9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम असलेला Realme Narzo 10A

Realme ने मे मध्ये आपल्या भारतीय चाहत्यांसाठी नवीन सीरीज Realme Narzo सादर केली होती. या सीरीज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A दोन मोबाईल लॉन्च केले होते. हे दोन्ही फोन परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च झाले होते, जे मोठी बॅटरी व मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतात. रियलमीने नारजो 10ए चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज असलेला एकच वेरिएंट बाजारात आणला होता ज्याची किंमत 8,499 रुपये आहे. आता बातमी समोर आली आहे कि कंपनी Realme Narzo 10A चा नवीन 4 जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च करणार आहे.

Realme Narzo 10A चा हा नवीन वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये नारजो 10ए चा हा नवीन वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या प्रोडक्ट पेज वर नवीन वेरिएंटची किंमत पण लिहिण्यात आली आहे जी 9,999 रुपये आहे. नारजो 10ए ची पुढील विक्री उद्या म्हणजे 23 जूनला दुपारी 12 वाजता होईल, त्यामुळे आशा आहे कि कदाचित फोनचा नवीन 4GB RAM + 64GB Storage वेरिएंट पण उद्यापासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल, जो फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme Narzo 10A

रियलमी नारजो 10ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 आधारित रियलमी यूआई वर लॉन्च झाला होता जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 10A मध्ये रियर वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 12 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा मेन सेंसर देण्यात आला आहे. तसेच मागे f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची पोर्टेट लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला f/2.4 अपर्चर सह 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी नारजो 10ए डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. पुन्हा एकदा किंमत पाहता Realme Narzo 10A चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme Narzo 10 बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने 4 जीबी रॅम सह लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 256जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन देशात 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे That White आणि That green कलर मध्ये विकत घेता येईल. Realme Narzo सीरीज कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

रियलमी नारजो 10ए वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here