Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

Safe Browser List: टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यतील मोठा भाग बनली आहे, परंतु त्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सध्या बड्या टेक कंपन्या, सरकार आणि इम्पलॉयर देखील युजर्सवर नजर ठेवत आहेत. त्यामुळे प्रायव्हसी राखणं कठीण झालं आहे. गुगलवर सर्च करणं सोपं राहील नाही कारण सर्च रिझल्ट की-वर्ड आणि अ‍ॅड मॅन्युपॅलेटेड असतात. तसेच गुगल क्रोम, सफारी आणि एज सारख्या वेब ब्राउजरमध्ये युजर्सची सर्च हिस्ट्रीसह लॉग-इन क्रेडेंशियल देखील सेव्ह असतात. यातील गुगल क्रोम खूप लोकप्रिय वेब ब्राउजर आहे, हीच लोकप्रियता क्रोमसाठी धोकादायक आहे. जास्त लोक वापरत असल्यामुळे हॅकर्स देखील या ब्राऊजरला जास्त लक्ष्य करतात आणि यातील बग्सचा फायदा घेऊन युजर्सना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी आलेल्या अ‍ॅटलास व्हीपीएनच्या रिपोर्टनुसार क्रोम जगातील सर्वात अनसेफ वेब ब्राउजर आहे. त्यामुळे आपण लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये हा ब्राउजर वापरू नये जो आपल्या प्रायव्हसीशी खेळतो. आज आम्ही तुम्हाला Google Chrome पेक्षा चांगल्या ब्राउजर्स बाबत माहिती देत आहोत आहेत.

Safe Browser List 2022

  • Brave
  • Vivaldi
  • DuckDuckGo
  • Firefox Focus
  • Tor

सर्वात सुरक्षित वेब ब्राउजर 2022

Brave

Brave ब्राउजर गुगलच्या Chrome बेसिक स्ट्रक्चर (ओपन सोर्स Chromium) वर आधारित आहे. हा ब्राउजर Mozilla चे को-फाउंडर ब्रेनडन ईच आणि ब्रेन बॉडी यांनी मिळून बनवला आहे. ब्रेव्ह ब्राउजर ट्रॅकर आणि थर्ड पार्टी कूकीज ब्लॉक करतो ज्या वेबवर तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीज मॉनीटर करतात. तसेच ब्रेव्ह ब्राउजरमध्ये प्रोटेक्शन सेटिंग कस्टमाइजचा ऑप्शन देखील मिळतो.

Vivaldi

विवाल्दी ब्राउजर देखील Chromium वर आधारित आहे, जो Brave आणि Chrome प्रमाणेच आहे. Vivaldi ब्राउजरचे को-फाउंडर Opera Software चे स्टेपनसन वन टेटजचनर आणि टटसुकी टोमिता आहे. Vivaldi ब्राउचर स्मूद नेव्हिगेशन सिस्टमवर बूट करतो जो युजर फ्रंडली फीचर्ससह येतो. तसेच कस्टमाइजेबल युजर इंटरफेससह येतो.

DuckDuckGo

DuckDuckGo वेब-ब्राउजर के फाउंडर Gabriel Weinberg आहेत. DuckDuckGo ब्राउजर 2011 मध्ये सुरु करण्यात आला आहे, जो गुगलच्या डेटा माइनिंग टॅक्टिक्सचा विरोध करत आहे. डकडकगो ब्राउजर सध्या सर्वात सुरक्षित आणि विश्वासू ब्राउजर म्हणून प्रसिद्ध आहे. हा ट्रॅकिंग कूकीज ब्लॉक करण्यासोबतच पेज डेटा माइनिंगच्या आधारावर ग्रेड करतो. तसेच हा युजर्सची ब्राउजिंग हिस्ट्री ट्रॅक करत नाही. हा सेट टाइमरनुसार ऑटोमॅटिकली हिस्ट्री क्लीयर करतो.

Firefox Focus

Firefox Focus वेब-ब्राउजर Mozilla नं डेव्हलप केला आहे. हा ब्राउजर iOS डिवाइससाठी ट्रॅकिंग अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. Firefox Focus ब्राउजर छुप्या कुकी ट्रॅकर्ससह जाहिराती देखील रोखतो. तसेच फक्त एक टॅपवर ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शन देतो. मोजिला लवकरच हा ब्राउजर अँड्रॉइड डिवाइसेससाठी घेऊन येत आहे.

Tor

Tor ब्राउजर साल 2019 मध्ये लाँच केला गेला होता. त्यामुळे हा लिस्ट मधील सर्वात नवा ब्राउजर आहे. Tor ब्राउजरचा फुल फॉर्म The Onion Router जो अ‍ॅडव्हान्स प्रायव्हसी फीचर्ससह येतो. हा ब्राउजर ट्रॅकर्स ब्लॉक करण्यासह ट्रिपल इनक्रिप्शन फीचर्ससह वेब-ब्राउजिंगचा सुरक्षित अनुभव देतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here