Hero Splendor सारखी दिसू शकते ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक

बेंगळुरूमधील इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरर ADMS नं Boxer नावाची एक नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल (Electric Motorcycle) सादर केली आहे. ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईकची डिजाईन मोठ्याप्रमाणावर Hero Splendor सारखी दिसत आहे. अजूनतरी या बाईकबाबत जास्त माहिती समोर आली नाही. परंतु इकोमोड मध्ये ही 140 km ची रेंज देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. यात लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो हब माउंटेड मोटरला पावर पाठवतो. ADMS Boxer मध्ये तीन राईड मोड तर मिळतात सोबत एक रिवर्स मोड देखील देण्यात आला आहे. आता असे फीचर जवळपास सर्वच इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये दिसू लागले आहेत.

ADMS Boxer Electric Motorcycle चे फीचर्स

एडीएमएस बॉक्सर (ADMS Boxer) मध्ये आयताकृती हेडलॅम्प, फ्रंट काउल, फ्रंट आणि रियर मडगार्ड, फ्यूल टँक, सीट डिजाइन आणि ग्रॅब रेल आहेत. जर तुम्ही लांबून ही बाईक बघितली तर ही तुम्हाला हीरो स्प्लेंडरच वाटेल. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक अब्जॉर्बरचा सस्पेंशन सेटअप देखील स्प्लेंडर सारखा वाटतो.

इलेक्ट्रिक बाईक (electric bike) असल्यामुळे ADMS Boxer मध्ये काही खास फीचर्स देखील आहेत. यात वेगवेगळ्या हँडलबार डिजाइन आणि पोजिशनिंग, क्रोम-टिप्ड ग्रिप्स आणि यूनिक स्विच क्यूब आहे, तसेच कॉकपिट सेक्शन आणि ट्विन पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये ओळखीची डिजाइन मिळते. फ्यूल गेज बॅटरी पर्सेंटेज इंडिकेटरमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. लेफ्ट पॉडमध्ये स्प्लेंडर प्रमाणेच स्पीडोमीटर आणि मीलोमीटर आहे. डायलमधील ग्राफिक्स स्प्लेंडरपेक्षा वेगळे आहेत. ADMS Boxer चा मिड-सेक्शन पूर्णपणे फेयर्ड आहे आणि बॅटरी पॅक काढण्यासाठी कोणतीही ओपनिंग नाही.

ADMS चे इलेक्ट्रिक व्हेईकल

ADMS च्या इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलियोमध्ये जास्तीजास्त दुचाकी वाहनांची रेंज 100-120 km आहे. कंपनीच्या बेस्टसेलर ADMS-TTX इलेक्ट्रिक स्कूटरची रेटिंग 1,500W आहे. ग्राहक 60V/30AH आणि 72V/45AH च्या बॅटरी ऑप्शन पैकी एकाची निवड करू शकतात. बाईक चार्जिंग टाइम 4-8 तास आणि बॅटरी तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते. यात तुम्हाला सेंटर लॉकिंग, अँटी-थेफ्ट अलार्म आणि कीलेस एंट्री सारखे फीचर्स मिळतात. तसेच मोबाईल अ‍ॅप कनेक्टिव्हिटी देखील आहे. स्कूटर आयसीएटी आणि एआरएआय सर्टिफाइड आहे.

मोटरसायकल आवडणाऱ्या लोकांसाठी ADMS M3 चा एक पर्याय उपलब्ध आहे, जिचा टॉप स्पीड ताशी 70 km आहे. बाईकमध्ये 72V, 45AH च्या बॅटरीचा वापर करण्यात आला आहे, जी जवळपास 5-6 तासांमध्ये फुलचार्ज होते. ADMS M3 देखील ICAT द्वारे सर्टिफाय करण्यात आली आहे. कंपनी आगामी काळात एक ई-बुलेट सादर करू शकते, जिच्यात 72V, 90AH बॅटरी पॅक मिळेल, जो 3000/4000 W मोटरला विजेचा पुरवठा करेल. हिचा टॉप स्पीड ताशी 120 km असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here