Realme Narzo 30A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Feb 2021 10:00:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/#respond Wed, 24 Feb 2021 10:00:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10147 Realme Narzo 30A MediaTek Helio G85 चिपसेटवर सादर केला गेला आहे. हा एक गेमिंग प्रोसेसर आहे आणि याद्वारे कंपनीने 10 हजार रुपयांच्याखाली गेमिंग फोनची सुरुवात केली आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी लॉकडाउन मध्ये Realme ने आपल्या नवीन सीरीज Narzo ची सुरुवात केली होती आणि पहिला मॉडेल Narzo 10 सादर केला होता. आज कंपनीने या सीरीजमध्ये तिसरा वर्जन Realme Narzo 30A सादर केला आहे. कंपनीने दोन मॉडेल Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले आहेत. या फोन्ससह कंपनीने बजेट आणि मिड सेग्मेंट अजून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय बाजारात नार्जो 30ए (Narzo 30A) ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर नार्जो 30 प्रो (Narzo 30 Pro) ची प्राइस 16,999 रुपयांपासून सुरु होत आहे. पुढे आम्ही Realme Narzo बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाइन आणि डिस्प्ले

Realme Narzo 30A एक बजेट फोन आहे, त्यामुळे कंपनीने हा पॉलिकार्बोनेट कंस्ट्रक्शनसह सादर केला आहे. क्वालिटी चांगली आहे आणि मागे असलेली टेक्सचर्ड स्ट्रीम डिजाइन तुम्हाला आवडेल. चांगली बाब अशी कि हा फोन हातातून सरकणार नाही. कंपनीने हा फोन Laser Black आणि Laser Blue रंगात सादर केला आहे. फोनच्या मागे चौकोनी कॅमेरा आणि त्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचे तर फोन मध्ये 6.5-इंचाची मोठी स्क्रीन आणि कंपनीने 720 x 1600 पिक्सल रेजल्यूशनच्या LCD पॅनलचा उपयोग केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. तसेच डिस्प्ले 269 पीपीआईला सपोर्ट करतो आणि याची पीक ब्राइटनेस लेवल 570 nits आहे.

हे देखील वाचा : गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च

प्रोसेसर

Realme Narzo 30A MediaTek Helio G85 चिपसेटवर सादर केला गेला आहे. हा एक गेमिंग प्रोसेसर आहे आणि याद्वारे कंपनीने 10 हजार रुपयांच्याखाली गेमिंग फोनची सुरुवात केली आहे. फोन मध्ये 12nm फॅब्रिकेशन असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा 2.0GHz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. कंपनीने हा 3 GB RAM आणि 32 GB मेमरी व्यतिरिक्त 4 GB RAM आणि 64 GB मेमरीमध्ये सादर केला आहे. फोनमध्ये डेडिकेडेट मेमरी कार्डला सपोर्ट आहे.

कॅमेरा

डिस्प्ले आणि प्रोसेसरनंतर कॅमेऱ्याकडे वळायचे झाले तर हा डुअल कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोनचा मेन कॅमेरा 13 MP चा आहे ज्यात F/2.2 अपर्चरचा वापर केला गेला आहे. तसेच यात PDAF सपोर्ट पण मिळेल. सोबत दुसरा सेंसर ब्लॅक अँड व्हाइट आहे. फोनमध्ये HDR सपोर्ट व्यतिरिक्त पोर्टेट मोड पण आहे. सेल्फी बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 8 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा AI सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

बॅटरी

रियलमी नारजो 30ए मध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. हा फोन 6,000 mAh ची बॅटरीसह येतो. तसेच यात 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 52 तास लागोपाठ फोन कॉल, 114 तास स्पॉटिफाय म्यूजिक, 10 तास गेम आणि 27 तास यूट्यूब व्हिडीओ स्ट्रीमिंग करू शकतो. चांगली बाब अशी कि यात रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे.

नेटवर्क

डुअल सिम आधारित या फोनमध्ये दोन 4G सिमचा वापर करता येईल. तसेच वायफाय आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे.

प्राइस

Realme Narzo 30A च्या 3 GB RAM आणि 32 GB मेमरीच्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच 4 GB RAM आणि 64 GB मेमरी मॉडेल 9,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/feed/ 0
24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/#respond Fri, 19 Feb 2021 11:59:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10095 Realme ने गुरुवारी अधिकृतपणे रियलमी नारजो 30 सीरीजची भारतीय लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A सोबतच Realme Buds Air 2 भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च केले जातील.

The post 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गुरुवारी अधिकृतपणे रियलमी नारजो 30 सीरीजची भारतीय लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A सोबतच Realme Buds Air 2 भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च केले जातील. रियलमी नारजो 30 प्रो 5जी च्या प्रोसेसरच्या माहितीसह फोनच्या डिजाइनची माहिती पण सार्वजनिक करण्यात आली आहे. Realme Narzo 30 सीरीज अंतगर्त लॉन्च होणारे हे दोन स्मार्टफोन अनेक दिवसांपासून ऑनलाइन लीक्सवर पण समोर आले होते. यांनी लीक आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर आम्ही Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A च्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती पुढे दिली आहे. (realme narzo 30 pro series india launch flipkart sale know specification price)

असा असेल लुक

डिजाइन पाहता टीजर पेजमध्ये दिसले होते कि रियलमी नारजो 30 प्रो 5जी फोन मध्ये सेल्फीसाठी होल-पंच डिस्प्ले दिला जाईल. फोन मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आयताकृती असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी ग्रेडिएंट फिनिशसह येईल. बोलले जात आहे कि लुकच्याबाबतीत नारजो 30 प्रो सारखाच नारजो 30ए असेल. रियलमी नारजो 30 प्रो मध्ये बाजूला तर रियलमी नारजो 30ए मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान

सेल आणि किंमत

ई-कॉमर्स साइट Flipkart वर दोन्ही स्मार्टफोनसाठी टीजर पेज लाइव करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनीच्या साइटव्यतिरिक्त दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. किंमतीबद्दल अजूनतरी कोणताही लीक समोर आला नाही. पण, बोलले जात आहे कि फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आत असले.

Realme Narzo 30 Pro 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

टिप्स्टर मुकुल शर्माने रियलमी नारजो 30 प्रो 5G आणि रियलमी नारजो 30ए चे काही स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. Narzo 30 Pro 5G संबंधीत लीकमधून माहिती मिळाली आहे कि फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. तसेच हँडसेटमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो जो 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह येईल. रियलमी नारजो 30 प्रो 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असू शकते जी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये डॉल्बी ऍटमॉस आणि हाय-रिजोलूशन ऑडियो मिळू शकतो. नारजो 30 प्रो 5G मध्ये डिस्प्लेवर उजवीकडे एक होल-पंच कटआउट पण दिला जाईल.

हे देखील वाचा : रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा

तसेच एका टेक वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल जो रियलमी 30 प्रो असेल.

Realme Narzo 30A चे लीक स्पेसिफिकेशन्स

रियलमी नारजो 30ए स्मार्टफोनबद्दल लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोनमध्ये वाटरड्रॉप-स्टाइल नॉच असलेला 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर असू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो आणि यात 13 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाईल.

पावर बॅकअपसाठी हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी असू शकते जी 18वाट फास्ट-चार्जिंग सपोर्टसह येईल. फोन ब्लॅक आणि लाइट ब्लू कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल करण्यात आली नाही त्यामुळे हा फक्त एक लीक म्हणता येईल.

The post 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-flipkart-sale-know-specification-price/feed/ 0