PUBG Ban - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 PUBG बॅन ठरला मृत्यूचे कारण, पश्चिम बंगाल मध्ये 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या https://www.91mobiles.com/marathi/21-year-old-boy-commits-suicide-in-west-bengal-india-because-of-pubg-ban/ https://www.91mobiles.com/marathi/21-year-old-boy-commits-suicide-in-west-bengal-india-because-of-pubg-ban/#respond Tue, 08 Sep 2020 08:53:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8037 पोलिसांच्या मते देशात PUBG बॅन झाल्यामुळे तो मोबाईल गेम खेळू शकत नव्हता आणि याच तणावामुळे प्रीतमने स्वतःचा जीव घेतला.

The post PUBG बॅन ठरला मृत्यूचे कारण, पश्चिम बंगाल मध्ये 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PlayerUnknown’s Battleground म्हणजे PUBG साठी भारत सर्वात मोठा बाजार आहे. गेल्या 3 सप्टेंबरला भारत सरकारने देशातील 118 चीनी ऍप्स बॅन करण्याचा आदेश दिला होता, ज्यात पबजी मोबाईलचा पण समावेश होता. PUBG वरील बॅनच्या या बातमीने भारतातील लाखो गेमर्सना मोठा धक्का दिला आहे. देशभरातून या बॅन संबंधीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला योग्य म्हणत आहेत तर काही हे अयोग्य असल्याचे बोलत आहेत. दरम्यान एक अशी मोठी बातमी समोर आली आहे, ज्यानुसार पबजी बॅनच्या दुःखाने एका 21 वर्षीय तरुणाने फासी लावून आत्महत्या केली आहे.

हि हैराणीची बाब आहे आणि हि खूप दुःखद बातमी पश्चिम बंगाल मधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली कारण तो भारतातील PUBG Mobile बॅन मुळे तो खूप दुःखी होता. या युवकाचे वय 21 वर्ष सांगण्यात आले आहे, तो एक विद्यार्थी होता.

मीडिया रिपोर्टनुसार प्रीतम हलदर नावाचा तरुण पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. बातमीनुसार 4 सप्टेंबरच्या सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रीतम आपल्या खोलीतच होता, जेव्हा दुपारी जेवणासाठी त्याच्या आईने त्याला बोलावले तेव्हा रूमचा दरवाजा बंद होता आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता. घाबरलेल्या आईने शेजाऱ्यांना बोलावले आणि लोकांनी मिळून दरवाजा तोडला.

दरवाजा तोडल्यावर जेव्हा लोक आत गेले तेव्हा त्यांनी प्रीतमचे शरीर पंख्याला लटकत असल्याचे पहिले होते. पोलिसांच्या मते प्रीतमच्या आईने सांगितले आहे कि तरुणाच्या फोन मध्ये पबजी बंद झाला होता आणि यामुळे तो दोन दिवसांपासून चिंताग्रस्त होता. युवकाच्या आईनुसार प्रीतम रात्री उशीर पर्यंत फोन मध्ये PUBG खेळत राहायचा.

पोलिसांच्या मते देशात PUBG बॅन झाल्यामुळे तो मोबाईल गेम खेळू शकत नव्हता आणि याच तणावामुळे प्रीतमने स्वतःचा जीव घेतला. भारतात घडलेली हि घटना अनेकांना हैराण करणारी आहे कि कशाप्रकारे फक्त एक मोबाईल गेममुळे देशातील तरुण आपले नुकसान करून घेत आहेत आणि आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलत आहेत.

The post PUBG बॅन ठरला मृत्यूचे कारण, पश्चिम बंगाल मध्ये 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/21-year-old-boy-commits-suicide-in-west-bengal-india-because-of-pubg-ban/feed/ 0
PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/#respond Fri, 31 May 2019 10:19:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4469 गेम खेळताना तो ब्लास्ट कर ब्लास्ट कर असे ओरडत होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला.

The post PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन मोबाईल गेम PUBG च्या लोकप्रियता वाढत आहे सोबतच तरुणांवर याचे दुष्परिणाम पण दिसून येत आहेत. ते पाहून अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी घातली आहे. PLAYER UNKNOWN’S BATTLEGROUNDS (PUBG) ने सध्या प्रत्येक वयोगटातील लोकांना आपले फॅन बनवले आहे. पबजी इतका जास्त प्रसिद्ध झाला आहे कि अनेकांसाठी हि फक्त आवड राहिली नसून याचे व्यसन लागले आहे. याच व्यसनामुळे अनेकांना जीव गमवावा लागले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार PUBG खेळताना एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची बातमी समोर आली आहे.

रिपोर्ट्स नुसार मध्यप्रदेश मधील नीमच मध्ये राहणार Furqan Qureshi (वर 16 वर्ष) चा PUBG खेळताना कार्डियक अरेस्ट ने मृत्य झाला आहे. हा तरुण 12वी चा विध्यार्थी होता. युवकाच्या वडिलांनी सांगितले कि तो मृत्यू आधी जवळपास सहा तास PUBG गेम खेळत होता आणि गेम खेळताना तो ब्लास्ट कर ब्लास्ट कर असे ओरडत होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला.

हे देखील वाचा: PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास

मृत मुलाच्या वडिलांच्या म्हणणे आहे कि बेशुद्ध झाल्यानंतर Furkhan ला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू झालेचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात कि जेव्हा युवकाला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हा त्याच्या पल्स बंद होत्या. आम्ही इलेक्ट्रिक शॉक च्या माध्यमातून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही अपयशी ठरलो.

हे देखील वाचा: आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू

कुटुंबीय म्हणतात कि Furkhan एक चांगला जलतरणपट्टू होता आणि त्याला हृद्यासंबंधित कोणताही आजार नव्हता. डॉक्टर्स नुसार दीर्घकाळ गेम खेळल्याने त्याच्या हृदयाची स्पंदनांचा वेग वाढला आणि हार्ट अटॅक आला.

The post PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/feed/ 0
आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/#respond Mon, 06 May 2019 13:01:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4246 इराक सरकारने म्हटले कि हिंसेने भरलेला हा मोबाईल गेम देशाच्या संस्कृती, सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी चांगला नाही.

The post आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन मोबाईल गेम पबजीची लोकप्रियता वाढत असताना तरुणांवर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. ते पाहता अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी आणली आहे. अलीकडेच नेपाळ मध्ये पबजी वर बॅन लावण्यात आला होता. पण नंतर नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

आता हा गेम इराक मध्ये बॅन करण्यात आला आहे. इराक सरकार ने मोबाईल गेम वर प्रतिबंध लावण्याच्या बाजूने वोट केले. फक्त पबजी च नाही तर अजूनही अनेक ऑनलाइन गेम्स साठी इराकच्या संसदेत वोटिंग झाली, ज्यात सदस्यांनी बॅनच्या बाजूने मतदान केले.

इराक मध्ये पबजी आणि इतर ऑनलाइन गेम्स बॅन बद्दल इराक सरकारने म्हटले कि हिंसेने भरलेला हा मोबाईल गेम देशाच्या संस्कृती, सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी चांगला नाही. सराकरनुसार त्यांचा देश युद्ध आणि आतंकवादशी संघर्ष करत आहे आणि पबजी सारख्या गेम्समुळे तरुण हिंसेकडे वळत आहेत.

याआधी नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात ऑनलाइन मोबाईल गेम पबजी वर बंदी न लावण्याचा आदेश दिला आहे. नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने 11 एप्रिलला सर्व इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपन्यांना पबजी सर्वर वरील इंटरनेट ट्राफिक थांबवण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणाची सुनवाई करताना जस्टिस ईश्वर प्रसाद खाटीवाडा यांनी नेपाळ सरकार आणि संबंधित विभागाला नोटिस दिली आणि त्यांच्याकडे पबजी वर उत्तर मागितले. सोबत सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

पबजी मुळे झालेल्या दुर्घटना
PUBG संबंधित अनेक गंभीर प्रकार भारतातील विविध भागांतून समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद मध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय युवक संभाशिव ने आत्महत्या केली. संभाशिव दहावीचा विध्यार्थी होता आणी परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी पबजी खेळत होता. गेम खेळत असल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली तेव्हा नाराज होऊन संभाशिव ने आत्महत्या केली.

अलीकडेच यूएई मध्ये 20 वर्षीय महिलेने आपल्या पतीशी PUBG खेळू न दिल्याने घटस्फोट मागितला. रिपोर्टनुसार महिला म्हणते कि तिला स्वतःच्या मर्जीनुसार मनोरंजन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तिचा नवरा हा हक्क हिरावून घेत आहे.

The post आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/feed/ 0
नेपाळ मध्ये बॅन झाला PUBG! पुढचा नंबर भारताचा ? https://www.91mobiles.com/marathi/pubg-banned-in-nepal-india-accidents/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-banned-in-nepal-india-accidents/#respond Fri, 12 Apr 2019 14:01:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4084 नेपाळच्या सर्व मोबाईल आपरेटर्स तसेच नेटवर्क सर्विस प्रोवाइडर्सना आदेश दिला आहे कि त्यांनी आपल्या नेटवर्क वर PUBG गेमची स्ट्रीमिंग ब्लॉक करावी.

The post नेपाळ मध्ये बॅन झाला PUBG! पुढचा नंबर भारताचा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG म्हणजे PlayerUnknown’s Battlegrounds! हा फक्त एक गेम नाही तर वेड आहे. पबजी खेळणाऱ्यांचे निश्चित वय नाही, प्रत्येक वयोगटातील लोक या ऑनलाइन गेमचे फॅन आहेत. जेव्हा पबजी भारतात आला होता तेव्हा कुणालाच वाटले नव्हते कि हा गेम अशाप्रकारे डोकेदुखी ठरेल. फक्त भारतच नव्हे तर जगातील इतर देशांमध्ये पण पबजीचा ट्रेंड वाढतच आहे. भारतात वारंवार पबजी बॅन करण्याचा विषय समोर येत आहे तर शेजारी देश नेपाळ याच्या एक पाऊल पुढे गेला आहे आणि तिथे पबजी वर बॅनची घोषणा करण्यात आली आहे.

नेपाळ टेलीकम्यूनिकेशन्स अथॉरिटी (NTA) ने आपल्या देशात पबजी बॅन करण्याचा आदेश दिला आहे. एनटीए चे डिप्टी डायरेक्टर संदीप अधिकारी यांनी आपल्या विधानात म्हटले कि PUBG मध्ये हिंसक कंटेंट असल्यामुळे मुलांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे. डिप्टी डायरेक्टर यांनी Himalayan nation’s federal investigation authority यांच्या आग्रहानंतर काल म्हणजे गुरुवारी नेपाळच्या सर्व मोबाईल आपरेटर्स तसेच नेटवर्क सर्विस प्रोवाइडर्सना आदेश दिला आहे कि त्यांनी आपल्या नेटवर्क वर PUBG गेमची स्ट्रीमिंग ब्लॉक करावी. म्हणजे फोन मध्ये पबजी असूनही नेपाळ मधील लोक कोणत्याही वाईफाई किंवा डेटा प्लान मधून पबजी खेळू शकणार नाहीत.

पण आज बातमी लिहिताना जेव्हा आम्ही नेपाळ मध्ये राहणाऱ्या काही मित्रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि त्यांच्या फोन मध्ये PUBG गेम अजूनही चालत आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांचे नंबर आहेत आणि त्या सर्वांवर ते PUBG खेळू शकत होते. तसेच पबजी वर बॅन बद्दल बोलताना ते म्हणाले कि कोणत्याही गेम बॅन करणे कायमचे उत्तर असू शकत नाही. गेम बॅन करण्याऐवजी सरकारने PUBG खेळण्यासाठी काही दिशा निर्देश जाहीर करावेत आणि सर्व तरुणांनी त्याचे पालन करावे.

गुजरात मध्ये पण आहे बॅन
विशेष म्हणजे PUBG वर भारतातील अनेक शहरांमधून या बॅनची मागणी केली जात आहे. गुजरात सरकारने गेल्या 30 मार्चला या गेम वर प्र​तिबंध लावला होता त्यांनतर PUBG खेळण्याच्या आरोपाखाली या राज्यातून 10 लोकांना अटक झाली आहे. या अटक सत्रानंतर PUBG गेम भारतात चालवणारी कंपनी टेसेंट इंडिया ने आपल्या प्लेयर्सच्या सपोर्ट मध्ये येऊन या गेम वरून बॅन काढण्याची मागणी पण केली आहे.

अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत
PUBG संबंधित अनेक गंभीर प्रकरणे देशातील अनेक भागांतून समोर आली आहेत. या महिन्याच्या सुरवातीला हैदराबाद मध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय युवा संभाशिव यांने पण आत्महत्या केली आहे. संभाशिव दहावीचा विध्यार्थी होता, तो परीक्षेच्या वेळी अभ्यास करण्याऐवजी पबजी खेळात होता. गेम खेळल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली तेव्हा नाराज होऊन संभाशिवने आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली.

त्याचप्रमाणे मुंबई मध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षीय युवकाने आपल्या परिवारा कडून PUBG खेळण्यासाठी एका हाईएंड स्मार्टफोनची मागणी केली होती पण, घरच्यांनी फोन देण्यास नकार दिला. त्यांनतर युवकाने आत्महत्या केली. तसेच गेल्या महिन्यात गाजियाबाद मध्ये राहणाऱ्या दहावीचा एक विद्यार्थी या गेमसाठी आपला घर सोडून गेला. अशीच एक धक्कदायक घटना राजधानी दिल्ली मध्ये पण झाली होती जिथे वसंतपुर मधील PUBG खेळू न दिल्यामुळे एका मुलाने आपल्या आई वडिलांची हत्या केली होती.

The post नेपाळ मध्ये बॅन झाला PUBG! पुढचा नंबर भारताचा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-banned-in-nepal-india-accidents/feed/ 0