Realme GT Neo 5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Jun 2023 07:31:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/#respond Mon, 12 Jun 2023 07:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21535 Realme नं आतापर्यंत अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आता समोर आलं आहे की कंपनी एक नवीन डिवाइस Realme GT Neo 5 Pro वर काम करत आहे. सध्या ब्रँडनं फोनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही परंतु डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टमध्ये फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. Realme GT Neo 5 Pro चा लीक रिपोर्ट […]

The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 मिळू शकतो.
  • फोनच्या डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट मिळेल.
  • ह्यात 16GB पर्यंत रॅम मिळू शकतो.

Realme नं आतापर्यंत अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आता समोर आलं आहे की कंपनी एक नवीन डिवाइस Realme GT Neo 5 Pro वर काम करत आहे. सध्या ब्रँडनं फोनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही परंतु डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टमध्ये फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Realme GT Neo 5 Pro चा लीक रिपोर्ट

टिप्स्टरनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो OLED पॅनल आणि सर्वात कमी बेजल सह येईल. डिस्प्लेवर युजर्सना 1.5K रिजॉल्यूशन दिलं जाईल. तसेच डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट, 2160 PWM डिमिंग सपोर्ट मिळेल.

Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले साइज : डिस्प्ले साइज पाहता लीकमध्ये समोर आलं आहे की रियलमी जीटी नियो 5 प्रो 6.74 इंचाचा असेल. म्हणजे युजर्सना मोठा डिस्प्ले आणि उपरोक्त खास टेक्नॉलॉजी दिली जाईल.
  • चिपसेट : प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम मिळेल. इंटरनल स्टोरेज बाबत सध्या माहिती देण्यात आली नाही.
  • बॅटरी : लीकनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. परंतु ह्यात किती एमएएचची बॅटरी मिळेल ह्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
  • कॅमेरा डिटेल : कॅमेरा फीचर्स पाहता काही अन्य लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की डिवाइसच्या बॅक पॅनलवर OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स दिली जाईल. इतर कॅमेरा लेन्सची माहिती मात्र मिळाली नाही, असं देखील सांगण्यात आलं आहे की डिवाइसचा मेन कॅमेरा फ्यूजन अ‍ॅल्गोरिदमवर चालेल. ज्याची क्वॉलीटी शानदार मानली जाते.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वर चालेल.

The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/feed/ 0
Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, चिनी सर्टिफिकेशन्स साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-got-miit-certificate/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-got-miit-certificate/#respond Mon, 05 Jun 2023 05:33:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21372 रियलमीसंबंधित माहिती आली आहे की कंपनी आपल्या ‘जीटी नियो’ सीरीजमधील एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Realme GT Neo 5 Pro नावानं बाजारात लाँच केला जाईल. हा मोबाइल फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइटवर स्पॉट झाला आहे, ज्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच हा लाँच करू शकते. फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. रियलमी […]

The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, चिनी सर्टिफिकेशन्स साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनला MIIT सर्टिफिकेशन मिळालं आहे
  • मोबाइल दोन मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
  • लवकरच होऊ शकतो लाँच

रियलमीसंबंधित माहिती आली आहे की कंपनी आपल्या ‘जीटी नियो’ सीरीजमधील एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Realme GT Neo 5 Pro नावानं बाजारात लाँच केला जाईल. हा मोबाइल फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइटवर स्पॉट झाला आहे, ज्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच हा लाँच करू शकते. फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी जीटी नियो 5 प्रो सर्टिफिकेशन डिटेल

  • फोनला MIIT सर्टिफिकेशन मिळालं आहे
  • मोबाइल दोन मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.

नवीन रियलमी मोबाइल चायना अथॉरिटी MIIT वर लिस्ट झाला आहे जो परदेशी वेबसाइट डिजिटल चॅट स्टेशननं स्पॉट केला आहे. ही लिस्टिंग 2 जूनची आहे जिथे स्मार्टफोन RMX3820 आणि RMX3823 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. एमआयआयटीवर फोनसंबंधित स्पेसिफिकेशन्स समजले नाहीत परंतु सर्टिफिकेशन पाहता कंपनी लवकरच ह्या स्मार्टफोनची घोषणा करू शकते.

रियलमी जीटी नियो 5 प्रो स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ 1.5K OLED 144Hz Screen
  • under-display fingerprint
  • Snapdragon 8 Plus Gen 2
  • 16GB RAM + 512GB storage
  • 100W Fast Charging
  • 50MP OIS Camera
  • प्रोसेसर : लीक्स आणि वेगवेगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आलेले फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा रियलमी फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रॅम/मेमरी : हा फ्लॅगशिप रियलमी फोन 16जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल, अशी चर्चा आहे. ह्या फोनमध्ये LPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजी मिळू शकते.
  • स्क्रीन : Realme GT Neo 5 Pro मध्ये 6.74 इंचाची 1.5के स्क्रीन दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल तसेच ह्यात 144हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2160पीडब्ल्यूडिमिंग फीचर मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम : रिपोर्ट्स नुसार हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल आणि रियलमी युआय 4.0 सह चालेल.
  • पावर बॅकअप : Realme GT Neo 5 Pro 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात येऊ शकतो. ह्याची बॅटरी किती मोठी असेल हे मात्र समजलं नाही.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो.

The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, चिनी सर्टिफिकेशन्स साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-got-miit-certificate/feed/ 0