5000एमएएच बॅटरी सह भारतात आला Realme 5i, Xiaomi च्या अडचणी वाढणार

Realme ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘रियलमी 5’ सीरीज वाढवत नवीन डिवाइस Realme 5i लॉन्च केला होता. आज हा डिवाइस अधिकृतपणे भारतात लॉन्च केला गेला आहे. हा फोन लो बजेट स्मार्टफोन मार्केट मध्ये सादर केला गेला आहे आणि डिवाइस 5,000एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो. चला बघूया Realme 5i च्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती.

किंमत आणि सेल डिटेल

भारतात Realme 5i ब्लू आणि ग्रीन कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन कंपनीने 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा डिवाइस कंपनी 15 जानेवारी दुपारी 12 वाजता सेलसाठी फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइट वर उपलब्ध करेल. तसेच या इवेंट मध्ये कंपनीच्या सीईओनी रियलमीच्या अपकमिंग आणि नवीन फिटनेस बॅंडची झलक दाखवली. पण त्याची जास्त माहिती देण्यात आली नाही.

डिजाइन

Realme 5i बेजल लेस नॉच डिस्प्ले डिजाइन सह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला आहे. तसेच फोनच्या लोवेरा पॅनल वर टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम आणि पावर बटण देण्यात आला आहे. डिवाइसच्या मागे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये चार रियर कॅमेरा आणि मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

हा फोन कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच रियलमी 5आई कलरओएस 6.1 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

दमदार कॅमेरा

रियलमी 5आई च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डिवाईस क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा फोन 8 मेगाक्सिलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme 5i मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

या फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. याची स्टोरेज मेमोरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोन मध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई आणि जीपीएस देण्यात आला आहे. फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here