6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार?

अनेक दिवस टीज केल्यानंतर पोकोने या आठवड्यात आपला सर्वात स्वस्त फोन Poco M2 भारतात लॉन्च केला आहे. हा बहुप्रतिक्षित फोन 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे. या किंमत फोन मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यांच्या जीवावर पोको एम2 भारतातील रियलमी, मोटोरोला आणि स्वतःच्या पॅरेंट कंपनी शाओमीच्या फोन्सना तगडे आव्हान देतो. फोनची किंमत पाहता या रेंज मध्ये एक डिवाइस आहे जो फोनला थेट टक्कर देतो आणि तो आहे Realme Narzo 10 स्मार्टफोन.

अनेक बाबतीत दोन्ही फोन्स सारखे आहेत. हे पाहता आम्ही आज Poco M2 आणि Realme Narzo 10 ची एकमेकांशी तुलना करून बघणार आहोत कि दोघांपॅकी कोण आहे चांगला. तुलना फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सच्या आधारवर केली जाईल.

डिजाइन

डिजाइन पाहता दोन्ही फोन्स बेजल-लेस डिस्प्ले सह येतात. POCO M2 आणि Realme Narzo 10 मध्ये वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे, ज्यात एक सेल्फी कॅमेरा आहे. तसेच मागे दोन्ही फोन्स प्लास्टिक बॅक आणि ग्लोसी फिनिश सह येतात जी मागच्या बाजूला ग्लासचा लुक देते. पण दोन्ही हँडसेट मधील रियर कॅमेरा सेटअप वेगवेगळ्या जागी आहे. POCO M2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मध्यभागी वर्टिकल शेप आहे. तर Realme Narzo 10 च्या मागे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. तसेच दोन्ही फोन्स मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर, लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबतच स्पीकर आणि 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

डिस्प्ले

Poco M2 पी2आय कोटेड आहे ज्यामुळे स्क्रीन पाणी व धुळीपासून वाचते. स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ (1,080×2,340 पिक्सल) डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि टीयूवी रीनलँड ब्लू लाइट सर्टिफिकेशन सह येते. रियलमी नार्जो 10 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.9 सह 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पोको एम2 प्रमाणे रियलमीने आपल्या फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षा व मजबूतीसाठी फोन मध्ये गोरिल्ला ग्लास 3 कोटिंगचा वापर केला आहे.

हार्डवेयर

हार्डवेयर पाहता POCO M2 आणि Realme Narzo 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो जी80 चिपसेट वर आधारित आहेत. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन्स मध्ये माली-जी52 जीपीयू चा सपोर्ट आहे. पण रॅमच्या बाबतीत दोन्ही फोन्स वेगवेगळे आहेत. रियलमी नार्जो 10 मध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. तर पोको एम2 मध्ये 6 जीबी रॅम आहे आणि इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी व 128 जीबी चे पर्याय मिळतात.

कॅमेरा

दोन्ही फोन्स मध्ये मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहेत. POCO M2 च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

दुसरीकडे Realme Narzo 10 मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी रियलमी नारजो 10 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

पावर बॅकअपसाठी पोको एम2 आणि रियलमी नार्जो मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तसेच दोन्ही फोन्स डुअल सिम फोन्स आहेत जे 4जी वोएलटीई सपोर्ट सह येतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन्स मध्ये 3.5एमएम जॅक सपोर्ट आहे. रियलमी नार्जो 10 एंडरॉयड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. तर पोको एम2 मध्ये एंडरॉयड 10 बेस्ड MIUI 12 ओएस वर चालतो.

वेरिएंट्स व किंमत

POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येतो. किंमत पाहता पोको एम2 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. पण Realme Narzo फोन फक्त 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये येतो आणि त्याची किंमत 11,999 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here