Realme Narzo 20A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Realme Narzo 20, सोबत आला स्वस्त Narzo 20A https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-launched-in-india/#respond Mon, 21 Sep 2020 15:09:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8237 Realme Narzo 20 मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर Realme Narzo 20A 5,000एमएएच च्या बॅटरी सह बाजारात आला आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Realme Narzo 20, सोबत आला स्वस्त Narzo 20A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे तिन्ही फोन रियलमी ने आपल्या ‘नारजो 20 सीरीज’अंतर्गत आणले आहेत ज्यात Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A चा समावेश आहे. हे तिन्ही फोन कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. पुढे आम्ही रियलमी नारजो 20 आणि नारजो 20ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.

पावरफुल बॅटरी

रियलमीने आपले हे दोन्ही मोबाईल्स मोठ्या आणि पावरफुल बॅटरी सह लॉन्च केले आहेत. Realme Narzo 20 मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर Realme Narzo 20A 5,000एमएएच च्या बॅटरी सह बाजारात आला आहे. रियलमी नारजो 20 यूजर्सना 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळेल. या दोघांमध्ये सुपर पावर सेविंग मोड आणि OTG सपोर्ट देण्यात आला आहे आणि हे फोन्स रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतात.

Realme Narzo 20

रियलमी नारजो 20 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme Narzo 20 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो रियलमी यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme Narzo 20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या एआई सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme Narzo 20A

रियलमी नारजो 20ए पाहता हा फोन पण कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.8 टक्के आहे. Realme Narzo 20A अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो रियलमी यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेटला सपोर्ट करतो.

Realme Narzo 20A मध्ये पण फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो त्या सोबत एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलची बीएंडडब्ल्यू लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलचा रेट्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वेरिएंट्स व किंमत

रियलमी नारजो 20 सीरीजचे हे दोन्ही फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाले आहेत. Realme Narzo 20 चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची की किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे.

हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत. Realme Narzo 20 येत्या 28 सप्टेंबर तसेच Narzo 20A 30 सप्टेंबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Realme Narzo 20, सोबत आला स्वस्त Narzo 20A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-launched-in-india/feed/ 0
21 सप्टेंबरला लॉन्च होतील तीन नवीन रियलमी फोन, Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-to-launch-in-india-on-21-september/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-to-launch-in-india-on-21-september/#respond Mon, 14 Sep 2020 09:36:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8131 21 सप्टेंबरला कंपनी ऑनलाईन लॉन्चच्या माध्यमातून आपले नवीन स्मार्टफोन Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A भारतीय बाजारात आणेल.

The post 21 सप्टेंबरला लॉन्च होतील तीन नवीन रियलमी फोन, Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने जेव्हापासून अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर Narzo 20 सीरीजची घोषणा केली आहे तेव्हापासून भारतीय मोबाईल यूजर पण या सीरीजच्या लॉन्चची वाट बघत आहेत. आज रियलमीने हि प्रतिक्षा संपवत ‘नारजो 20’ सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 21 सप्टेंबरला रियलमी नारजो 20 सीरीज भारतात लॉन्च करेल आणि या अंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A भारतीय बाजारात येतील.

रियलमी नारजो 20 सीरीजच्या लॉन्चची माहिती कंपनीने प्रेस रिलीजच्या माध्यमातून दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 21 सप्टेंबरला कंपनी ऑनलाईन लॉन्चच्या माध्यमातून आपले नवीन स्मार्टफोन Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A भारतीय बाजारात आणेल. हा ईवेंट दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल.

Realme Narzo 20 सीरीजच्या लॉन्च इन्वाईट मध्ये कंपनीने एक ईमेजचा पण वापर केला आहे ज्यात तीन मोबाईल्स फोन दाखवण्यात आले आहेत. यात एक फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात तीन सेंसर दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोनच्या मागे उजवीकडे वर्टिकल शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे.

ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असलेल्या फोन मध्ये बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे. तसेच तिसऱ्या Realme Narzo फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे वरच्या बाजूला चौकोनी कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर दिसत आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर आहे.

हे देखील वाचा: लवकरच येत आहे Realme C17, Snapdragon 460 प्रोसेसर सह गीकबेंच वर आला समोर

Realme Narzo सीरीज

Realme Narzo 20A बद्दल बोलले जात आहे कि हा सीरीजचा सर्वात छोटा वर्जन म्हणजे सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. लीकनुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन Victory Blue आणि Glory Sliver कलर मध्ये बाजारात येईल.

Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर लीक मध्ये या फोनचे दोन रॅम वेरिएंट्स समोर आले आहेत. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे तर लीकनुसार मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. टिपस्टरनुसार हा फोन पण Victory Blue आणि Glory Sliver कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार?

Realme Narzo 20 Pro या सीरीजचा सर्वात मोठा स्मार्टफोन असेल. लीकनुसार हा फोन पण दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. नारजो 20 प्रो च्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरज असल्याचे बोलले जात आहे तर मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार हा फोन Black Ninja आणि White Knight कलर मध्ये बाजारात येईल.

The post 21 सप्टेंबरला लॉन्च होतील तीन नवीन रियलमी फोन, Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-20-pro-20a-to-launch-in-india-on-21-september/feed/ 0