Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे

Realme ने काल भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Realme 5i लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने लो बजेट मध्ये एंट्री घेतली आहे जो 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन येत्या 15 जानेवारी पासून देशात सेलसाठी उपलब्ध होणार आहे. Realme 5i ची टक्कर या बजेट सेग्मेंट मधील Xiaomi च्या Redmi Note 8 स्मार्टफोनशी होणार आहे. Redmi Note 8 ने भारतात आपल्या सेलचे अनेक रेकॉर्ड आधीच बनवले आहेत आणि या फोनची लोकप्रियता पण जास्त आहे. स्मार्टफोन मार्केट मध्ये Realme ला Xiaomi चा मोठा प्रतिस्पर्धी म्हटले जाते त्यामुळे Realme 5i समोर मोठे आव्हान असेल. या सेग्मेंट मध्ये Xiaomi चा Redmi 8 स्मार्टफोन पण Realme 5i च्या अडचणी वाढवू शकतो पण या फोनची किंमत Realme 5i पेक्षा 1,000 रुपये कमी आहे. त्यामुळे आम्ही स्मार्टफोन यूजर्ससाठी बेस्ट च्वाइस निवडत Realme 5i ची तुलना Redmi Note 8 शी केली आहे. त्यामुळे 9,999 रुपयांचा Redmi Note 8 निवडावा कि लेटेस्ट डिवाईस Realme 5i विकत घ्यावा, हा एक मोठा प्रश्न आहे. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सची छोटीसी तुलना केली आहे, ज्यातून समजेल Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

डिजाईन

Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाले आहेत. फ्रंट पॅनल वर दोन्ही फोनचा लुक जवळपास एकसारखा आहे पण Realme 5i चा चिन पार्ट Redmi Note 8 पेक्षा थोडा जास्त मोठा आहे. तसेच Redmi Note 8 च्या चिन पार्ट वर Redmi ची ब्रँडिग आहे. Realme 5i आणि Redmi Note 8 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे देण्यात आला आहे. दोन्ही फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सह स्पीकर देण्यात आला आहे. दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इथे स्पष्ट करू इच्छितो कि Realme 5i साधारण लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

डिस्प्ले

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर बनलेले आहेत. Realme 5i 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्टेड आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी नोट 8 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. रेडमी नोट 8 ची पिक्सल डेन्सिटी 403ppi आहे तर रियलमी 5आई 269ppi च्या पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. रेडमी नोट 8 मध्ये मीयूआई 10 देण्यात आला आहे तर रियलमी 5आई मध्ये कलरओएस 6.0.1 आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे तर Realme 5i 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.

चिपसेट बद्दल बोलायचे तर Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही फोन 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतात. ग्राफिक्ससाठी पण Realme 5i आणि Redmi Note 8 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रॅम व स्टोरेज

Realme 5i भारतात एकाच वेरिएंट मध्ये आला आहे. हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Redmi Note 8 Xiaomi ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी

Realme 5i क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी Realme 5i मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Note 8 बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. Redmi Note 8 मध्ये सेल्फीसाठी एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटी व बॅटरी

सिक्योरिटीसाठी दोन्ही फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. Realme 5i मध्ये पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर Xiaomi Redmi Note 8 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे शाओमी आपल्या डिवाईसच्या रिटेल बॉक्स मध्ये 18वॉट चा चार्जर देत आहे तर रियलमी 5आई मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल.

किंमत

Realme 5i 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Xiaomi Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीच्या वेबसाइट वर 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. रेडमी नोट 8 स्पेस ब्लू, नेप्च्यून ब्लू, मूनलाईट व्हाईट आणि कॉसमिक पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल तर रियलमी 5आई ने ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये एंट्री घेतील आहे.

जर तुम्ही 1,000 रुपये जास्त देऊ शकत असाल तर Xiaomi Redmi Note 8 काल लॉन्च झालेल्या Realme 5i वर भारी पडतो. रियलमीला टक्कर देण्यासाठी शाओमी आपल्या या फोन वर अतिरिक्त ऑफर किंवा कॅशबॅक पण देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here