21 सप्टेंबरला लॉन्च होतील तीन नवीन रियलमी फोन, Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A होतील लॉन्च

Realme ने जेव्हापासून अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर Narzo 20 सीरीजची घोषणा केली आहे तेव्हापासून भारतीय मोबाईल यूजर पण या सीरीजच्या लॉन्चची वाट बघत आहेत. आज रियलमीने हि प्रतिक्षा संपवत ‘नारजो 20’ सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 21 सप्टेंबरला रियलमी नारजो 20 सीरीज भारतात लॉन्च करेल आणि या अंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A भारतीय बाजारात येतील.

रियलमी नारजो 20 सीरीजच्या लॉन्चची माहिती कंपनीने प्रेस रिलीजच्या माध्यमातून दिली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 21 सप्टेंबरला कंपनी ऑनलाईन लॉन्चच्या माध्यमातून आपले नवीन स्मार्टफोन Realme Narzo 20, Narzo 20 Pro आणि Narzo 20A भारतीय बाजारात आणेल. हा ईवेंट दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल.

Realme Narzo 20 सीरीजच्या लॉन्च इन्वाईट मध्ये कंपनीने एक ईमेजचा पण वापर केला आहे ज्यात तीन मोबाईल्स फोन दाखवण्यात आले आहेत. यात एक फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात तीन सेंसर दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोनच्या मागे उजवीकडे वर्टिकल शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे.

ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असलेल्या फोन मध्ये बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे. तसेच तिसऱ्या Realme Narzo फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे वरच्या बाजूला चौकोनी कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर दिसत आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर आहे.

हे देखील वाचा: लवकरच येत आहे Realme C17, Snapdragon 460 प्रोसेसर सह गीकबेंच वर आला समोर

Realme Narzo सीरीज

Realme Narzo 20A बद्दल बोलले जात आहे कि हा सीरीजचा सर्वात छोटा वर्जन म्हणजे सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. लीकनुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन Victory Blue आणि Glory Sliver कलर मध्ये बाजारात येईल.

Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर लीक मध्ये या फोनचे दोन रॅम वेरिएंट्स समोर आले आहेत. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे तर लीकनुसार मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. टिपस्टरनुसार हा फोन पण Victory Blue आणि Glory Sliver कलर मध्ये लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार?

Realme Narzo 20 Pro या सीरीजचा सर्वात मोठा स्मार्टफोन असेल. लीकनुसार हा फोन पण दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. नारजो 20 प्रो च्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरज असल्याचे बोलले जात आहे तर मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार हा फोन Black Ninja आणि White Knight कलर मध्ये बाजारात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here