Realme 5i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Jan 2020 13:36:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/#respond Fri, 10 Jan 2020 13:36:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6256 स्पष्ट करू इच्छितो कि Realme 5i साधारण लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

The post Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काल भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Realme 5i लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने लो बजेट मध्ये एंट्री घेतली आहे जो 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन येत्या 15 जानेवारी पासून देशात सेलसाठी उपलब्ध होणार आहे. Realme 5i ची टक्कर या बजेट सेग्मेंट मधील Xiaomi च्या Redmi Note 8 स्मार्टफोनशी होणार आहे. Redmi Note 8 ने भारतात आपल्या सेलचे अनेक रेकॉर्ड आधीच बनवले आहेत आणि या फोनची लोकप्रियता पण जास्त आहे. स्मार्टफोन मार्केट मध्ये Realme ला Xiaomi चा मोठा प्रतिस्पर्धी म्हटले जाते त्यामुळे Realme 5i समोर मोठे आव्हान असेल. या सेग्मेंट मध्ये Xiaomi चा Redmi 8 स्मार्टफोन पण Realme 5i च्या अडचणी वाढवू शकतो पण या फोनची किंमत Realme 5i पेक्षा 1,000 रुपये कमी आहे. त्यामुळे आम्ही स्मार्टफोन यूजर्ससाठी बेस्ट च्वाइस निवडत Realme 5i ची तुलना Redmi Note 8 शी केली आहे. त्यामुळे 9,999 रुपयांचा Redmi Note 8 निवडावा कि लेटेस्ट डिवाईस Realme 5i विकत घ्यावा, हा एक मोठा प्रश्न आहे. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सची छोटीसी तुलना केली आहे, ज्यातून समजेल Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

डिजाईन

Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाले आहेत. फ्रंट पॅनल वर दोन्ही फोनचा लुक जवळपास एकसारखा आहे पण Realme 5i चा चिन पार्ट Redmi Note 8 पेक्षा थोडा जास्त मोठा आहे. तसेच Redmi Note 8 च्या चिन पार्ट वर Redmi ची ब्रँडिग आहे. Realme 5i आणि Redmi Note 8 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे देण्यात आला आहे. दोन्ही फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सह स्पीकर देण्यात आला आहे. दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इथे स्पष्ट करू इच्छितो कि Realme 5i साधारण लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

डिस्प्ले

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर बनलेले आहेत. Realme 5i 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्टेड आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी नोट 8 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. रेडमी नोट 8 ची पिक्सल डेन्सिटी 403ppi आहे तर रियलमी 5आई 269ppi च्या पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. रेडमी नोट 8 मध्ये मीयूआई 10 देण्यात आला आहे तर रियलमी 5आई मध्ये कलरओएस 6.0.1 आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे तर Realme 5i 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.

चिपसेट बद्दल बोलायचे तर Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही फोन 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतात. ग्राफिक्ससाठी पण Realme 5i आणि Redmi Note 8 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रॅम व स्टोरेज

Realme 5i भारतात एकाच वेरिएंट मध्ये आला आहे. हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Redmi Note 8 Xiaomi ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी

Realme 5i क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी Realme 5i मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Note 8 बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. Redmi Note 8 मध्ये सेल्फीसाठी एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटी व बॅटरी

सिक्योरिटीसाठी दोन्ही फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. Realme 5i मध्ये पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर Xiaomi Redmi Note 8 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे शाओमी आपल्या डिवाईसच्या रिटेल बॉक्स मध्ये 18वॉट चा चार्जर देत आहे तर रियलमी 5आई मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल.

किंमत

Realme 5i 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Xiaomi Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीच्या वेबसाइट वर 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. रेडमी नोट 8 स्पेस ब्लू, नेप्च्यून ब्लू, मूनलाईट व्हाईट आणि कॉसमिक पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल तर रियलमी 5आई ने ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये एंट्री घेतील आहे.

जर तुम्ही 1,000 रुपये जास्त देऊ शकत असाल तर Xiaomi Redmi Note 8 काल लॉन्च झालेल्या Realme 5i वर भारी पडतो. रियलमीला टक्कर देण्यासाठी शाओमी आपल्या या फोन वर अतिरिक्त ऑफर किंवा कॅशबॅक पण देऊ शकते.

The post Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/feed/ 0
5000एमएएच बॅटरी सह भारतात आला Realme 5i, Xiaomi च्या अडचणी वाढणार https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launch-with-4-rear-camera-and-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launch-with-4-rear-camera-and-5000mah-battery/#respond Thu, 09 Jan 2020 11:55:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6244 या इवेंट मध्ये कंपनीच्या सीईओनी रियलमीच्या अपकमिंग आणि नवीन फिटनेस बॅंडची झलक दाखवली.

The post 5000एमएएच बॅटरी सह भारतात आला Realme 5i, Xiaomi च्या अडचणी वाढणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘रियलमी 5’ सीरीज वाढवत नवीन डिवाइस Realme 5i लॉन्च केला होता. आज हा डिवाइस अधिकृतपणे भारतात लॉन्च केला गेला आहे. हा फोन लो बजेट स्मार्टफोन मार्केट मध्ये सादर केला गेला आहे आणि डिवाइस 5,000एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो. चला बघूया Realme 5i च्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती.

किंमत आणि सेल डिटेल

भारतात Realme 5i ब्लू आणि ग्रीन कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन कंपनीने 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा डिवाइस कंपनी 15 जानेवारी दुपारी 12 वाजता सेलसाठी फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइट वर उपलब्ध करेल. तसेच या इवेंट मध्ये कंपनीच्या सीईओनी रियलमीच्या अपकमिंग आणि नवीन फिटनेस बॅंडची झलक दाखवली. पण त्याची जास्त माहिती देण्यात आली नाही.

डिजाइन

Realme 5i बेजल लेस नॉच डिस्प्ले डिजाइन सह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच फोनच्या लोवेरा पॅनल वर टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम आणि पावर बटण देण्यात आला आहे. डिवाइसच्या मागे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये चार रियर कॅमेरा आणि मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

हा फोन कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच रियलमी 5आई कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

दमदार कॅमेरा

रियलमी 5आई च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

या फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. याची स्टोरेज मेमोरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोन मध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आला आहे. फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

The post 5000एमएएच बॅटरी सह भारतात आला Realme 5i, Xiaomi च्या अडचणी वाढणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launch-with-4-rear-camera-and-5000mah-battery/feed/ 0
Realme 5i येत आहे भारतात, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव आणि जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launching-in-india-live-streaming-link-watch-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launching-in-india-live-streaming-link-watch-specs-price-sale/#respond Wed, 08 Jan 2020 12:09:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6224 फ्लिपकार्ट वर पण या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे आणि फ्लिपकार्ट वर पण Realme 5i चा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

The post Realme 5i येत आहे भारतात, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव आणि जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने दोन दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘रियलमी 5’ सीरीज वाढवत नवीन डिवाईस Realme 5i लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन वियमनाम मध्ये आधीच आला आहे जो आता भारतात येणार आहे. रियलमी उद्या म्हणजे 9 जानेवारीला आपला हा नवीन आणि लो बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी हा फोन मोठ्या ईवेंटच्या नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सादर करणार आहे. Realme 5i ब्रँडचा स्वस्त स्मार्टफोन आहे जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 5,000एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो. तुम्ही पण या फोनचा लॉन्च तुमच्या मोबाईल वर लाईव बघू शकता, ज्याबद्दल आम्ही पुढे सांगितले आहे. त्याचबरोबर भारतात लॉन्च होण्याआधी तुम्ही Realme 5i चे फुल स्पेसिफिकेशन्स पण जाणून घेऊ शकता.

Realme आपला हा नवीन फोन संपूर्ण देशात लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे. लाईव लॉन्च 9 जानेवारी म्हणजे उद्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. रियलमी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर हा लॉन्च लाईव टेलीकास्ट करेल. विशेष म्हणजे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे आणि फ्लिपकार्ट वर पण Realme 5i चा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

Realme 5i

रियलमी 5आई वियतनाम मध्ये बेजल लेस नॉच डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला आहे. Realme 5i कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रियलमी 5आई चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 5i वियतनाम मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Realme 5i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 5i मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वियतनाम मध्ये Realme 5i ब्लू आणि ग्रीन कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 3690000 वियतनामी डोंग्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 11,500 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 4290000 वियतनामी डोंग्स म्हणजे जवळपास 13,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. आशा आहे कि रियलमी 5आई भारतात पण याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल आणि फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. पण तरीही भारतात येणाऱ्या Realme 5i च्या ठोस माहितीसाठी उद्याच्या फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post Realme 5i येत आहे भारतात, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव आणि जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-launching-in-india-live-streaming-link-watch-specs-price-sale/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Realme 5i, 9 जानेवारीला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-officially-launched-features-specifications-price-sale-india-launch-9-january/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-officially-launched-features-specifications-price-sale-india-launch-9-january/#respond Mon, 06 Jan 2020 12:19:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6194 फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 3690000 वियतनामी डोंग्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 11,500 रुपयांच्या आसपास आहेत.

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Realme 5i, 9 जानेवारीला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी या आठवड्यात 9 तारखेला भारतात आपल्या ‘रियलमी 5 सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Realme 5i लॉन्च करणार आहे. कंपनी हा स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून बाजारात आणेल. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर Realme 5i चे प्रोडक्ट पेज पण बनले आहे आणि या स्मार्टफोनचा सेल पण या वेबसाइट वर होईल. रियलमी फॅन्स Realme 5i ची वाट बघत आहेत कारण हा फोन लो बजेट मध्ये एंट्री घेईल. तसेच भारतात येण्याआधी आज रियलमी 5आई वियतनाम मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme 5i

Realme 5i लुकच्या बाबतीत सीरीज मधील स्मार्टफोन Realme 5 सारखाच आहे. हा फोन बेजल लेस नॉच डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला आहे. Realme 5i कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रियलमी 5आई चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 5i वियतनाम मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Realme 5i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 5i मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वियतनाम मध्ये Realme 5i ब्लू आणि ग्रीन कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 3690000 वियतनामी डोंग्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 11,500 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 4290000 वियतनामी डोंग्स म्हणजे जवळपास 13,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. आशा आहे कि रियलमी 5आई भारतात पण याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल आणि फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. पण तरीही भारतात येणाऱ्या Realme 5i च्या ठोस माहितीसाठी 9 जानेवारीला होणाऱ्या फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

Source

The post 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Realme 5i, 9 जानेवारीला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-officially-launched-features-specifications-price-sale-india-launch-9-january/feed/ 0
Realme 5i च्या किंमतीचा झाला खुलासा, 6 जानेवारीला लॉन्च होईल हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-spotted-on-geekbench-ahead-of-official-launch-and-price-leaked-also/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-spotted-on-geekbench-ahead-of-official-launch-and-price-leaked-also/#respond Thu, 02 Jan 2020 12:21:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6167 या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम कलरओएस 6 सह येईल.

The post Realme 5i च्या किंमतीचा झाला खुलासा, 6 जानेवारीला लॉन्च होईल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने अलीकडेच माहिती दिली आहे कि कंपनी आपला Realme 5i स्मार्टफोन 6 जानेवारीला लॉन्च करेल. हा डिवाइस सर्वात आधी वियतनाम मध्ये लॉन्च केला जाईल. या डिवाइसच्या इंडिया लॉन्च बद्दल अजूनतरी कोणताही खुलासा झाला नाही. तसेच अधिकृत लॉन्च डेट समोर आल्यानंतर डिवाइस Geekbench वर दिसला आहे, जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

दुसरीकडे डिवाइसच्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे. लॉन्चच्या आधी रियलमी 5आई वियतनाममी साइट FPTShop वर लिस्ट केला गेला आहे. तिथे किंमत जवळपास 13,000 रुपये सांगण्यात आली आहे आहे. हि किंमत पाहून वाटत आहे कि कंपनी रियलमी 5 चा डाउन वर्जन म्हणून रियलमी 5i सादर करेल.

याव्यतिरिक्त Realme 5i Geekbench वर RMX2030 मॉडेल नंबर सह दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 आणि 4जीबी रॅम दिला जाईल. तसेच या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम कलरओएस 6 सह येईल.

या अपकमिंग रियलमी 5i ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 314 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 1389 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे Realme Vietnam च्या फेसबुक पेज वर पोस्टर शेअर केला होता, ज्यामुळे खुलासा झाला आहे कि Realme 5i या मार्केट मध्ये 6 जानेवारीला लॉन्च केला जाईल.

डिजाइन

त्याचबरोबर समोर आलेल्या फोटो मधून फोनच्या डिजाइनची माहिती समोर आली आहे. फोटो फोन ग्रीन आणि ब्लू रंगात दिसला आहे. दोन्ही कलर वेरिएंट रियर पॅनल वर ग्रेडिएंट फिनिश सह पण येऊ शकतात. रियलमी 5आई च्या रियर पॅनलची डिजाइन कंपनीच्या डायमंड कट डिजाइन सह वेगळी असेल. डायमंड कट डिजाइन रियलमी 5 आणि रियलमी 5एस मध्ये होती.

स्पेसिफिकेशन्स

रियलमी 5आई बद्दल बोलायचे तर आता समोर आलेल्या रिपोर्ट्स आणि लीक्स नुसार Realme 5i चा मॉडेल नंबर RMX2030 असेल. हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ आईपीएस डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार Realme 5i दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल आहे. एक फोन वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल तर दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme 5i क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक नुसार फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तथा 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस मिळू शकते. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रियलमी आपला हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर करू शकते तसेच फोन आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. समोर आलेल्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Realme 5i मध्ये 5000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. रियलमी 5आई ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Realme 5i च्या किंमतीचा झाला खुलासा, 6 जानेवारीला लॉन्च होईल हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5i-spotted-on-geekbench-ahead-of-official-launch-and-price-leaked-also/feed/ 0