Redmi K40 सीरीज चीनमध्ये 25 फेब्रुवारीला लॉन्च केली जाणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो सादर करणार आहे. त्याचबरोबर असे पण समजले आहे कि हि अपकमिंग सीरीज छोट्याश्या पंच-होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह सादर केली जाईल. तसेच एका पोस्टर मध्ये स्पष्ट झाले आहे कि फोन (जो प्रो मॉडेल असेल) मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC दिला जाईल. आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Redmi K40 डिवाइस मॉडेल नंबर M2012K11AC सह स्पॉट केला गेला आहे, लॉन्चच्याआधी Redmi K40 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. (redmi k40 geekbench launch 25 february in china)
गीकबेंचच्या सोर्सकोड नुसार फोन मधील क्वालकॉम चिपचा अधिकतम स्पीड 3.19GHz पर्यंत असू शकतो. यावरून समजले आहे कि हा फोन स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरसह येईल. सिंगल-कोर टेस्टमध्ये या फोनला 1016 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3332 स्कोर मिळाला आहे. तसेच Redmi K40 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC असेल हे आम्ही आधीच सांगितले आहे. Redmi K40 बद्दल बोलायचे तर यात 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.
हे देखील वाचा : आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर
असू शकतात पावरफुल स्पेसिफिकेशन्स
आता समोर आलेल्या माहितीनुसार Redmi K40 मध्ये सॅमसंग AMOLED E4 डिस्प्लेचा वापर केला जाऊ शकतो जो सेंटर सेल्फी कॅमेरा कटआउटसह येईल. फोनची डिस्प्ले साइज 6.6-इंच असेल. इतकेच नव्हे तर फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिजोल्यूशनसह येईल. फोनला पावर देण्यासाठी यात 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
दुसऱ्या रिपोर्ट्स मध्ये हा फोन Dimensity 1100/1200 किंवा अपकमिंग स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजच्या एखाद्या प्रोसेसरसह येईल असे बोलले जात आहे. K40 च्या प्रोसेसरबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती बाहेर आली नाही. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC, आणि USB टाइप- C पोर्टचा समावेश असू शकतो.
हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन
तसेच असे स्पष्ट झाले आहे कि फोनच्या मागे आयताकृती ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो आणि सर्व मॉडेल 5जी कनेक्टिविटीसह येतील. दुर्दैवाने रेडमी K40 सीरीजबाबत आतापर्यंत आम्हाला इतकीच माहिती मिळाली आहे. लॉन्चसाठी दोन दिवस आहेत त्यामुळे फोनचे सर्व फीचर्स जाणून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही.