Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन

Highlights

  • फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 मिळू शकतो.
  • फोनच्या डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट मिळेल.
  • ह्यात 16GB पर्यंत रॅम मिळू शकतो.

Realme नं आतापर्यंत अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आता समोर आलं आहे की कंपनी एक नवीन डिवाइस Realme GT Neo 5 Pro वर काम करत आहे. सध्या ब्रँडनं फोनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही परंतु डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टमध्ये फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Realme GT Neo 5 Pro चा लीक रिपोर्ट

टिप्स्टरनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो OLED पॅनल आणि सर्वात कमी बेजल सह येईल. डिस्प्लेवर युजर्सना 1.5K रिजॉल्यूशन दिलं जाईल. तसेच डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट, 2160 PWM डिमिंग सपोर्ट मिळेल.

Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले साइज : डिस्प्ले साइज पाहता लीकमध्ये समोर आलं आहे की रियलमी जीटी नियो 5 प्रो 6.74 इंचाचा असेल. म्हणजे युजर्सना मोठा डिस्प्ले आणि उपरोक्त खास टेक्नॉलॉजी दिली जाईल.
  • चिपसेट : प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम मिळेल. इंटरनल स्टोरेज बाबत सध्या माहिती देण्यात आली नाही.
  • बॅटरी : लीकनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. परंतु ह्यात किती एमएएचची बॅटरी मिळेल ह्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
  • कॅमेरा डिटेल : कॅमेरा फीचर्स पाहता काही अन्य लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की डिवाइसच्या बॅक पॅनलवर OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स दिली जाईल. इतर कॅमेरा लेन्सची माहिती मात्र मिळाली नाही, असं देखील सांगण्यात आलं आहे की डिवाइसचा मेन कॅमेरा फ्यूजन अ‍ॅल्गोरिदमवर चालेल. ज्याची क्वॉलीटी शानदार मानली जाते.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वर चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here