Realme 7 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launched-in-europe-with-dimensity-800u-soc-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launched-in-europe-with-dimensity-800u-soc-specs-price-sale/#respond Fri, 20 Nov 2020 12:35:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9018 Realme ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन 5G फोन सादर केला आहे. रियलमी 7 यूरोपियन बाजारातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन 5G फोन सादर केला आहे. रियलमीने हा फोन यूरोप मध्ये लॉन्च केला आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारात Realme 7 5G नावाने आला आहे. हा फोन लुक आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत बऱ्याच अंशी सप्टेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला रियलमी 7 स्मार्टफोन सारखा आहे जो 5जी कनेक्टिविटी सह आला आहे. रियलमीने आपला फोन लॉन्च करत दावा केला आहे कि हा नवीन रियलमी 7 यूरोपियन बाजारातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे.

लुक व डिजाईन

Realme 7 5G बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेले आहे. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तथा डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व सिम स्लॉट आहे. रियलमी 7 5जी च्या पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Realme 7 5G 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालते. हा नवीन रियलमी 7 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित रियलमी युआय वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली-जी57 एमसी3 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 7 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड व्हाईट लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Realme X7 सीरीज 2021 मध्ये करेल भारतात एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme 7 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी सोबतच 4जी एलटीईला पण सपोर्ट करतो. रियलमीने आपला नवीन फोन डॉल्बी एटमॉस आणि हाईरेज आडियो टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी अशा 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

रियलमी 7 5जी फोन यूरोप मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडीच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. किंमत पाहता यूरोपियन मार्केट मध्ये हा फोन EUR 279 मध्ये लॉन्च झाला आहे जे भारतीय करंसीनुसार 24,500 रुपयांच्या आसपास आहेत.

रियलमी 7 व्हिडीओ

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launched-in-europe-with-dimensity-800u-soc-specs-price-sale/feed/ 0
रियलमीचा स्वस्त 5जी फोन Realme 7 5G या दिवशी करेल एंट्री, असे असतील फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launch-date-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launch-date-revealed/#respond Thu, 12 Nov 2020 13:28:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8926 UK मध्ये Realme 7 5G 19 नोव्हेंबरला 10 AM GMT (3:30 PM IST) वाजता सादर केला जाईल.

The post रियलमीचा स्वस्त 5जी फोन Realme 7 5G या दिवशी करेल एंट्री, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर येत होती थी कि कंपनी स्वस्त 5जी फोन Realme 7 5G लॉन्च करणार आहे, ज्याच्या किंमतीची माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली होती. आता कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि फोन 19 नोव्हेंबरला यूकेच्या मार्केट मध्ये सादर केला जाईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Realme 7 series चा आगामी मॉडेल आहे, जो 5जी वेरियंट मध्ये मार्केट मध्ये येईल.

UK मध्ये Realme 7 5G 19 नोव्हेंबरला 10 AM GMT (3:30 PM IST) वाजता सादर केला जाईल. या दिवशी “real deal 5G event” चे आयोजन करण्यात येईल, ज्यात फोन सादर केला जाईल. कंपनी हा इवेंट लाइव स्ट्रीम करेल. Realme 7 5G च्या स्पेसिफिकेशन आणि डिजाइन बद्दल बोलले जात आहे कि हा Realme V5 सारखाच असेल जो यावर्षी ऑगस्ट मध्ये चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच Realme 7 5G ला काही दिवसांपूर्वी मॉडेल नंबर RMX2111 सह NBTC सर्टिफिकेशन मिळाले होते.

संभावित किंमत

रियलमीने अधिकृतपणे या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिली नाही, पण अलीकडेच टिप्स्टर अभिषेक यादवने माहिती दिली होती कि या फोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,499 युआन (जवळपास 17,000 रुपये) असेल. तसेच रियलमी 7 5जी चा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंट 1,899 युआन (जवळपास 21,400 रुपये) चा असेल.

हे देखील वाचा : Realme X7 सीरीज लवकरच होईल भारतात लॉन्च, वेबसाइट वर लिस्ट झाले स्मार्टफोन्स

स्पेसिफिकेशन्स

रियलमी 7 5जी चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंचाचा होल पंच डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90-हार्ट्ज असू शकतो. या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 720 SoC प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच यात 5,000mAh ची बॅटरी असेल, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

The post रियलमीचा स्वस्त 5जी फोन Realme 7 5G या दिवशी करेल एंट्री, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-7-5g-launch-date-revealed/feed/ 0