5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील

Realme ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन 5G फोन सादर केला आहे. रियलमीने हा फोन यूरोप मध्ये लॉन्च केला आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारात Realme 7 5G नावाने आला आहे. हा फोन लुक आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत बऱ्याच अंशी सप्टेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला रियलमी 7 स्मार्टफोन सारखा आहे जो 5जी कनेक्टिविटी सह आला आहे. रियलमीने आपला फोन लॉन्च करत दावा केला आहे कि हा नवीन रियलमी 7 यूरोपियन बाजारातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे.

लुक व डिजाईन

Realme 7 5G बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेले आहे. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तथा डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व सिम स्लॉट आहे. रियलमी 7 5जी च्या पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Realme 7 5G 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालते. हा नवीन रियलमी 7 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित रियलमी युआय वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली-जी57 एमसी3 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 7 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड व्हाईट लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Realme X7 सीरीज 2021 मध्ये करेल भारतात एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme 7 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी सोबतच 4जी एलटीईला पण सपोर्ट करतो. रियलमीने आपला नवीन फोन डॉल्बी एटमॉस आणि हाईरेज आडियो टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी अशा 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

रियलमी 7 5जी फोन यूरोप मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडीच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. किंमत पाहता यूरोपियन मार्केट मध्ये हा फोन EUR 279 मध्ये लॉन्च झाला आहे जे भारतीय करंसीनुसार 24,500 रुपयांच्या आसपास आहेत.

रियलमी 7 व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here