Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, चिनी सर्टिफिकेशन्स साइटवर झाला लिस्ट

Highlights

  • फोनला MIIT सर्टिफिकेशन मिळालं आहे
  • मोबाइल दोन मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
  • लवकरच होऊ शकतो लाँच

रियलमीसंबंधित माहिती आली आहे की कंपनी आपल्या ‘जीटी नियो’ सीरीजमधील एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Realme GT Neo 5 Pro नावानं बाजारात लाँच केला जाईल. हा मोबाइल फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइटवर स्पॉट झाला आहे, ज्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच हा लाँच करू शकते. फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी जीटी नियो 5 प्रो सर्टिफिकेशन डिटेल

  • फोनला MIIT सर्टिफिकेशन मिळालं आहे
  • मोबाइल दोन मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.

नवीन रियलमी मोबाइल चायना अथॉरिटी MIIT वर लिस्ट झाला आहे जो परदेशी वेबसाइट डिजिटल चॅट स्टेशननं स्पॉट केला आहे. ही लिस्टिंग 2 जूनची आहे जिथे स्मार्टफोन RMX3820 आणि RMX3823 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. एमआयआयटीवर फोनसंबंधित स्पेसिफिकेशन्स समजले नाहीत परंतु सर्टिफिकेशन पाहता कंपनी लवकरच ह्या स्मार्टफोनची घोषणा करू शकते.

रियलमी जीटी नियो 5 प्रो स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ 1.5K OLED 144Hz Screen
  • under-display fingerprint
  • Snapdragon 8 Plus Gen 2
  • 16GB RAM + 512GB storage
  • 100W Fast Charging
  • 50MP OIS Camera
  • प्रोसेसर : लीक्स आणि वेगवेगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आलेले फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा रियलमी फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रॅम/मेमरी : हा फ्लॅगशिप रियलमी फोन 16जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल, अशी चर्चा आहे. ह्या फोनमध्ये LPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजी मिळू शकते.
  • स्क्रीन : Realme GT Neo 5 Pro मध्ये 6.74 इंचाची 1.5के स्क्रीन दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल तसेच ह्यात 144हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2160पीडब्ल्यूडिमिंग फीचर मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम : रिपोर्ट्स नुसार हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल आणि रियलमी युआय 4.0 सह चालेल.
  • पावर बॅकअप : Realme GT Neo 5 Pro 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात येऊ शकतो. ह्याची बॅटरी किती मोठी असेल हे मात्र समजलं नाही.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here