5000mAh बॅटरीअसलेल्या Poco M4 Pro 5G च्या एमआरपीवर 23 टक्के डिस्काउंट

काही महिन्यांपूर्वी शाओमीच्या सब ब्रँड पोकोनं आपला सर्वात स्वस्त 5G फोन भारतात सदर केला होता. कंपनीनं POCO M4 Pro स्मार्टफोन POCO M3 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर केला होता. या स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर हा जुन्या फोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडसह सादर करण्यात आला आहे आणि आता हा हँडसेट डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. फोनचे मुख्य फीचर्स पाहता यात 6.6-इंचाचा FHD + डिस्प्ले, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला या डिवाइसची किंमत आणि यावरील ऑफरची माहिती घेऊया.

POCO M4 Pro 5G ची किंमत आणि ऑफर

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेल 23 टक्के डिस्काउंटनंतर 12,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. सिटी बँकेच्या क्रेडिट कार्ड ट्रँजॅक्शनवर ग्राहकांना 10 टक्के सूट दिली जाईल. तर सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ईएमआय ट्रँजॅक्शनवर 12 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना देखील या स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही हा फोन 451 रुपयांच्या मासिक हप्त्यावरही विकत घेऊ शकता. डिवाइस Power Black, Cool Blue आणि POCO Yellow कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

POCO M4 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आणि एक पंच-होल कॅमेरा आहे. फोन सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, सेल्फीसाठी फ्रंटला 16MP स्नॅपर, 3.5mm ऑडियो जॅक आणि Android 11 आधारित MIUI 12.5 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स मिळते.

कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ड्युअल 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. ऑप्टिक्स पाहता POCO M4 Pro 5G मध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: How To Test Internet Speed: तुमचा इंटरनेट प्रोव्हायडर देतोय का ठरलेला स्पीड? चुटकीसरशी करा चेक

POCO M4 Pro 5G मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या डिवाइसची साइज 163.56 x 75.78 x 8.75 मिमी आणि वजन 195 ग्राम आहे. फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 810 5G चिपसेटसह माली-जी57 एमसी2 जीपीयू द्वारे चालतो. हा POCO फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो जी मायक्रोएसडी कार्ड (1TB पर्यंत) च्या माध्यमातून वाढवता येते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here