Realme 10 Pro Plus 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 15:01:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खुद्ध सीईओनी दिली Realme 10 Pro सीरिजच्या किंमतीची हिंट https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-series-india-price-under-25000-budget/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-series-india-price-under-25000-budget/#respond Mon, 28 Nov 2022 05:28:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15418 Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G जागतिक बाजारात आले आहेत आणि आता हे दोन्ही मोबाइल फोन भारतात येण्यासाठी तयार आहेत. रियलमी 10 प्रो सीरीज येत्या 8 डिसेंबरला भारतात लाँच होईल, ज्यात रियलमी 10 प्रो 5जी आणि रियलमी 10 प्रो प्लस 5जी अशा दोन हँडसेटचा समावेश असू शकतो. परंतु ही सीरीज देशात येण्याआधी […]

The post खुद्ध सीईओनी दिली Realme 10 Pro सीरिजच्या किंमतीची हिंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G जागतिक बाजारात आले आहेत आणि आता हे दोन्ही मोबाइल फोन भारतात येण्यासाठी तयार आहेत. रियलमी 10 प्रो सीरीज येत्या 8 डिसेंबरला भारतात लाँच होईल, ज्यात रियलमी 10 प्रो 5जी आणि रियलमी 10 प्रो प्लस 5जी अशा दोन हँडसेटचा समावेश असू शकतो. परंतु ही सीरीज देशात येण्याआधी सर्वात मोठ्या मॉडेल रियलमी 10 प्रो+ ची किंमत (Realme 10 Pro+ India Price) समोर आली आहे. हा रियलमी मोबाइल 25 हजारांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच होऊ शकतो.

Realme 10 Pro 5G Series ची किंमत

रियलमी 10 प्रो प्लस 5जी फोनच्या किंमतीची माहिती कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी अनोख्या अंदाजात ट्विटरवर शेयर केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी हिंट दिली आहे की कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सची किंमत भारतीय बाजारात 25,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात येईल. त्यामुळे Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ दोन्ही स्मार्टफोनची किंमत भारतात 25 हजारांपेक्षा कमी असेल. यातील प्रो प्लस मॉडेलमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळू शकतो जो याआधी महागड्या फोन्समध्ये मिळत होता. हे दोन्ही रियलमी मोबाइल फोन 8 डिसेंबरला भारतात ऑफिशियल होतील. हे देखील वाचा: लय भारी! 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन; 5000mAh बॅटरीसह Poco M4 Pro 5G घ्या स्वस्तात

Realme 10 Pro च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला आहे. ही पंच-होल स्टाइल स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जी इंटरनल रॅमला बूस्ट करून 20जीबी रॅमची हेव्ही प्रोसेसिंग पावर देते.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 10 Pro+ Specifications

रियलमी 10 प्रो प्लस स्मार्टफोन 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ कर्व्ड एमओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Realme 10 Pro+ 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो. हा स्मार्टफोन पण 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme 10 Pro+ 67वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post खुद्ध सीईओनी दिली Realme 10 Pro सीरिजच्या किंमतीची हिंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-series-india-price-under-25000-budget/feed/ 0