Realme Narzo 10A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Jun 2020 11:02:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम असलेला Realme Narzo 10A https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-4gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-price-at-rs-9999-on-flipkart-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-4gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-price-at-rs-9999-on-flipkart-specs-sale-offer/#respond Mon, 22 Jun 2020 11:02:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7522 कंपनी Realme Narzo 10A चा नवीन 4 जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करणार आहे.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम असलेला Realme Narzo 10A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने मे मध्ये आपल्या भारतीय चाहत्यांसाठी नवीन सीरीज Realme Narzo सादर केली होती. या सीरीज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A दोन मोबाईल लॉन्च केले होते. हे दोन्ही फोन परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च झाले होते, जे मोठी बॅटरी व मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतात. रियलमीने नारजो 10ए चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज असलेला एकच वेरिएंट बाजारात आणला होता ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. आता बातमी समोर आली आहे कि कंपनी Realme Narzo 10A चा नवीन 4 जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करणार आहे.

Realme Narzo 10A चा हा नवीन वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये नारजो 10ए चा हा नवीन वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या प्रोडक्ट पेज वर नवीन वेरिएंटची किंमत पण लिहिण्यात आली आहे जी 9,999 रुपये आहे. नारजो 10ए ची पुढील विक्री उद्या म्हणजे 23 जूनला दुपारी 12 वाजता होईल, त्यामुळे आशा आहे कि कदाचित फोनचा नवीन 4GB RAM + 64GB Storage वेरिएंट पण उद्यापासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल, जो फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme Narzo 10A

रियलमी नारजो 10ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 आधारित रियलमी यूआई वर लॉन्च झाला होता जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 10A मध्ये रियर वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 12 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा मेन सेंसर देण्यात आला आहे. तसेच मागे f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची पोर्टेट लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला f/2.4 अपर्चर सह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी नारजो 10ए डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. पुन्हा एकदा किंमत पाहता Realme Narzo 10A चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme Narzo 10 बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने 4 जीबी रॅम सह लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 256जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन देशात 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे That White आणि That green कलर मध्ये विकत घेता येईल. Realme Narzo सीरीज कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

रियलमी नारजो 10ए वीडियो

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम असलेला Realme Narzo 10A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-4gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-price-at-rs-9999-on-flipkart-specs-sale-offer/feed/ 0
Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/#respond Wed, 25 Mar 2020 12:18:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6888 Realme Narzo 10 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन अलीकडेच म्यानमार मध्ये लॉन्च झालेल्या Realme 6i चा रिब्रँडेड वर्जन असेल.

The post Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने जेव्हापासून घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘नारजो’ घेऊन येणार आहे, तेव्हापासून स्मार्टफोन यूजर आणि रियलमी फॅन्स या सीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनीने आधीच सांगितले आहे कि या सीरीज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन येतील. हे दोन्ही स्मार्टफोन उद्या म्हणजे 26 मार्चला भारतात लॉन्च केले जाणार होते. पण आता देशात पसरलेल्या Coronavirus मुळे रियलमीने नारजो सीरीजचा लॉन्च रद्द केला आहे.

Realme इंडिया हेड माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून अशी घोषणा केली आहे कि कंपनी तात्पुरते Realme Narzo 10 आणि Narzo 10A चा लॉन्च रद्द करत आहे. माधव सेठ म्हणाले कि कोरोना वायरसमुळे फक्त नारजो सीरीज नाही तर काही काळासाठी Realme आपल्या ब्रँड अंतर्गत सर्व स्मार्टफोन आणि प्रोडक्ट्सची निर्मिती थांबवत आहे. विशेष म्हणजे काल Vivo ने पण घोषणा केली आहे कि सध्या काही दिवस कंपनी भारतात आपला कोणताही प्रोडक्ट निर्माण करणार नाही आणि फोन बनवण्यासाठी लागणाऱ्या संसाधनाचा वापर कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी करेल.

Realme Narzo 10

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच यात मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर कॅमेरे मिळतील. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. याव्यतिरिक्त फोन मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000 एमएएच बॅटरी मिळेल.

Realme Narzo 10 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन अलीकडेच म्यानमार मध्ये लॉन्च झालेल्या Realme 6i चा रिब्रँडेड वर्जन असेल. असे समजले कि फोन मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले 89.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि वॉटर ड्रॉप नॉच सेल्फी कॅमेरा सह येईल. हँडसेट मध्ये “A क्लास प्रोसेसर असेल जो पहिल्यांदाच भारतात येईल. या प्रोसेसर बद्दल बोलले जात आहे कि हा फोन मीडियाटेक गेमिंग सेंट्रिक हीलियो जी80 चिपसेट असेल. अजूनतरी रियलमी नारजो 10 च्या रॅम व स्टोरेज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. अशा आहे Realme 6i प्रमाणे यात 3GB आणि 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी रियलमी नारजो 10 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. हा कॅमेरा सॅमसंग GM1 किंवा नवीन GM2 सेंसर सह येईल. तसेच यात 8MP 119-डिग्री अल्ट्रा वाइड सेंसर, 2MP 4cm मॅक्रो लेंस आणि 2MP B&W डेप्थ सेंसर f/2.4 अपर्चर सह असेल. फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा f/2.0 अपर्चर सह मिळू शकतो.

Realme Narzo 10 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. तसेच हँडसेट एंडरॉयड 10-बेस्ड रियलमी यूआई वर चालेल. फोन मध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सिक्योरिटीसाठी असेल. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये डुअल सिम 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5, जीपीएस/ ग्लोनास/ Beidou, यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि एफएम रेडियो दिला जाईल.

Realme Narzo 10A

Realme Narzo 10A बद्दल बोलले जात आहे कि हा Realme Narzo 10 चा छोटा वर्जन असेल. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. सध्या फोनच्या कॅमेरा रिजोल्यूशनची माहिती मिळाली नाही. पण फोन मध्ये 6.5-इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G80 चिपसेट असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

The post Realme Narzo 10 आणि Narzo 10A आता नाही होणार भारतात लॉन्च, Coronavirusमुळे ब्रँडच्या सर्व लॉन्च स्थगित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10a-series-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/feed/ 0