता आणि पेमेंट देखील करू शकता. इथे देखील तुम्हाला तुमचा प्रोव्हायडर निवडावा लागेल आणि नंतर ग्राहक क्रमांक किंवा अकाऊंट नंबर टाकून थेट बिल पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here