Oppo K10 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Jul 2022 09:17:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-oppo-k10-4g-and-5g-smartphone-buy-from-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-oppo-k10-4g-and-5g-smartphone-buy-from-flipkart/#respond Thu, 07 Jul 2022 09:17:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11193 Oppo K10 4G आणि Oppo K10 5G स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

The post Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo नं आपल्या बजेट फ्रेंडली के सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन लौंच केले होते. Oppo K10 4G आणि Oppo K10 5G स्मार्टफोन भारतात परवडणाऱ्या किंमतीत सादर करण्यात आले होते. आता याच हँडसेटवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart जबरदस्त डिस्काउंट देत आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शतक. पुढे आम्ही Oppo K10 4G आणि Oppo K10 5G स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफरची माहिती दिली आहे.

Oppo K10 4G आणि 5G वर मोठा डिस्काउंट

Oppo K10 4G आणि Oppo K10 5G स्मार्टफोन स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळत आहे. ओप्पोचे हे दोन्ही स्मार्टफोन सिटी बँक आणि बँक ऑफ बडौदाच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास ही सूट मिळेल. त्यामुळे फ्लिपकार्टवर 14,999 रुपयांचा Oppo K10 4G स्मार्टफोन 11,990 रुपयांमध्ये मिळेल. तर 14,990 रुपयांमध्ये Oppo K10 5G स्मार्टफोन विकत घेता येईल, जो एरव्ही 17,999 रुपयांमध्ये विकला जातो. हे देखील वाचा: Hero Splendor सारखी दिसते ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक, फुल चार्जमध्ये 140 Km ची रेंज

Oppo K10 4G आणि 5G ची किंमत

Oppo K10 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत. फोनच्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 16,990 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Oppo K10 5G स्मार्टफोनचा एकमेव 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ओप्पोचे दोन्ही स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत.

Oppo K10 4G स्पेसिफिकेशन्स

Oppo K10 मध्ये 6.59 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU आहे.फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो. Oppo च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W SuperVooc फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. हे देखील वाचा: स्वस्तात अनलिमिटेड एंटरटेनमेंट! फक्त 149 रुपयांमध्ये 15 OTT प्लॅटफॉर्मची मजा; हजारो मुव्हीज आणि शो

Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek चा Dimensity 810 5G प्रोसेसर मिळतो. ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा प्रायमरी आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. सोबतीला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर चालतो. ओप्पो के10 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

The post Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-oppo-k10-4g-and-5g-smartphone-buy-from-flipkart/feed/ 0