PUBG बॅन ठरला मृत्यूचे कारण, पश्चिम बंगाल मध्ये 21 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

PlayerUnknown’s Battleground म्हणजे PUBG साठी भारत सर्वात मोठा बाजार आहे. गेल्या 3 सप्टेंबरला भारत सरकारने देशातील 118 चीनी ऍप्स बॅन करण्याचा आदेश दिला होता, ज्यात पबजी मोबाईलचा पण समावेश होता. PUBG वरील बॅनच्या या बातमीने भारतातील लाखो गेमर्सना मोठा धक्का दिला आहे. देशभरातून या बॅन संबंधीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला योग्य म्हणत आहेत तर काही हे अयोग्य असल्याचे बोलत आहेत. दरम्यान एक अशी मोठी बातमी समोर आली आहे, ज्यानुसार पबजी बॅनच्या दुःखाने एका 21 वर्षीय तरुणाने फासी लावून आत्महत्या केली आहे.

हि हैराणीची बाब आहे आणि हि खूप दुःखद बातमी पश्चिम बंगाल मधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली कारण तो भारतातील PUBG Mobile बॅन मुळे तो खूप दुःखी होता. या युवकाचे वय 21 वर्ष सांगण्यात आले आहे, तो एक विद्यार्थी होता.

मीडिया रिपोर्टनुसार प्रीतम हलदर नावाचा तरुण पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. बातमीनुसार 4 सप्टेंबरच्या सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रीतम आपल्या खोलीतच होता, जेव्हा दुपारी जेवणासाठी त्याच्या आईने त्याला बोलावले तेव्हा रूमचा दरवाजा बंद होता आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता. घाबरलेल्या आईने शेजाऱ्यांना बोलावले आणि लोकांनी मिळून दरवाजा तोडला.

दरवाजा तोडल्यावर जेव्हा लोक आत गेले तेव्हा त्यांनी प्रीतमचे शरीर पंख्याला लटकत असल्याचे पहिले होते. पोलिसांच्या मते प्रीतमच्या आईने सांगितले आहे कि तरुणाच्या फोन मध्ये पबजी बंद झाला होता आणि यामुळे तो दोन दिवसांपासून चिंताग्रस्त होता. युवकाच्या आईनुसार प्रीतम रात्री उशीर पर्यंत फोन मध्ये PUBG खेळत राहायचा.

पोलिसांच्या मते देशात PUBG बॅन झाल्यामुळे तो मोबाईल गेम खेळू शकत नव्हता आणि याच तणावामुळे प्रीतमने स्वतःचा जीव घेतला. भारतात घडलेली हि घटना अनेकांना हैराण करणारी आहे कि कशाप्रकारे फक्त एक मोबाईल गेममुळे देशातील तरुण आपले नुकसान करून घेत आहेत आणि आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here