OPPO Reno 8T 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:06:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/ https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/#respond Mon, 30 Jan 2023 06:05:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17329 काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता Ranbir Kapoor चा एका व्हिडीओ इंटरनेटवर वायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक फॅन रणबीर सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सेल्फीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे रणबीरनं त्या फॅनचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनेत्यावर भडकले होते परंतु आता समोर आलं आहे की हा व्हिडीओ आगामी OPPO Reno 8T […]

The post …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 8T 5G फोन 3 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • या फोनच्या जाहिरातीत झळकला रणबीर कपूर.
  • 10 फेब्रुवारीपासून रेनो 8टी 5जी फोनची विक्री सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता Ranbir Kapoor चा एका व्हिडीओ इंटरनेटवर वायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक फॅन रणबीर सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सेल्फीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे रणबीरनं त्या फॅनचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनेत्यावर भडकले होते परंतु आता समोर आलं आहे की हा व्हिडीओ आगामी OPPO Reno 8T 5G ची जाहिरात होती आणि कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर पूर्ण व्हिडीओ शेयर करून OPPO Reno 8T 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. ओप्पोनं ऑफिशियल घोषणा केली आहे की रेनो 8टी 5जी फोन येत्या 3 फेब्रुवारीला भारतात लाँच केला जाईल.

OPPO Reno 8T 5G India Launch

ओप्पो इंडियानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट शेयर करून घोषणा केली आहे की रेनो 8टी 5जी फोन 3 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. कंपनीनं रेनो 8टी 4जी मॉडेल बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही, आशा आहे की त्याच दिवशी कंपनी या फोनची घोषणा करेल. आता OPPO Reno 8T 5G चा लाँच कफंर्म झाला आहे आणि 3 फेब्रुवारीला ऑफिशियल झाल्यानंतर फोनची विक्री 10 फेब्रुवारीपासून सुरु होऊ शकते. हे देखील वाचा: दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळेल बेस्ट किंमत

OPPO Reno 8T 5G India Price

ओप्पो रेनो 8टी 5जी फोनबद्दल चर्चा आहे की भारतीय बाजारात कंपनी हा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजसह लाँच करेल. या फोनची किंमत 29,999 रुपये असू शकते. तसेच या फोनचे एका पेक्षा जास्त रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट भारतीय बाजारात येतील, अशी अपेक्षा आहे.

OPPO Reno 8T Specifications

  • 6.43 FHD+ 90Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 695
  • 100MP Rear + 32MP Selfie Camera
  • 67W fast charging

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आतापर्यंत लीक्स व सर्टिफिकेशन्सच्या माध्यमातून समोर आली आहे. असं बोललं जात आहे की हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह लाँच होईल. हा चिपसेट मिडबजेट 5जी फोन्ससाठी बेस्ट मानला जातो. तसेच भारतीय बाजारात रेनो 8टी 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो वचुर्अल एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करेल. हे देखील वाचा: तब्बल 100W चा चार्जिंग स्पीड! पुढील आठवड्यात येतोय OnePlus 11R; कंपनीनं केली अधिकृत घोषणा

लिक्सनुसार, OPPO Reno 8T मध्ये 100 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलची लेन्स मिळू शकते. हा स्मार्टफोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. रेनो 8टी 5जी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/feed/ 0
OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/#respond Wed, 25 Jan 2023 03:22:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17210 दोन नवीन ओप्पो रेनो फोन बाजारात येऊ शकतात. एक OPPO Reno 8T 4G असेल आणि एक OPPO Reno 8T 5G. गेल्या आठवड्यात 91मोबाइल्सनेनं रेनो 8टी 5जी फोनची ऑफिशियल टीजर ईमेज शेयर केली होती. तर आता रेनो 8टी 4जीची किंमत देखील समोर आली आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट सोबतच Reno 8T 4G Price […]

The post OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 8T 4G प्राइस 399 यूरो असू शकते.
  • फोनची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
  • फोनची भारतातील किंमत ग्लोबल व्हेरिएंटपेक्षा कमी असू शकते.

दोन नवीन ओप्पो रेनो फोन बाजारात येऊ शकतात. एक OPPO Reno 8T 4G असेल आणि एक OPPO Reno 8T 5G. गेल्या आठवड्यात 91मोबाइल्सनेनं रेनो 8टी 5जी फोनची ऑफिशियल टीजर ईमेज शेयर केली होती. तर आता रेनो 8टी 4जीची किंमत देखील समोर आली आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट सोबतच Reno 8T 4G Price देखील सांगण्यात आली आहे. दोन्ही रेनो 8टी मॉडेल फेब्रुवारीमध्ये भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

OPPO Reno 8T 4G Price

ओप्पो रेनो 8टी 4जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. या फोनची किंमत लीकमध्ये 399 यूरो असू शकते असं सांगण्यात आलं आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 35,000 रुपयांच्या आसपास आहे. ही युरोपियन बाजारातील किंमत आहे परंतु OPPO Reno 8T 4G भारतात लाँच झाल्यास याची किंमत ग्लोबल प्राइसच्या तुलनेत थोडी कमी असू शकते. हे देखील वाचा: ठरलं तर! Vivo Y56 आणि Vivo Y100 करणार भारतात एंट्री; कंपनी करत आहे मोठी तयारी

OPPO Reno 8T 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.43″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM + 128GB storage
  • MediaTek Helio G99
  • 32MP Selfie Camera
  • 100MP OmniVision Camera
  • 33W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, लीक्स नुसार हा मोबाइल फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकते. रेनो 8टी 4जी फोन पंच-होल स्टाईलसह येऊ शकतो जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करू शकतो. लीकनुसार हा फोन 600निट्स ब्राइटनेस आणि 409पीपीआय सारख्या फीचरसह येऊ शकतो.

OPPO Reno 8T 4G मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालू शकतो. लीकमध्ये फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट समोर आला आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 33वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा ओप्पो फोन आयपी54 रेटिंगसह मार्केटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: How To Start DigiLocker: पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार हा ओप्पो मोबाइल 100 मेगापिक्सल ओमनीव्हिजन रियर सेन्सरला सपोर्ट करू शकतो, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Reno 8T 4G मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/feed/ 0