149 रुपये दरमाहमध्ये 15 OTT प्लॅटफॉर्मची मजा; एयरटेलनं आणला Xstream चा नवा प्लॅन

भारतात दर्शक एंटरटेनमेंटसाठी आता सिनेमा हॉल सोबतच ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणजे OTT कडे जात आहेत. स्वस्त डेटा, स्वस्त मोबाईल्स आणि आवडीचे शोज बघण्याच्या स्वातंत्र्यामुळे OTT ला भारतात चालना मिळत आहे. म्हणून टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना रिचार्ज सोबत ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देत आहेत. परंतु वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळे शोज असतात, एका प्लॅनमध्ये सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सस्क्रिप्शन सहज मिळत नाही.

परंतु एयरटेलनं यावर देखील एक उपाय शोधून काढला आहे. Airtel Xstream Premium पॅकमध्ये अनेक ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मचा कंटेंट अ‍ॅक्सेस करता येतो. या प्लॅन्सची सुरुवात 149 रुपये प्रतिमाहपासून सुरु होत आहे. ही ऑफर मर्यदित कालावधीसाठी देण्यात आली आहे, या पॅकची मूळ किंमत 999 रुपये आहे. जर तुम्ही एकत्र अनेक ओटीटी अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर एयरटेल एक्सट्रीम प्रीमियमच्या या डिस्काउंटेड ऑफरचा विचार तुम्ही करू शकता. चला जाणून घेऊया ऑफरबाबत सर्वकाही. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, 150W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह रियलमीचा फोन येतोय

10,000 पेक्षा जास्त चित्रपट एकाच ठिकाणी

Airtel नं दावा केला आहे की, Xstream सर्व्हिसमध्ये 10,000 पेक्षा जास्त चित्रपट, टीव्ही शो आणि ओरिजनल्सचा समावेश आहे. यात तुम्हाला इंग्लिशसह 13 भाषांमधील कंटेंट मिळेल. Airtel Xstream Android आणि iOS डिवाइससाठी उपलब्ध आहे. तसेच, Airtel Xstream Box किंवा Xstream app च्या माध्यमातून हा कंटेंट टीव्हीवर देखील अ‍ॅक्सेस करता येईल. विशेष म्हणजे युजर्स हा कंटेंट आपल्या Android TV किंवा Fire TV वर Airtel Xstream अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून बघू शकतील.

15 ओटीटी एकाच सब्सस्क्रिप्शनमध्ये

Airtel Xstream अ‍ॅप आणि वेबसाईटवर एकत्र 15 ओटीटीचं सब्सक्रिप्शन मिळेल. ज्यात SonyLIV, Lionsgate Play, Eros Now, ManoramaMax, Hoichoi, ShemarooMe, Ultra, Epic On, ShortsTV, KLIKK, Divo, Dollywood Play आणि Namma Flix च्या कंटेंटचा अ‍ॅक्सेस देण्यात येईल. हे प्लॅटफॉर्म्स दर्जेदार हॉलिवूड, बॉलिवूड, मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपट आणि शोजनी भरले आहेत. हे देखील वाचा: सरकार रेकॉर्ड करणार तुमचे सर्व कॉल्स, New Communication Rule उद्यापासून लागू! तुम्हाला आलाय का मेसेज?

एयरटेल एक्स्ट्रीम म्हणजे काय?

एयरटेल एक्स्ट्रीम हा एक नव्या जमान्याचा DTH टीव्ही बॉक्स आहे. याच्या मध्यमातून तुम्ही कोणत्याही टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये कनवर्ट करू शकता. यात अँड्रॉइड पाय 9.0 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. सोबतीला गुगल प्ले-स्टोरचा अ‍ॅक्सेस मिळतो, त्यामुळे वरील प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त इतर कोणतंही स्ट्रीमिंग अ‍ॅप देखील तुम्ही इन्स्टॉल करून करून वापरू शकता. इतकेच नव्हे तर एयरटेल एक्स्ट्रीमच्या सुविधा एका अ‍ॅपमधून देखील वापरू शकता. यासाठी तुमच्याकडे एयरटेल एक्स्ट्रीम बॉक्स असण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here