Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री

Highlights

  • Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकतात.
  • एंट्री लेव्हल पोर्टफोलियो मजबूत करण्याची तयारी.
  • 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये होऊ शकतात लाँच.

विवोची ‘वी’ सीरीज मिडबजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे तसेच एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये कंपनीची ‘वाय’ सीरीज येते. गेले अनेक दिवस कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंट कमजोर वाटत आहे आणि या बजेटमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही फोन आला नाही. परंतु आता कंपनी आपली ही कमजोरी भरून काढण्यासाठी एकाच वेळी दोन फोन Vivo Y56 आणि Vivo Y100 लाँच करण्याची योजना बनवू शकते. 91मोबाइल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार हे फोन पुढील महिन्यापर्यंत भारतात येऊ शकतात.

विवोच्या एक्जिक्यूटिव्हनं आम्हाला माहिती दिली आहे की, विवो आधी हे दोन्ही स्मार्टफोन्स मार्चमध्ये बाजारात आणण्याची योजना बनवत होती परंतु बाजारातील मागणी व इंडस्ट्री अ‍ॅस्पेक्ट्स पाहता कंपनीनं आपली योजना बदलली आहे. आता Vivo Y Series चे दोन्ही मॉडेल Vivo Y56 आणि Vivo Y100 फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केले जाऊ शकतात. हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

एंट्री लेव्हल सेग्मेंट मजबूत करण्याची योजना

विवो ‘वाय’ सीरीजमध्ये सप्टेंबर 2022 नंतर फक्त Vivo Y02 स्मार्टफोनच भारतात आला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. चार महिन्यांच्या गॅपनंतर आता वाय56 आणि वाय100 ची एंट्री होऊ शकते, जे मिड बजेट स्मार्टफोन असू शकतात. आम्हाला किंमतीची ठोस माहिती मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की यांची किंमत 15,000 पासून सुरु होऊन 20 हजार पर्यंत जाऊ शकते. यातील वाय100 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे BIS वर देखील लिस्ट झाला आहे.

Vivo Y100 चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ Display
  • 50MP Camera
  • 8GB RAM
  • Android 13
  • MediaTek Dimensity 900

विवो वाय100 पाहता आतापर्यंत समोर आलेल्या सर्टिफिकेशन्स आणि लीक्सनुसार हा मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएससह मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर लाँच होऊ शकतो जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येऊ शकतो. हा चिपसेट कंपनीच्या Vivo V25 5G आणि Vivo T1x स्मार्टफोनमध्ये देखील होता. Vivo Y100 8जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम

Vivo Y100 स्मार्टफोनमध्ये 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते, जी 440पीपीआयला सपोर्ट करू शकते. स्क्रीन साईज समजली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी हा विवो फोन 50 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करू शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी मात्र लाँचची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here