Realme X7 सीरीज 2021 मध्ये करेल भारतात एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली उंची वाढवत चीनी कंपनी रियलमीने यावर्षी अनेक नवीन फोन्स जगासमोर ठेवले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी येत्या काळात रियलमी एक्स7 सीरीजचे स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तसेच आता स्पष्ट झाले आहे कि Realme X7 सीरीज पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारत लॉन्च केली जाईल. रियलमीचे CEO माधव सेठ यांनी ट्विटर वर रियलमी X7 सीरीजच्या लॉन्च संबंधित हि माहिती दिली आहे. या सीरीज मध्ये Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील.

पुढल्या वर्षी लॉन्च होईल रियलमी एक्स7 सीरीज

माधव सेठ यांनी ट्वीट करून म्हटले आहे कि भारतात Realme X50 Pro 5जी सह येणारा पहिला स्मार्टफोन होता. त्यांनी पुढे सांगितले कि रियलमी एक्स7 सीरीज 2021 मध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर 5G कनेक्टिविटी सह अजून डिवाइसेज पण लॉन्च केले जातील.

लॉन्च डेट

माधव सेठ यांनी आगामी रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही. पण हा 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने रियलमी X50 Pro 5G सादर केला होता.

Realme X7 चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो.

Realme X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here