दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळू शकते बेस्ट किंमत

सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात 5G टेक्नॉलॉजीचं वादळ आलं आहे. टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे, त्यामुळे इतकी वर्ष 4G वापरणाऱ्या ग्राहकांना 5G स्पीडची चव चाखायची आहे. यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे 5G सर्व्हिस फक्त 5G स्मार्टफोनवर वापरता येते. त्यामुळे ग्राहक नवीन 5G स्मार्टफोन विकत घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यांचे जुने स्मार्टफोन्स Used Mobile Phone किंवा Second Hand Smartphone च्या श्रेणीत जात आहेत. ते OLX, Cashify, Amazon, Flipkart / 2Gud आणि Cash for Phone या वेबसाइटवर बेस्ट किंमतीत विकले जाऊ शकतात. विशेष म्हणजे हे सर्व करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची देखील गरज नाही.

OLX

ओएलएक्सवर जुन्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, हे तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे इथे तुम्ही तुमचा जुना मोबाइल सहज विकू शकता. या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे कोणत्याही सिस्टम ऐवजी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइलची किंमत ठरवू शकता. या प्लॅटफॉर्मवर वस्तू खरेदी करणारी व्यक्ती आणि वस्तू विकणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधू शकते. ज्याला आपला सेकंड हँड फोन विकायचा आहे तो सर्व डिटेल्स OLX वर सबमिट करतो तसेच ज्याला फोन विकत घ्यायचा आहे ती व्यक्ती थेट विक्रेत्यांशी संपर्क साधून भावतोल करू शकते. त्यामुळे इथे इतर वेबसाईट्सच्या तुलनेत जास्त पैसे मिळण्याची शक्यता असते.

Cashify

Second Hand SmartPhones च्या खरेदी-विक्रीमध्ये कॅशिफायचा पर्याय नवीन असला तरी लोकप्रिय आहे. ही वेबसाईट जुने व वापरलेले स्मार्टफोन्स फक्त विकत घेत नाही तर त्यांची विक्री देखील करते. कॅशिफायची खासियत म्हणजे या वेबसाईटवर काही स्टेप्समध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाइलची व्हॅल्यू समजते. जर तुम्हाला हवी असलेली किंमत मिळत असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर सौदा करू शकता.

Amazon

ई=-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फक्त नवे स्मार्टफोन विकले जात नाहीत तर जुन्या हँडसेटची खरेदी देखील केली जाते. या शॉपिंग साईटवर तुम्हाला Used Smartphone च्या बदल्यात पैसे मिळत नाहीत परंतु Exchange Offer च्या स्वरूपात ही वेबसाईट नवीन फोनच्या खरेदीवर मोठा डिस्काउंट देते. त्यामुळे जर तुम्ही नवीन हँडसेट विकत घेऊ इच्छित असाल तरच अ‍ॅमेझॉन इंडियावर तुमच्या जुन्या फोनला बेस्ट व्हॅल्यू मिळू शकते.

Flipkart / 2Gud

अ‍ॅमेझॉनप्रमाणे फ्लिपकार्ट देखील नवीन स्मार्टफोनच्या सेलवर एक्सचेंज ऑफर सादर केली जाते. इथे देखील नवीन फोन विकत घेताना तुम्ही तुमचा जुना मोबाइल Exchange करून भरघोस सूट मिळवू शकता. टूगुड नावाच्या वेबसाईट सोबत देखील फ्लिपकार्टची भागेदारी आहे जी जुने फोन घेते आणि विकण्याचे काम करते. जिथे Refurbished Phones साठी चांगला मोबदला मिळू शकतो. हे देखील वाचा: Aadhaar Card: सरकारनं जारी केला नवा नियम, लवकरच सर्वांना अपडेट करावं लागणार आधार कार्ड

Cash for Phone

कॅश फॉर फोन ही नवीन वेबसाइट देखील जुने मोबाइल विकत घेण्याचं काम करते. इथे लॉगइन न करताच तुम्हाला तुमच्या मोबाइल कंपनीच्या कोणत्या मॉडेलसाठी किती पैसे मिळतील हे सांगितलं जातं. त्यामुळे या वेबसाइटनं इतर अनेक प्रतिस्पर्ध्यांना याने मागे टाकलं आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमच्या फोन ब्रँड आणि मॉडेलची माहिती देऊन त्याबदल्यात मिळणाऱ्या जास्तीत जास्त रकमेची माहिती मिळवू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here